agriculture news in marathi, Starred questions in the legislative assembly on 'Bribery' in `Agriculture` | Agrowon

‘कृषी’तील लाचखोरीवर विधानसभेत तारांकित प्रश्‍न
टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 डिसेंबर 2017

नागपूर : कृषी सेवा केंद्राच्या तपासणीदरम्यान कृषी अधिकाऱ्यांकडून लाखोची वसुली झाल्याचा आरोप करीत याप्रकरणी थेट विधानसभेत तारांकित प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. आष्टी येथील आमदार ॲड. भीमराव धोंडे व वरळी येथील आमदार सुनील शिंदे यांनी हा प्रश्‍न विचारला आहे.

नागपूर : कृषी सेवा केंद्राच्या तपासणीदरम्यान कृषी अधिकाऱ्यांकडून लाखोची वसुली झाल्याचा आरोप करीत याप्रकरणी थेट विधानसभेत तारांकित प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. आष्टी येथील आमदार ॲड. भीमराव धोंडे व वरळी येथील आमदार सुनील शिंदे यांनी हा प्रश्‍न विचारला आहे.

कृषी सेवा केंद्र तपासणीच्या आड त्रुटी असल्याचे सांगत कृषी अधिकाऱ्यांकडून हजारोंची वसुली होते. दर आठवड्याला कृषी सेवा केंद्राची तपासणी काही जिल्हे, तालुक्‍यात होते. ही तपासणी केवळ हप्ते वसुलीकरीताच होत असल्याचा आरोप आहे. या माध्यमातून लाखो रुपयांची माया गुणनियंत्रण अधिकाऱ्यांकडून जमविण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. गुणनियंत्रण विभागातील लाचखोरीचा हाच धागा पकडत आमदार धांडे व शिंदे यांनी विधानसभेत तारांकित प्रश्‍न उपस्थित केला आहे. विधानसभेत पहिल्यांदाच कृषी विभागातील गुणनियंत्रण शाखेकडून होणाऱ्या गैरप्रकाराच्या संदर्भाने थेट तारांकित प्रश्‍न उपस्थित करण्यात आला आहे.

आमदारांनी उपस्थित केले प्रश्‍न
विषारी कीटकनाशक फवारणी दरम्यान शेतकऱ्यांचे बळी गेल्यानंतर सरकारने चार कीटकनाशकांवर बंदी घातली. त्यानंतर कृषी सेवा केंद्र तपासणीचे आदेश देण्यात आले. ही तपासणी करताना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणीच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची लाच घेतल्यासंदर्भाने तारांकीत प्रश्‍न विचारण्यात आला आहे. या संदर्भात सरकारने काय चौकशी केली आणि चौकशीअंती दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई करण्यात आली, याविषयी देखील विचारणा करण्यात आली आहे.

इतर अॅग्रो विशेष
इंधनाचा भडकाएप्रिल महिन्यात राज्यातील तापमान ४० अंश...
हमीभावाने खरेदीत हवी विश्वासार्हताशासनाची कार्यक्षमता व पारदर्शकता वाढविण्याच्या...
उन्हामुळे लाही लाहीपुणे : वाढलेल्या उन्हामुळे अंगाची लाही लाही होत...
साखरेवर कर, इथेनॉलवरील जीएसटी कमी...नवी दिल्ली ः देशात सध्या साखरेचे दर पडल्याने...
तूर खरेदीत राज्याला एक हजार कोटींचा...मुंबई ः अगदी सुरवातीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात...
व्यावसायिक पिकांसह ‘हायटेक’ फुलशेतीचा...डोंगरकडा (जि. हिंगोली) येथील नागेश खांडरे या कृषी...
अन्य खात्याच्या मंत्र्यांचाही ‘कृषी’...पुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर अधिकाऱ्यांना...
दख्खनी मेंढीची लाेकरदेखील दर्जेदारपुणे : आॅस्ट्रेलियातील मेरिनाे मेंढीची लोकर...
बॅंकांतील घोटाळ्याने पतशिस्त बिघडत नाही...शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर पतशिस्त बिघडते असा...
दूध करपतेय, लक्ष कोण देणार?गेल्या वर्षात तूर, सोयाबीन, कापूस या मुख्य शेती...
राज्यातील धरणसाठा ३३.८६ टक्क्यांवरपुणे  : तापमान वाढताच राज्यातील धरणांचा...
अादेशाअभावी तूर खरेदी बंदचअकोला ः मुदत संपल्याने बुधवार (ता. १८) पासून बंद...
उद्योगांमध्ये वापर होणाऱ्या साखरेवर कर...कोल्हापूर  : देशात तयार होणाऱ्या साखरेपैकी...
तापमानाचा पारा चाळीशीपारपुणे  : राज्यात उन्हाचा चटका वाढतच असून,...
नागरी सेवा मंडळ बनले दात नसलेला वाघपुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर अधिकाऱ्यांना...
ध्यास गुणवत्तापूर्ण केळी उत्पादनाचा...जळगाव जिल्ह्यातील केऱ्हाळे बुद्रुक (ता. रावेर)...
जमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी?जी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही...
पंजाबचा आदर्शमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास...
करवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर...तळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना...
पशुगणना अखेर सुरू होणार; टॅब खरेदी...पुणे  : बाजारभावापेक्षा माहिती तंत्रज्ञान...