agriculture news in marathi, Startup will develope rural entrepreneurship says Minister Sambhaji Nilangekar | Agrowon

‘स्टार्टअप’च्या माध्यमातून ग्रामीण भागात नवीन उद्योजक
वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

मुंबई : स्टार्टअपच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान, तसेच नवनवीन संकल्पनांवर आधारित नवीन उद्योजक तयार करण्यात येत आहेत. यामध्ये शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील नवीन उद्योजक निर्माण करण्यात येणार असल्याचे कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी येथे सांगितले.

महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीमार्फत सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह-२०१८चे उद्‌घाटन कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते बुधवारी (ता. २५) सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते.

मुंबई : स्टार्टअपच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान, तसेच नवनवीन संकल्पनांवर आधारित नवीन उद्योजक तयार करण्यात येत आहेत. यामध्ये शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील नवीन उद्योजक निर्माण करण्यात येणार असल्याचे कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी येथे सांगितले.

महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीमार्फत सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह-२०१८चे उद्‌घाटन कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते बुधवारी (ता. २५) सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते.

मंत्री पाटील-निलंगेकर पुढे म्हणाले, की नवीन संकल्पना व तंत्रज्ञानावर उद्योजक निर्माण करण्याच्या दृष्टीने स्टार्टअप संकल्पना सुरू करण्यात आली आहे. या सप्ताहाअंतर्गत नावीन्यपूर्ण उत्पादन व सेवा यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येईल. स्टार्टअपअंतर्गत शिक्षण, कौशल्य, आरोग्य, शेती, स्वच्छ ऊर्जा, पर्यावरण, पाणी आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन, स्मार्ट पायाभूत सुविधा, दळणवळण, आर्थिक, सायबर सुरक्षा या क्षेत्राचा स्टार्टअप योजनेत समावेश आहे. या क्षेत्रातील नवउद्योजकांनी आपले अर्ज या सप्ताहात २५ ते ३१ मेपर्यंत महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीकडे पाठवावयाचे आहेत. यामधील १०० व्यवस्थापन/उद्योजक यांची निवड करून त्यांना निवड समितीपुढे सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे. यामधून प्रत्येक्ष क्षेत्रातील तीन असे एकूण २४ नवीन उद्योजकांची निवड करून त्यांना १५ लाखांपर्यंतच्या कामाचे कार्यादेश महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीमार्फत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर नवीन उद्योजकांना (स्टार्टअप) शासकीय यंत्रणेशी संपर्क व सहयोग पुढील १२ महिन्यांसाठी देण्यात येणार आहे.

परदेशात व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या वरील २४ उद्योजकांव्यतिरिक्त पाच ते दहा नवीन उद्योजकांना १५ लाखांपर्यंत आर्थिक साह्य परदेशात बाजारपेठ विकसित करण्यासाठी मदत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

या वेळी ‘स्टार्टअप धोरण’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले, तसेच महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी आणि टाटा ट्रस्ट फाउंडेशन यांच्यामध्ये स्टार्टअपसंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ई. रवींद्रन, व्हीएसटीएफच्या संचालिका श्वेता शालीन, टाटा ट्रस्ट फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज कुमार आदी उपस्थित होते.

नवीन उद्योजक तयार करण्याचे उद्दिष्ट
स्टार्टअपचे हे धोरण इतर राज्यांच्या धोरणापेक्षा व्यापक व उपयुक्त ठरणार आहे. नवीन उद्योजकांसाठी (स्टार्टअप) शासनाबरोबर काम करण्याची थेट संधी मिळणार आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातून नवीन उद्योजक तयार होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून पाच नवीन उद्योजक निवडून त्यांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन करण्यात येईल. नवीन उद्योजक तयार करण्याबरोबरच रोजगार व स्वयंरोजगार वाढविण्याचे उद्दिष्ट असल्याचे श्री. पाटील-निलंगेकर यांनी सांगितले. 

इतर ताज्या घडामोडी
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...