agriculture news in marathi, Start of action plan on solar power project | Agrowon

टेंभू सिंचन योजना सौरऊर्जेवर करण्याच्या कार्यवाहीला सुरवात
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

सांगली : टेंभू सिंचन योजना सौरऊर्जेवर सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासंदर्भात महाजनकोने कार्यवाही सुरू केली आहे. यासाठीच्या ६० मेगावॅटचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. त्याचे लवकरच काम सुरू होणार आहे. सौरऊर्जेवरील प्रकल्पामुळे शेतकऱ्यांवरील वाढीव वीजबिलाचा बोजा दूर होण्यास मदत होणार आहे.

सांगली : टेंभू सिंचन योजना सौरऊर्जेवर सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासंदर्भात महाजनकोने कार्यवाही सुरू केली आहे. यासाठीच्या ६० मेगावॅटचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. त्याचे लवकरच काम सुरू होणार आहे. सौरऊर्जेवरील प्रकल्पामुळे शेतकऱ्यांवरील वाढीव वीजबिलाचा बोजा दूर होण्यास मदत होणार आहे.

टेंभू सिंचन योजनेच्या प्रकल्पावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ठिबस सिंचन सुरू केले आहे. त्याची पाहणी जागतिक बॅंकेच्या प्रतिनिधींनी केली आहे. या प्रकल्पासाठी १२० मेगावॅट विजेची आवश्‍यकता असून त्यातील ६० मेगावॅटचा पहिला टप्पा वर्षभरात मार्गी लागेल, अशी माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली.

सांगली व सोलापूर जिल्ह्यांत ८० हजार ४५६ हेक्‍टरवर क्षेत्र आहे. साधारणपणे सांगली जिल्ह्यातील कडेगाव, आटपाडी, खानापूर, विटा, तासगाव, जत व कवठेमहांकाळ या दुष्काळी तालुक्‍यातील १८२ गावांचा व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्‍यातील ३२ गावांचा यामध्ये समावेश आहे. सद्यस्थितीत योजनेच्या पाच टप्प्यांपैकी तीन टप्पे पूर्ण होऊन दोन टप्प्यांची कामे लवकरच पूर्ण होतील. सौरऊर्जेमुळे पाणीपट्टीतील वाढीव वीजबिलातून शेतकऱ्यांची सुटका होण्याबरोबर योजनेवरील आर्थिक ताणही कमी करण्यासाठी टेंभूसाठी अपारंपरिक ऊर्जास्त्रोताचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टेंभू योजना सौर ऊर्जेवर चालविण्यासाठी १२० मेगावॅटची मागणी आहे. पुढील वर्षभरात ६० मेगावॅटचा टप्पा मार्गी लागेल असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. उर्वरित ६० मेगावॅटचा प्रकल्पाचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. तसेच शासनाच्या नवीन धोरणानुसार बंदिस्त पाइपलाइनद्वारे शेतकऱ्यांना शेतापर्यंत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी लाभक्षेत्रातील सर्व्हेक्षण प्रगतीपथावर आहे. दोन वर्षांत हे काम मार्गी लागेल असा अंदाज व्यक्त होत आहे.

जागतिक बॅंकेच्या प्रतिनिधींनी नुकतीच त्याची पहाणी केली आहे. सूक्ष्मसिंचनाव्दारे शेतीला कसे पाणी देता येईल याचा अहवाल ही समिती शासनाला सादर करणार आहे.

टेंभू सिंचन योजना सौरऊर्जेवर सुरू करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. या सिंचन योजनेवर गरजेनुसार सौरऊर्जेचे प्रकल्प उभे केले जाणार आहेत.
- हणमंत गुणाले, अधीक्षक अभियंता, टेंभू सिंचन योजना, सांगली.

 

इतर ताज्या घडामोडी
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...