agriculture news in marathi, Starting Panchnama in Kolhapur crop loss | Agrowon

कोल्हापुरात पीक नुकसानीचे पंचनामे सुरू
टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उसासह खरीप पिके अडचणीत आली आहेत. सातत्याने पडणारा पाऊस व पुराच्या पाण्यामुळे विविध पिकांचे नुकसान होत आहे. याबाबतचे पंचनामे सुरू केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी दिली.

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उसासह खरीप पिके अडचणीत आली आहेत. सातत्याने पडणारा पाऊस व पुराच्या पाण्यामुळे विविध पिकांचे नुकसान होत आहे. याबाबतचे पंचनामे सुरू केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी दिली.

गेल्या पंधरवड्यापासून पश्‍चिम भागातील तालुक्‍यामध्ये अतिपावसाने पिके कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. याबरोबर प्रतिकूल हवामानामुळे भात, ऊस व अन्य पिकांवरही रोग किडीने हल्ला केला आहे. याची दखल घेऊन कृषी विभागाने महसूल विभागाच्या सहायाने पंचनामे सुरू केले आहेत. कीड रोगाने नुकसान झालेली पिके व पुराने बाधित पिके याबाबत स्वतंत्र अहवाल तयार करण्यात येणार असल्याचे श्री. वाकुरे यांनी सांगितले.

गावपातळीवरील पर्यवेक्षक, कृषी सहायक यांच्यामार्फत नुकसानग्रस्त गावांची माहिती मागविण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत आमचे कर्मचारी प्रत्यक्षात जाऊन नुकसानीचे पंचनाम्याचे काम पूर्ण करतील, याचबरोबर तहसीलदार पातळीवरूनही प्रयत्न सुरू असल्याचे श्री. वाकुरे यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्ह्यात वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. नद्या दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडल्या आहेत. सततच्या पावसामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे. ऊस, भुईमूग, सोयाबीन, नाचणी, भात यांसह बहुतांश पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी मुंबईत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन केली. तसेच शेती नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा आणि बाधित शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी खासदार महाडिक यांनी श्री. पाटील यांच्याकडे केली आहे.

इतर ताज्या घडामोडी
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...