‘वसाका`च्या गळीत हंगामास प्रारंभ
‘वसाका`च्या गळीत हंगामास प्रारंभ

‘वसाका`च्या गळीत हंगामास प्रारंभ

कळवण, जि. नाशिक : विठेवाडी येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ३३ व्या गळीत हंगामास रविवारी (ता. ११) गव्हाणपूजन करून प्रारंभ झाला. सन २०१८-१९ साठी गाळपास येणाऱ्या उसाला जिल्ह्यातील आसपासच्या इतर कारखान्यांपेक्षा जास्त भाव दिला जाईल, चालू वर्षाच्या उसाच्या बिलाचा पहिला हप्ता किमान दोन हजार रुपये प्रतिटनप्रमाणे वाहन वजन झाल्यानंतर लगेचच धनादेशाद्वारे देण्यात येईल. उर्वरित फरकाची रक्कम इतर कारखान्यांच्या तुलनेप्रमाणे अदा केली जाईल, असे प्रतिपादन अभिजित पाटील यांनी केले.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदार आहेर, सोलापूरचे जिल्हाधिकारी गोकुळ मवारे, किरण बोधले महाराज, डीव्हीपी ग्रुपचे भागवत चौघुले, रणजीत भोसले, सुरेश सावंत, संदीप खरे, दिलीप धोत्रे, अभिजित कदम, विकास काळे, संजय खरात आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘‘वसाकाला गत हंगामात ज्या ऊसउत्पादकांनी ऊसपुरवठा केला त्यांना एफआरपीप्रमाणे पेमेंट अदा करण्यात आले. गळीत हंगामात सुमारे पाच लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचा मानस असून शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेऊन जास्त उत्पादन घेणाऱ्या ऊस पिकाची लागवड करावी.``

डॉ. आहेर म्हणाले, ‘‘वसाकाचा भविष्यकाळ उज्ज्वल असून लवकरच गतवैभव प्राप्त होईल. कसमादे पट्ट्यात अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकरी अडचणीत आहेत. त्यांना मदतीची गरज आहे. वसाका व्यवस्थापनाने जास्तीत जास्त गाळप करून परिसरातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा.``

दरम्यान ऊसपुरवठादार ११ सपत्नीक शेतकऱ्यांच्या हस्ते गव्हानपूजन करण्यात आले. शेतकऱ्यांनी वसाकाला ऊसपुरवठा करावा, असे आवाहन पाटील यांनी केले. या वेळी ह. भ. प. बोधले महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com