खानदेशात तूर खरेदी केंद्रे सुरू करा

खानदेशात तूर खरेदी केंद्रे सुरू करा
खानदेशात तूर खरेदी केंद्रे सुरू करा

जळगाव : खानदेशात तुरीची मळणी पूर्ण होत आली आहे. शेतकरी तूर विक्रीचे नियोजन करीत आहेत. परंतु बाजार समित्यांसह इतर बाजारांमध्ये दर हमीभावापेक्षा कमी आहेत. त्यामुळे शासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. 

तूर खरेदसाठी जळगाव जिल्ह्यात नऊ, धुळ्यात दोन, नंदुरबारात दोन खरेदी केंद्रांबाबत प्रशासनाने नियोजन केले आहे. परंतु ते पूर्ण झाले की नाही, हे स्पष्ट होत नाही. खानदेशात जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, यावल व रावेर येथे तूर अधिक आहे. धुळ्यात शिरपूर व शिंदखेडा भागांत तूर पीक मोठ्या प्रमाणात आहे. नंदुरबारात शहादा, नंदुरबार व तळोदा भागांत कमी अधिक क्षेत्रात तूर लागवड झाली होती. 

बागायती, सिंचन स्राेतांच्या आधारे घेतलेल्या तुरीचे उत्पादन यंदा बऱ्यापैकी आहे. कोरवडवाहू तुरीचे उत्पादन एकरी दोन क्विंटलपर्यंतच आले आहे. मात्र दर कमी व्हायला सुरवात झाली. नोव्हेंबरमध्ये तूर दर प्रतिक्विंटल ४५०० रुपयांपर्यंत होते. नंतर त्यात वाढ अपेक्षित होती. परंतु ते ४३०० ते ४५०० रुपयेच आहेत. तुरीला ५६७५ रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव केंद्राने जाहीर केला. परंतु एवढे दर बाजारात शेतकऱ्यांना मिळत नसल्याने त्यांचे नुकसान होत आहे. ते भरून काढण्यासाठी शासकीय खरेदी केंद्रे सुरू व्हायला हवेत. त्यासाठी उशिरा झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होईल. एकाच वेळी नऊ केंद्र सुरू करणे शक्‍य नसेल, तर जेथे लागवड अधिक होती, त्या भागात दोन-तीन केंद्रे सुरू करावी, असेही शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com