agriculture news in marathi, Starting the application under the Sangliat Fruit crop Insurance Scheme | Agrowon

सांगलीत फळपीक विमा योजनेअंतर्गत अर्ज भरणा सुरू
टीम अॅग्रोवन
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

सांगली ः २०१८-१९ मधील आंबे बहरासाठी पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना अधिसूचित मंडळातील फळपिकासाठी राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत द्राक्ष, डाळिंब, केळी, पेरू, आंबा आणि लिंबू या अधिसूचित फळपिकांचा समावेश आहे. द्राक्षांचा विमा रक्कम भरण्याची १५ ऑक्‍टोबर मुदत देण्यात आली आहे. तर अांब्यासाठी डिसेंबरअखेर मुदत अाहे.

सांगली ः २०१८-१९ मधील आंबे बहरासाठी पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना अधिसूचित मंडळातील फळपिकासाठी राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत द्राक्ष, डाळिंब, केळी, पेरू, आंबा आणि लिंबू या अधिसूचित फळपिकांचा समावेश आहे. द्राक्षांचा विमा रक्कम भरण्याची १५ ऑक्‍टोबर मुदत देण्यात आली आहे. तर अांब्यासाठी डिसेंबरअखेर मुदत अाहे.

वित्तीय संस्थाकडे पीककर्जासाठी अर्ज केलेल्या व ज्यांची अधिसूचित फळपिकांसाठी कर्जमर्यादा मंजूर आहे. अशा सर्व कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना सक्तीची आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी ही योजना ऐच्छिक आहे. फळपिकांचे बाजारमूल्य अधिक असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. तसचे फळपिकांचे हवामान धोक्‍यापासून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही, तर होणारा तोटाही मोठा असतो.

हवामान धोक्‍यापासून विमा संरक्षण देण्यासाठी पंतप्रधान फसल विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित पीकविमा योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी आपला विमा हप्ता जवळच्या बॅंकेत कमा करावा लागणार आहे. या योजनेसाठी तालुका कृषी अधिकारी आणि मंडल कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

विमासंरक्षित प्रतिहेक्‍टर व हप्ता व मुदत
पीक मुदत विमासंरक्षित रक्कम भरायची रक्कम
द्राक्ष १५ ऑक्‍टोबर ३ लाख ८ हजार १५ हजार ४००
डाळिंब ३१ ऑक्‍टोबर १ लाख २१ हजार ६ हजार ५०
पेरू ३१ ऑक्‍टोबर ५५ हजार २ हजार ७५०
केळी ३१ ऑक्‍टोबर १ लाख ३२ हजार ६ हजार ६००
आंबा ३१ डिसेंबर १ लाख २१ हजार ६ हजार ५०
लिंबू १५ नोव्हेंबर ६६ हजार ३ हजार ३००

 

इतर ताज्या घडामोडी
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...
नगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...
तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली  ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...
विसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता....
वऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर  ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर  : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...
पीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा   ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...
इंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे  : सरकारने आता तांत्रिक...
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...