agriculture news in marathi, The squad has came for the review of the water shortage | Agrowon

बुलडाणा जिल्ह्यात पाणीटंचाईच्या आढाव्यासाठी पथक दाखल
टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 मार्च 2019

बुलडाणा : जिल्ह्यात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमिवर पाहणीसाठी राज्याच्या पाणीपुरवठा विभागाचे पथक दाखल झाले आहे. हे पथक दोन दिवस पाहणीनंतर आपला अहवाल शासनाकडे सादर करेल. जिल्ह्यात या वर्षी टँकरने पाणीपुरवठा करण्यासारखी भीषण परिस्थिती अोढवली आहे. सध्या ८५ पेक्षा अधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. लवकरच हा आकडा शंभरी पार करण्याची शक्यता आहे.

बुलडाणा : जिल्ह्यात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमिवर पाहणीसाठी राज्याच्या पाणीपुरवठा विभागाचे पथक दाखल झाले आहे. हे पथक दोन दिवस पाहणीनंतर आपला अहवाल शासनाकडे सादर करेल. जिल्ह्यात या वर्षी टँकरने पाणीपुरवठा करण्यासारखी भीषण परिस्थिती अोढवली आहे. सध्या ८५ पेक्षा अधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. लवकरच हा आकडा शंभरी पार करण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात या मोसमात सुमारे ७५ टक्केच पाऊस झाला आहे. शिवाय जो पाऊस झाला तोसुद्धा खंडमय होता. दोन पावसांत बरेच अंतर असल्याने जेमतेम खरीप पिके आली; परंतु त्याचा रब्बीवर ताण पडला. प्रकल्प कोरडेच राहिले. परिणामी दिवाळीनंतरच पाणी समस्येने तोंड वर काढण्यास सुरुवात केली. मागील तीन वर्षांत पहिल्यांदा इतकी भीषण पाणीटंचाई उद्भवलेली आहे. या परिस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा विभागाचे अवर सचिव प्र. वि. कानडे, कक्ष अधिकारी असे चौघे दौऱ्यावर आले आहेत. हे पथक बुलडाणा, मोताळा, खामगाव, शेगाव, सिंदखेडराजा, देऊळगावराजा आदी तालुक्यांमध्ये भेटी देऊन पाहणी करेल.

प्रकल्प कोरडे असल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या योजना ठप्प पडत आहेत. ९३ गावांची तहान सध्याच टँकरद्वारे भागवावी लागत असून, आगामी तीन महिन्यांचा काळ हा प्रशासनाच्या कसोटीचा राहणार आहे. दर दिवसाला टँकरची मागणी वाढत आहे. जिल्ह्यात संपूर्ण १३ तालुके यापूर्वीच दुष्काळी जाहीर झाले आहेत. ९०० पेक्षा अधिक गावे टंचाईग्रस्त असून, येत्या मे महिन्यात या जिल्ह्यात किमान २५० पेक्षा जास्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असल्याची भीती यंत्रणांना वाटते आहे.

 पाणीपातळी या वर्षी दीड मीटरने खोल गेली आहे. हे पथक ठिकठिकाणी पाहणी करून नागरिकांसोबत चर्चा करेल. त्यानंतर उपाययोजनांची स्थिती, भविष्यात करावयाच्या उपाययोजना याबाबत सविस्तर अहवाल प्रधान सचिवांना देणार असल्याची माहिती मिळाली.

इतर बातम्या
भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी...नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी तर...
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
पुणे विभागात हरभरा, गव्हाची काढणी...पुणे ः उन्हाचा चटका वाढल्याने रब्बी हंगामातील गहू...
पूर्व भागात कृष्णा, वारणा नद्या पडल्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पूर्व भागात कृष्णा व...
ताकारीच्या तिजोरीत १३ कोटी शिल्लकवांगी, जि. सांगली ः मागील १५ वर्षांपासून दरवर्षी...
गिरणा नदीतून पाण्याची ग्रामस्थांना...जळगाव ः पिण्याच्या पाण्यासंबंधी सोडलेले गिरणा...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
दुबळवेल ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कारवाशीम : नागरिकांना अावश्यक असलेल्या पायाभूत...
नांदेड, परभणी, हिंगोलीत अन्नत्याग आंदोलननांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
दुष्काळी भागाला मिळतोय चिंचेचा आधारशिरूर कासार, जि. बीड ः दुष्काळाच्या गंभीर झळा...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
छोट्या शेतकऱ्यांच्या समस्या कायम ः...राहुरी विद्यापीठ, जि. नगर : विविध पिकांच्या...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...