agriculture news in Marathi, state award function will be soon, Maharashtra | Agrowon

राज्य कृषी पुरस्कार वितरणाची जय्यत तयारी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

पुणे  : कृषी खात्याचे राज्यस्तरीय शेतकरी पुरस्कार वितरण सोहळ्याची कृषी आयुक्तालयात जय्यत तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे प्रत्येक पुरस्कारार्थी शेतकऱ्यासाठी एक संपर्काधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. 

पुणे  : कृषी खात्याचे राज्यस्तरीय शेतकरी पुरस्कार वितरण सोहळ्याची कृषी आयुक्तालयात जय्यत तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे प्रत्येक पुरस्कारार्थी शेतकऱ्यासाठी एक संपर्काधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून सतत लांबणीवर पडलेले कृषी खात्याचे पुरस्कार वाटण्यासाठी अखेर मुहूर्त सापडला आहे. १४ फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलमधील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. कृषी व फलोत्पादन क्षेत्रात राज्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कार दिले जातात. कृषी खात्यात उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनादेखील पुरस्काराने गौरविले जाते. 

कृषी खात्याच्या या पुरस्कारांबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता असते. मात्र, २०१५ आणि २०१६ चे पुरस्कार वाटले गेले नव्हते. कृषी सचिव एकनाथ डवले यांनीच पुढाकार घेत पुरस्काराच्या संकल्पनेला पुढे नेण्यासाठी हालचाली करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सोहळ्यासाठी राज्यपाल सी विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. नवे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी पदभार घेताच सर्वांत आधी या सोहळ्याच्या पूर्वतयारीची माहिती घेतली. 

आयुक्तांनी बालेवाडीत जाऊन अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. कृषिमंत्री चंद्रकांतदादा पाटील व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे दोघेही या सोहळ्याचे निमंत्रक आहेत. याशिवाय अन्न व नागरी पुरवठा आणि संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे आणि मदत व पुनर्वसनमंत्री दिलीप कांबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

२०१५ मधील ५५ आणि २०१६ मधील ५७ पुरस्कारार्थी शेतकरी या सोहळ्यासाठी उपस्थित असतील. त्यासाठी कृषी विभागाने प्रत्येक पुरस्कारार्थीला थेट गावापासून बालेवाडीपर्यंत आणि तेथून पुन्हा गावापर्यंत एक संपर्काधिकारी दिला आहे. पुरस्कारार्थी शेतकरी १३ फेब्रुवारीला दुपारी पुण्यात दाखल होणार आहेत. कृषिमंत्री, कृषिसचिव तसेच कृषी आयुक्तांसोबत शेतकरी स्नेहभोजन घेणार आहेत. राज्यपालांच्या हस्ते मानचिन्ह, शाल, श्रीफळ तसेच साडीचोळी, कुंकवाचा करंडा देत शेतकऱ्याचा सपत्नीक सत्कार केला जाणार आहे. तसेच, विविध पुरस्कारानुसार २५ ते ७५ हजारांपर्यंत रक्कम शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.

इतर बातम्या
सांगलीतील ९० टक्के द्राक्ष हंगाम उरकलासांगली : जिल्ह्यातील यंदाचा द्राक्ष हंगाम ९०...
फरारी द्राक्ष व्यापाऱ्यास शेतकऱ्यांनी...नाशिक  ः चालू वर्षाच्या हंगामात जिल्ह्यातील...
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील प्रचार...औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील...
सध्याचे सरकार म्हणजे लबाडाचे आवतन : पवारनगर : सध्याचे केंद्र सरकार म्हणजे लबाडाचे आवतन...
परभणीत वांगी प्रतिक्विंटल १००० ते २५००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
मतदान केंद्रावरील रांगेपेक्षा...सोलापूर  : सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वत्र...
अवकाळीचा सोलापूर जिल्ह्याला मोठा फटकासोलापूर : जिल्ह्याला गेल्या चार महिन्यांत अधून-...
मंठा तालुक्यात वादळी वाऱ्याने नुकसानमंठा, जि. जालना  : तालुक्यात मंगळवारी ( ता....
पुणे विभागातील दोन लाख हेक्टरवरील ऊस...पुणे  ः गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पुणे...
मराठवाड्यातील मतदान टक्केवारीत किंचित घटबीड, परभणी : मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद,...
सातारा जिल्‍ह्यातील ऊस उत्पादकांना...सातारा  ः जिल्ह्यातील सह्याद्री कारखान्याचा...
म्हैसाळ योजनेत २२ पंपांद्वारे उपसासांगली : म्हैसाळ योजनेच्या पंपांची संख्या विक्रमी...
दिग्गजांच्या सभांनी तापणार साताऱ्यातील...सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातील राजकीय...
‘सन्मान'च्या लाभार्थ्यांबाबत प्रशासन...गोंदिया : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ...
प्रभावी अपक्ष उमेदवारांमुळे लढती रंगतदारमुंबई : राज्यात तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील २१...
धनगर समाज भाजपच्याच पाठीशी ः महादेव...सांगली  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच...
चैत्र यात्रेनिमित्त भाविकांनी दुमदुमला...ज्योतिबा डोंगर, जि. कोल्हापूर  : ‘...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींमुळे...
‘ॲग्रोवन'चा आज १४वा वर्धापन दिन; जल...पुणे : लाखो शेतकऱ्यांच्या कुटुंबातील घटक बनलेल्या...
यंदा बीटी कापूस बियाणे मुबलक : कृषी...पुणे : राज्याच्या कापूस उत्पादक भागातील...