शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेराव

शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेराव
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेराव

नाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी साखर कारखाना हा धाराशिव कारखान्याला भाडेतत्त्वावर देण्यात आला आहे. मात्र भाडेकरू संस्थेने कामगार व उसाचे पेमेंट अद्यापपर्यंत न दिल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याच्या प्रशासनाला घेराव घातला.

धाराशिव कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून सुरवातीला दोन महिने कारखाना सुरळीत चालू होता. कारखान्‍याचा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखाना कार्यस्थळावर ठरल्याप्रमाणे संस्थेने कामगार संघटनेशी करार केला नाही. त्यामुळे कामगारांना आपले थकीत वेतन मिळाले नाही. त्यासाठी कामगारांनी २२ जानेवारीपासून काम बंद उपोषण पुकारले होते. मात्र, अाश्वासन दिल्यानंतर ते आंदोलन मागे घेण्यात आले. कारखाना व्यवस्थापनाने शेतकऱ्यांची उसबिले अजूनही अदा केली नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत.

दोन महिन्यांपूर्वी कारखाना व्यवस्थापनाने दिलेले धनादेश वटले नाहीत. ते परत मागून घेण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. ऊस उत्पादक व कर्मचाऱ्यांनी अनेकदा धाराशिव कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना फोनद्वारे संपर्क केला. मात्र, त्यांनी फोन स्वीकारलेला नाही. त्यामुळे शेतकरी व कर्मचारी विवंचनेत आहेत. 

शेतकऱ्यांचा संताप 'वसाका'साठी कळवण, देवळा, चाळीसगाव, साक्री तालुक्यांबरोबरच आजूबाजूच्या ठिकाणांहून ऊस गळितासाठी पाठविला जातो. मात्र, उसाची बिले न मिळाल्याने ऊस उत्पादकांनी धाराशिव कारखान्याच्या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी गर्दी केली. मात्र, म्हणणे ऐकून घेण्यासाठी कार्यालयात कोणीही उपलब्ध नव्हते. त्यानंतर कारखान्याच्या विश्रांतीगृहात अधिकारी असल्याचे समजले. उत्पादक या ठिकाणी पोचले. मात्र, प्रशासकीय अधिकारी मनोहर जावळे यांनी ऊस बिलाबाबत समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे उत्पादकांनी याठिकाणी संताप व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com