एक हजार एकरवर सीताफळ लागवडीला सुरवात

एक हजार एकरवर सीताफळ लागवडीला सुरवात
एक हजार एकरवर सीताफळ लागवडीला सुरवात

जालना ः ॲग्रोव्हिजन गटशेती संघाद्वारा स्वबळावर शाश्वत दिशादर्शक प्रायोगिक प्रकल्प अंतर्गत एक हजार एकरवर सीताफळ लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी भोकरदन तालुक्‍यातील पिंपळगाव थोटे येथे बुधवारी (ता. ११) बालानगर सीताफळ लागवडीला सुरवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी औरंगाबाद, सोलापूर, जालना जिल्ह्यांत जवळपास दोनशे एकरवर सीताफळाची लागवड करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.

सीताफळ महासंघाचे अध्यक्ष श्‍याम गट्टाणी, जिल्हा कृषी अधीक्षक श्री. दशरथ तांभाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सीताफळ लागवडीला सुरवात करण्यात आली. शिवाजी बापू थोटे यांनी प्रास्ताविक केले. ॲग्रोव्हिजन गटशेती संघाचे संस्थापक संजय मोरे पाटील यांनी बालानगर सीताफळ लागवड प्रकल्पाविषयी माहिती दिली. पिंपळगाव थोटे गावासह जाफराबाद तालुक्‍यातील नळविहिरा, निवडुंगा, भातोडी, आंबेगाव, सिपोरा अंभोरे, गोकूळवाडी, मंठा तालुक्‍यातील रामतीर्थ, पैठण तालुक्‍यातील कारकीन, सोलापूर जिल्ह्यातील निंबरगे आदी ठिकाणी नल बालानगर सीताफळाची लागवड सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. ॲग्रोव्हिजन गटशेती संघाला शासनाच्या शतकोटी वृक्षलागवडीचा एक भाग बनायचं आहे.

कृषी विभाग सीताफळ लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना साथ देईल. - दशरथ तांभाळे, अधीक्षक कृषी अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com