agriculture news in marathi, Startup to be held in every district of state says minister | Agrowon

प्रत्येक जिल्ह्यात स्टार्ट अपचे आयोजन
टीम अॅग्रोवन
सोमवार, 2 जुलै 2018

मुंबई : ग्रामीण भागात विविध नव संकल्पना उपलब्ध असून त्यांना योग्य ती संधी निर्माण करून देण्याच्या उद्देशाने प्रत्येक जिल्ह्यात राज्याच्या धर्तीवर स्टार्ट अप सुरू करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले. 

राज्य कौशल्य विकास व उद्योजकता विभाग आणि महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीमार्फत राबविण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र स्टार्ट अप’ सप्ताह २०१८ च्या सांगता समारंभात ते बोलत होते. या प्रसंगी एस बँक आणि कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांत सामंजस्य करार करण्यात आला.

मुंबई : ग्रामीण भागात विविध नव संकल्पना उपलब्ध असून त्यांना योग्य ती संधी निर्माण करून देण्याच्या उद्देशाने प्रत्येक जिल्ह्यात राज्याच्या धर्तीवर स्टार्ट अप सुरू करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले. 

राज्य कौशल्य विकास व उद्योजकता विभाग आणि महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीमार्फत राबविण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र स्टार्ट अप’ सप्ताह २०१८ च्या सांगता समारंभात ते बोलत होते. या प्रसंगी एस बँक आणि कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांत सामंजस्य करार करण्यात आला.

मुंबईत ‘महाराष्ट्र स्टार्ट अप’ सप्ताह, २५ ते २९ जूनपर्यंत आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहाच्या सांगता समारंभात १०० स्टार्ट अपची सादरीकरणासाठी निवड करण्यात आली होती. यातून प्रत्येक क्षेत्रातील तीन अशा २४ उत्कृष्ट कल्पनांची निवड स्टार्ट अप सुरू करण्यासाठी केली असून, या कार्यक्रमात निवडलेल्या २४ स्टार्ट अपना १५ लाखांपर्यंतच्या कामाचे कार्यादेश समारंभात प्रदान करण्यात आले. या वेळी ज्‍येष्ठ शास्त्रज्ञ तथा महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीचे सहअध्यक्ष रघुनाथ माशेलकर, एस बँकेच्या ग्लोबल हेड नमिता मिश्रा व इतर मान्यवर उपस्थित होते.

श्री. निलंगेकर म्हणाले, की २४ स्टार्ट अप हे फक्त कागदोपत्री नसून १५ लाखांची वर्क ऑर्डर देण्यात आली आहे, यात प्रत्येक बाबतीत पारदर्शकता आहे. १०० मधील उरलेल्या ७६ स्टार्ट अपना पुन्हा पुढील नव्या स्टार्ट अप सप्ताहात संधी मिळणार आहे. तर ज्‍येष्ठ शास्त्रज्ञ श्री. माशेलकर म्हणाले, ‘स्टार्ट अप’ सप्ताह २०१८ हा असा नावीन्यपूर्ण उपक्रम आहे जो जगाच्या इतिहासात पहिल्यांदा भारतातच नव्हे तर महाराष्ट्रात घडत आहे. चांगल्या विचारांबरोबर चांगली कृती असणे महत्त्वाचे असते, त्यामुळे उत्तम कृतीतून हा कार्यक्रम राबविण्यात आला आहे. विभागाचे सचिव असीम गुप्ता म्हणाले, ही कल्पना गेले सात महिने उत्तमरित्या राबविण्यात आली. त्यामुळे हे पहिले स्टार्ट अप पूर्ण झाले. 

२४ स्टार्ट अपची निवड
कृषी, शिक्षण व कौशल्य विकास, आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा व वाहतूक व्यवस्था, फीनटेक आणि सायबर सुरक्षा, शाश्वत विकास, गव्हर्नन्स आणि इतर अशा आठ क्षेत्रांतून स्टार्ट अपसाठी युवक तसेच सर्वांकडून २ हजार अर्ज मागविण्यात आले होते. त्यापैकी ९०० स्टार्ट अपनी नोंदणी केली होती. प्रत्येक क्षेत्रातील तीन अशा २४ उत्कृष्ट कल्पनांची स्टार्ट अप सुरू करण्यासाठी निवड केली गेली आहे. या २४ स्टार्ट अपना १५ लाख रुपयांपर्यंतची कंत्राटे शासनाकडून देण्यात येणार आहेत.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...