agriculture news in Marathi, State Agriculture department to burn illegal HT cotton seed | Agrowon

एचटी कपाशीचे बियाणे कृषी विभाग जाळणार
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 मे 2018

नागपूर : एका खासगी कंपनीच्या धानोरा (जि. बुलडाणा) येथील गोदामात जप्त करण्यात आलेल्या अनधिकृत एचटी कपाशी बियाण्यांच्या भस्मीकरणाला राज्यस्तरीय पर्यावरण समितीने मान्यता दिली आहे. परिणामी लवकरच हा साठा पर्यावरण नियमांच्या अाधीन राहून जाळण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. 

नागपूर : एका खासगी कंपनीच्या धानोरा (जि. बुलडाणा) येथील गोदामात जप्त करण्यात आलेल्या अनधिकृत एचटी कपाशी बियाण्यांच्या भस्मीकरणाला राज्यस्तरीय पर्यावरण समितीने मान्यता दिली आहे. परिणामी लवकरच हा साठा पर्यावरण नियमांच्या अाधीन राहून जाळण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. 

कंपनीच्या धानोऱ्यातील गोदामांच्या झाडाझडतीत गुणवत्ता नियंत्रण शाखेला अनधिकृत एचटी बियाण्यांचा मोठा साठा मिळाला होता. मोजणी केली असता गोदामात एकूण ९५ हजार ८६३ क्‍विंटल बियाणे असल्याचा खुलासा झाला. त्यामध्ये ४३६ क्‍विंटल हरभरा, बाजरी, मका, करडी, बोरू याचे बियाणे एकूण ९ हजार २४ क्‍विंटल, गहू तसेच इतरही बियाणे होते. कपाशीचे एकूण बियाणे ५९ हजार ६९७ क्‍विंटल मिळाले होते. छापेमारीत हे सर्व बियाणे जप्त करण्यात आले.  

या बियाण्यांची किंमत एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी फौजदारी कारवाई करण्यात आल्यानंतर बियाणे आणि गोदामही सील करण्यात आले. दरम्यान कंपनीने बियाणे गोदाम वापराकरिता खुले करून मिळावे, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. न्यायालयाने कंपनीची बाजू ग्राह्य धरीत कृषी विभागाला गोदाम खुले करण्याचे आदेश दिले आहेत. 

अनधिकृतची माहिती नाही...
बियाणे कायद्यानुसार अनधिकृत किंवा विनापरवाना असलेले बियाणे जाळण्याची तरतूद आहे. कृषी सचिव बिजयकुमार यांच्या  अध्यक्षतेत आठवडाभरापूर्वी या संदर्भाने मुंबईत बैठक झाली. या बैठकीला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ आणि अमरावती विभागीय गुणवत्ता नियंत्रण अधिकारी उपस्थित होते. एका कंपनीच्या बियाण्यांची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेवर यात चर्चा झाली. त्याकरिता राज्यस्तरीय पर्यावरण समितीची परवानगी लागते, असे सांगण्यात आले. त्यानुसार राज्यस्तरीय पर्यावरण समितीने याला मान्यता दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आता लवकरच बियाणे जाळण्याच्या प्रक्रियेची अंमलबजावणी होणार आहे. कपाशीच्या एकूण ५९ हजार ६९७ क्‍विंटल बियाण्यांपैकी किती बियाणे अनधिकृत होते; याची माहिती मात्र कृषी विभागाने दिली नाही.

कंपनीच्या गोदामात जप्त बियाण्यांची विल्हेवाट लावण्याला पर्यावरण समितीने मान्यता दिली आहे. बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी होईल.
- एम. एस. घोलप, संचालक, निविष्ठा व गुण नियंत्रण, महाराष्ट्र राज्य.
 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...