agriculture news in marathi, Start the Silk Kosh Shopping Center at Hirje promptly | Agrowon

हिरजे येथे रेशीम कोष खरेदी केंद्र तातडीने सुरू करा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

सोलापूर : हिरज (ता. उत्तर सोलापूर) येथे होणाऱ्या रेशीम संशोधन केंद्रात प्रयोगशाळा प्रशिक्षण सुविधा मिळावी, त्याबरोबरच राज्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना रेशीम कोष खरेदीची होणारी अडचण दूर करण्याकरिता येथे तत्काळ रेशीम कोष खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.

सोलापूर : हिरज (ता. उत्तर सोलापूर) येथे होणाऱ्या रेशीम संशोधन केंद्रात प्रयोगशाळा प्रशिक्षण सुविधा मिळावी, त्याबरोबरच राज्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना रेशीम कोष खरेदीची होणारी अडचण दूर करण्याकरिता येथे तत्काळ रेशीम कोष खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.

सोलापूर सिल्क असोसिएशनच्या वतीने सहकारमंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मुंबईत यासंबंधीची आढावा बैठक झाली. त्यात त्यांनी हे आदेश दिले. या वेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रकल्पाच्या प्रगतीची माहिती घेतली. सोलापुरात सुतासह चादर व इतर कापड यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. रेशीम उत्पादक शेतकरी आणि रेशीम उद्योगाचे प्रश्न सोडवून सोलापूरचा रेशीम ब्रॅंड बनविण्यासाठी प्रयत्न व्हावेत. हिरज येथील नियोजित रेशीम पार्कचा कृती आराखडा बनवून त्यामध्ये संशोधनात्मक प्रयोगशाळा, प्रशिक्षण सुविधा आणि रेशीम कोष खरेदी केंद्र अशा सुविधा देण्याचे या वेळी ठरविण्यात आले. याबाबत सहकारमंत्री देशमुख यांनी पहिल्या टप्प्यात रेशीम कोष खरेदी सुरू करण्याबाबत संबंधित विभागाला त्यांनी आदेश दिले. सोलापूरसह राज्यातील शेतकऱ्यांना रेशीम कोष खरेदी केंद्राअभावी अनेक अडचणी येत आहेत, त्यासाठी आवश्‍यक ते सर्व पर्यायी मार्गाचा विचार केला जाईल, असेही ते म्हणाले.

रेशीम शेती आणि रेशीम कोष खरेदी-विक्री यासंबंधाने विविध विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि रेशीम कोष खरेदी केंद्र तत्काळ सुरू केल्यास मोठी सोय होईल; तसेच
स्वतंत्ररित्या ‘सोलापूर रेशीम’ या नावाने ब्रॅंड तयार करण्याच्या कामालाही गती मिळेल, त्यादृष्टीने प्रयत्न व्हावेत, असे रेशीम उत्पादक डॉ. संतोष थिटे यांनी बैठकीत सांगितले, याची दखल घेत वस्त्रोद्योगमंत्री देशमुख यांनी तत्काळ १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या वेळी रेशीम विभागाचे मुख्य सचिव अतुल पाटणे, विशेष कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, उमेश देशमुख आदींसह रेशीम उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...
नगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...
तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली  ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...
विसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता....
वऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर  ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर  : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...
पीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा   ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...
इंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे  : सरकारने आता तांत्रिक...
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...