पूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू करणार ः जानकर

पूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू करणार ः जानकर
पूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन केंद्र सुरू करणार ः जानकर

पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा, गंगाखेड आणि पालम येथे एक लाख लिटर क्षमतेचे दूध संकलन केंद्र सुरू करणार असल्याची घोषणा पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी केली.

पूर्णा येथे शनिवारी (ता. ८) राष्ट्रीय समाज पक्षातर्फे श्री. जानकर यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत हरोते. अध्यक्षस्थानी रासप नेते तथा उद्योजक रत्नाकर गुट्टे होते. या वेळी बाळासाहेब दौडतल्ले, नंदकुमार पटेल, सुरेश बडगर, किशनराव भोसले, राजेश फड, सीताराम राठोड, अखिल अन्सारी, विलास गाडवे, संदीप आळनुरे, कृष्णा सोळंके, व्यंकटराव पौळ, श्यामसुंदर गायकवाड, नागेश एंगडे, विजय एकलारे, शेख सलीम, परमेश्वर डहाळे, सय्यद अतिक, शशिकांत जगताप आदी उपस्थित होते.

श्री. जानकर पुढे म्हणाले, परभणी जिल्ह्यात पशुसंवर्धन पॅकेजचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. राज्यातील २७ हजारांवर ग्रामपंचायतींचा आदर्श विकासासाठी कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. गंगाखेड मतदार संघाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. गंगाखेड मतदासंघातून रासपचे उमेदवार म्हणून त्यांनी रत्नाकर गुट्टे यांच्या नावाची घोषणा श्री. जानकर यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com