agriculture news in marathi, Start the Templation, Taekari, Mhasal scheme | Agrowon

टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना सुरू करा
टीम अॅग्रोवन
रविवार, 16 सप्टेंबर 2018

सांगली : यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्याने दुष्काळी तालुक्यांमध्ये शेतीसाठी पाणी कमी पडत असल्यामुळे पिके वाया जाण्याचा धोका आहे. जत तालुक्यात पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. आठ दिवसांत जिल्ह्यातील टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना सुरू करण्याची मागणी जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीमध्ये सदस्यांनी केली. योजना तात्काळ सुरू करण्याच्या मागणीचा ठराव करून शासनाकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासनही अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी सदस्यांना दिले.

सांगली : यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्याने दुष्काळी तालुक्यांमध्ये शेतीसाठी पाणी कमी पडत असल्यामुळे पिके वाया जाण्याचा धोका आहे. जत तालुक्यात पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. आठ दिवसांत जिल्ह्यातील टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना सुरू करण्याची मागणी जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीमध्ये सदस्यांनी केली. योजना तात्काळ सुरू करण्याच्या मागणीचा ठराव करून शासनाकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासनही अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी सदस्यांना दिले.

जिल्हा परिषद अध्यक्ष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जलव्यवस्थापन समितीची सभा झाली. या वेळी उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती अरुण राजमाने, ब्रह्मानंद पडळकर, तम्मणगौडा पाटील, सुषमा नायकवडी, चंद्रकांत पाटील, आशाराणी पाटील, स्नेहलता जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे आदी उपस्थित होते.
यंदा दुष्काळी पट्ट्यात पाऊस कमी पडला आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी कमी झाली आहे. परिणामी विहिरी, कूपनलिकांना पाणी नाही. हातची पिके वाया जाण्याची भीती आहे. सिंचन योजना सुरू करण्याची मागणी होत आहे. योजना काही दिवस सुरू करून ओढे, नाले, मध्यम प्रकल्प, कालवे, तलाव भरून घेतले, तर शेतीसाठी पाणी कमी पडणार नाही. नदीतून वाहून जाणारे पाणी सिंचन योजनांतून वळते करावे, अशी मागणी या वेळी सर्व सदस्यांनी केली. त्यावर देशमुख यांनी, ही मागणी शासनाकडे कळविण्यासाठी जिल्हाधिकारी यांना या बैठकीचा अभिप्राय कळविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

जिल्हा हगणदारीमुक्तीनंतरही अतिरिक्त सर्वेक्षणात २४ हजार कुटुंबांची नोंदणी झालेली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. देशमुख यांनी वंचित कुटुंबे सोधून त्यांचाही समावेश स्वच्छ भारत अभियानांतर्गत करण्यात यावा, स्वतंत्र ग्रामसभेचे आयोजन करून मागणी कळवावी, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता विभागास दिल्या.

जिल्ह्यात १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधित ‘स्वच्छता ही सेवा’ जनजागृती अभियान होत आहे. अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत यावेळी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. सावळज येथील मावले टेक आणि पलूस तालुक्यातील घोगाव येथे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या कामास मंजुरी देण्यात आली.

टॅँकरची मागणी केलेल्या गावांना पाण्याचा पुरवठा करण्यासाठी तहसीलदारांना अधिकार देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला.

इतर बातम्या
'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच...नवी दिल्ली  : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि...
संत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल...नागपूर  ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...
सूक्ष्म सिंचन विस्तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद   : औरंगाबाद येथे आयोजित...
नंदुरबार, धुळ्यात पपई काढणी बंदनंदुरबार  : पपईच्या दरावरून शेतकरी, व्यापारी...
‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे  ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...
आंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे  : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...
रोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...
लोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...
...त्या दिवशी घरातलं कुणी जेवलं नायसुपे, जि. पुणे : एकच बैल होता. चितऱ्या...
किमान तापमानात वाढ होण्याची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जगात...पुणे - द टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर...
यंदा पाऊस, पीकपाणी समाधानकारक :...सोलापूर  ः यंदा पावसाचे प्रमाण पुरेसे राहील...
पहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...
पाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू अकोला : शासनाच्या पाणंद रस्ते योजनेतून...
`साखर उद्योगातील संघटित गुन्हेगारी...मुंबई : गेल्या वर्षीच्या हंगामातील ७०-३०...
शासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळतीअकोला : येथील मूर्तिजापूर मार्गावर असलेल्या...
कृषी योजनेतील विहिरींनाही दुष्काळाचा...धुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशात विहिरींनी...
नागपुरात `जलयुक्‍त`चा निधी आटलानागपूर : फडणवीस सरकारची महत्त्वाकांशी योजना...
मराठवाड्याची ७६२ कोटींची अतिरिक्‍त...औरंगाबाद ः शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेच्या...
नत्राच्या कार्यक्षम वापरासाठी सेन्सरचा...कृषी क्षेत्रातून होणाऱ्या नत्रांच्या प्रदूषणाची...