agriculture news in marathi, State Agri Department writes to CIB on pesticide issue | Agrowon

'त्या' किडनाशकांच्या बाबतीत पुनर्विचार करा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

कृषी विभागाचे सीआयबीकडे पत्राद्वारे साकडे
नागपूर : फवारणी दरम्यान विषबाधा झाल्याने राज्यात सुमारे ५१ जणांचे तर यवतमाळ जिल्ह्यात २२ जणांचे बळी गेले. त्या पार्श्‍वभूमीवर काही अतीजहाल किडनाशकांच्या बाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी केंद्रीय किडनाशक बोर्डाकडे (सीआयबी) करण्यात आल्याची माहिती, अवर मुख्य सचिव (कृषी) विजयकुमार यांनी दिली.

कृषी विभागाचे सीआयबीकडे पत्राद्वारे साकडे
नागपूर : फवारणी दरम्यान विषबाधा झाल्याने राज्यात सुमारे ५१ जणांचे तर यवतमाळ जिल्ह्यात २२ जणांचे बळी गेले. त्या पार्श्‍वभूमीवर काही अतीजहाल किडनाशकांच्या बाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी केंद्रीय किडनाशक बोर्डाकडे (सीआयबी) करण्यात आल्याची माहिती, अवर मुख्य सचिव (कृषी) विजयकुमार यांनी दिली.

यवतमाळ जिल्ह्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यानंतर संभ्रमावस्थेत असलेल्या शेतकऱ्यांच्या मानसिकतेचा फायदा घेत कृषी सेवा केंद्रातून त्यांना अतीजहाल आणि शिफारसीत नसलेल्या किडनाशकांची विक्री करण्यात आली. काही किडनाशक एकत्रित करण्याची शिफारस नसतानादेखील त्यांचे मिश्रण करून फवारण्यात आले. या सर्वांच्या परिणामी विषबाधा झाल्याने एकट्या यवतमाळ जिल्ह्यात २२ शेतकऱ्यांचे बळी गेले.
राज्यात फवारणी दरम्यान मरणाऱ्यांची संख्या ५१ वर पोचली. त्यानंतर कृषी विभागाकडून झाडाझडती घेत तब्बल पाच किडनाशकांवर बंदी घालण्यात आली.

६० दिवसांच्या बंदीनंतर पुन्हा नव्याने ३० दिवसांची बंदी लादण्यासंदर्भाने अहवाल कृषी आयुक्‍तालयाकडे पाठविण्यात आला आहे. परंतु अद्याप कृषी आयुक्‍तालय स्तरावरून त्यास मान्यता मिळाली नाही. सध्या हंगाम नसल्याने हे घडल्याचे सूत्र सांगतात. हंगामाच्या सुरवातीला या पाच जहाल किडनाशकावर पुन्हा ३० दिवसांची बंदी लादली जाण्याची शक्‍यता असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

केंद्राच्या अखत्यारितील प्रश्‍न
राज्य सरकारला किडनाशकांवर केवळ ९० दिवसांची बंदी लादण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम करणाऱ्या काही किडनाशकांच्या बाबतीत केंद्रीय किडनाशक बोर्डाने पुनर्विचार करावा, अशी मागणी राज्याच्या कृषी विभागाने केली आहे. पंधरवाड्यापूर्वी ही मागणी करण्यात आली, परंतु या संदर्भात अद्याप कोणतीच माहिती व खुलासा अद्याप सीआयबीकडून झाला नसल्याचे सूत्र सांगतात. किडनाशक लॉबी मोठी असल्याने त्यांच्यावर बंदी लादण्यासाठी अनेकजन धजत नसल्यामुळे सीआयबीला निर्णय घेणे कठीण होते, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले. 

इतर अॅग्रो विशेष
पाणी व्यवस्थापनासाठी सूक्ष्मजीवांचा...पाणी व्यवस्थापन म्हटले, की आपल्या डोळ्यासमोर ठिबक...
शिवरायांच्या आदर्शावर राज्य कारभार सुरू...पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
वनक्षेत्राने वेढलेल्या भागामध्ये...कृषी क्षेत्रानजीक वनक्षेत्र असलेल्या परिसरामध्ये...
चारा छावण्या लांबणीवरमुंबई: राज्यात दुष्काळ तीव्र होत चालला असला...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ होत...
खरीप पीकविमा परतावाप्रश्नी उच्च...परभणी: परभणी जिल्ह्यात २०१७ च्या खरिपातील...
शेतकरी आठवडे बाजारातून विस्तारताहेत...संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी...
मार्केटच्या अभ्यासातून गुलाब शेतीत...निमगाव (ता. राहाता) येथील हर्षल प्रभात पाटील या...
आजचा चंद्र हा सर्वांत जवळ : 'ग्रेट...या वर्षी जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या...
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...
वनहक्काच्या ४३ हजारांहून अधिक...मुंबई : राज्यात मागील अवघ्या तीन महिन्यांत...
खानदेशात मका दरात वाढजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...