राज्य बॅंकेने घटविले ४०० रुपयांनी मूल्यांकन

राज्य बॅंकेने घटविले ४०० रुपयांनी मूल्यांकन
राज्य बॅंकेने घटविले ४०० रुपयांनी मूल्यांकन

कोल्हापूर  : एकीकडे साखर साठ्यावरील निर्बंध उठविल्याने कारखानदारांत समाधान असतानाच दुसरीकडे राज्य बॅंकेने कारखान्यांना बॅंकेकडून मिळणाऱ्या उचलीत १७० रुपयांनी कपात केली आहे. गेल्या महिनाभरात कारखानदारांना मिळणाऱ्या रकमेत पोत्यामागे केलेली तब्बल ४०० रुपयांची कपात कारखानदारांसाठी डोकेदुखी ठरली आहे. त्यात बॅंकेच्या या निर्णयामुळे केंद्राने घेतलेला साठ्यावरील निर्बंध उठविल्याचा आनंद फिका पडल्याचे वातावरण साखर पट्ट्यात होते.

हंगाम सुरू झाल्यानंतर राज्य बॅंक साधारणपणे तीन महिन्यांचा कालावधी गृहीत धरून साखरेचा बाजारभाव ठरविते, पण अलीकडच्या काळात साखरेचे दर आठवड्याच्या कालावधीत बदलत असल्याने राज्य बॅंकेनेही आपले धोरण लवचिक केले. पंधरा दिवस अथवा त्याहून अधिक कमी कालावधीमध्ये साखरेचे दर पाहून मूल्यांकनातही बदल केला आहे. यापूर्वी २३ नोव्हेंबरला ११० रुपये, ७ डिसेंबरला १२० रुपयांची कपात केली होती. आता पुन्हा मंगळवारी (ता. १९) कपात केली आहे. यामुळे कारखानदारांच्या हिशेबावरच परिणाम झाला आहे.  

निर्बंध उठविण्याचे परिणाम भविष्यात तर कपातीचे तत्काळ केंद्राने साखर साठ्याबाबतचे निर्बंध उठविल्याने आता व्यापारी जादा प्रमाणात कारखान्यांकडून साखर खरेदी करतील, यामुळे मंदीचे वातावरण काही प्रमाणात निवळेल अशी शक्‍यता आहे. पण ही प्रक्रिया तत्काळ होणार नाही, असे साखर उद्योगातील तज्ज्ञांचे मत आहे. सध्या साखरेचा दर कमी असल्याने दर पुन्हा कमी होतील या शक्‍यतेने व्यापारी तातडीने साखर खरेदी करतील का याबाबत साशंकता आहे.

तफावतीची सांगड घालायची कशी?

मूल्यांकनावर उचल ठरते. राज्य बॅंकेच्या नव्या मूल्यांकनानुसार साखरेचे मूल्यांकन प्रतिक्विंटल ३१०० रुपये निश्‍चित करण्यात आले. त्यापैकी ८५ टक्के म्हणजे २६३५ रुपये प्रत्यक्ष उचल मिळेल. यातून हप्ते व प्रक्रिया खर्च वजा जाता उसाच्या उचलीसाठी प्रतिक्विंटल १८८५ रुपयेच मिळणार आहेत. ही उचल चालू साखर साठ्यावरच मिळणार असल्याने आता मिळणारी रक्कम आणि एफ.आर.पी.प्रमाणे मंजूर केलेली रक्कम यात मोठी तफावत राहण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. आता ही सांगड कशी घालायची या चिंतेत कारखानदार आहेत. गेल्या महिन्याच्या कालावधीत ४०० रुपयांची तूट भरून काढण्याचे मोठे आव्हान आमच्यापुढे असल्याचे एका कारखानदाराने सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com