agriculture news in Marathi, state bank increased in sugar valuation by 100 rupees, Maharashtra | Agrowon

राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात १०० रुपयांनी वाढ
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री मूल्य २९०० वरून ३१०० केल्यानंतर आता राज्य सहकारी बॅंकेनेही सकारात्मक भूमिका घेताना साखरेच्या मूल्यांकनाच्या दरात १०० रुपयांनी वाढ केली आहे. यापूर्वी बॅंकेने साखरेचे मूल्यांकन ३००० रुपये केले होते. या नव्या दरामुळे कारखान्यांना बॅंकेकडून प्रतिक्विंटल २६३५ रुपये इतकी उचल मिळू शकेल. मूल्यांकनाच्या ९० टक्के म्हणजे प्रक्रिया व बॅंक वसुलीचे ७५० रुपये वजा जाता कारखान्यांना १८८५ रुपये मिळू शकतील.

कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री मूल्य २९०० वरून ३१०० केल्यानंतर आता राज्य सहकारी बॅंकेनेही सकारात्मक भूमिका घेताना साखरेच्या मूल्यांकनाच्या दरात १०० रुपयांनी वाढ केली आहे. यापूर्वी बॅंकेने साखरेचे मूल्यांकन ३००० रुपये केले होते. या नव्या दरामुळे कारखान्यांना बॅंकेकडून प्रतिक्विंटल २६३५ रुपये इतकी उचल मिळू शकेल. मूल्यांकनाच्या ९० टक्के म्हणजे प्रक्रिया व बॅंक वसुलीचे ७५० रुपये वजा जाता कारखान्यांना १८८५ रुपये मिळू शकतील.

बॅंकेने हे नवे परिपत्रक शनिवारी सायंकाळी कारखान्यांना पाठविले आहे. या पत्रात केंद्राने खुल्या साखरेच्या विक्री दरात वाढ केल्यानेच बॅंकही मूल्यांकनात वाढ करीत असल्याचे स्पष्ट म्हटले आहे. केंद्राच्या निर्णयानंतर बॅंकेच्या संचालक मंडळात झालेल्या बैठकीनंतर मूल्यांकनवाढीचा निर्णय घेण्यात आला. यामुळे आता कारखानदारांना काहीसा मिळण्याची शक्‍यता आहे. यापूर्वी राज्य बॅंकेने ७ डिसेंबरला ३००० रुपये दर गृहीत धरले होते. आता यात वाढ केल्याचे बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजित देशमुख यांनी पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात साखर दरवाढीबाबत हालचाली सुरू झाल्याने कारखानदारांमध्येही लगबग सुरू झाली आहे. सध्या अनेक कारखान्यांचे हंगाम हे अंतिम टप्प्यात येत आहेत.
विशेष करून दक्षिण महाराष्ट्रात अजून पंधरा दिवस ते तीन आठवड्यापर्यंत हंगाम चालेल अशी शक्‍यता आहे. यामुळे हंगाम संपण्याच्या अगोदर किती रक्कम देता येईल याबाबतचे ठोकताळे कारखाना पातळीवर घालण्यात येत आहेत. अनेक कारखान्यांनी गोळा बेरीज करून एफआरपीची रक्कम देण्याची तयारी केली आहे. 

कारखाने साखर विक्रीस सकारात्मक
पहिल्या हप्त्यातील उर्वरित रक्कम देण्यासाठी पैशाची जुळवाजुळव कारखाना पातळीवरून सुरू आहे. पहिल्या हप्त्यासाठी पैशाची गरज असल्याने कारखानेही तातडीने साखर विक्रीबाबत सकारात्मक होऊन साखर विक्रीसाठी तातडीने प्रयत्न करतील, अशी शक्‍यता साखर उद्योगातून व्यक्त होत आहे. राज्य बॅंकेने मूल्यांकन वाढविल्याने याचा सकारात्मक परिणाम एफआरपीची रक्कम देण्यावर होऊ शकतो, असे कारखाना सूत्रांनी सांगितले.

 

 

इतर अॅग्रो विशेष
उद्योगाला साखर कडूचमहाराष्ट्रातील गळीत हंगामाची सांगता नुकतीच झाली...
‘एफआरपी'साठी शेतकरी संघटना पुन्हा...सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या...
विदर्भात उत्कृष्ट व्यवस्थापन असलेली २३...वर्धा जिल्ह्यात केळी पिकाला पुन्हा गतवैभव प्राप्त...
भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांची पुनर्वसन...पुणे : भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांसाठी पुनर्वसनाची...
वर्षभरात पाच हंगामात दर्जेदार कोथिंबीरपाणी व हवामान यांचा विचार करून वर्षभरात सुमारे...
राज्यात आता पीकविमा शेतकरी सहभाग अभियानपुणे: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी यंदा...
छावण्यातील जनावरांची आठवड्यातून एकदा...मुंबई ः दुष्काळी भागातील चारा छावण्यांमधील...
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला मागणीकोल्हापूर: निर्यातीच्या बाबतीत पिछाडलेल्या...
शुक्रवारपर्यंत उष्ण लाटेचा इशारापुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने चटका असह्य...
आखातात १८ हजार टन केळी निर्यातजळगाव ः मागील दोन महिन्यांत राज्यातून प्रतिदिन १५...
मॉन्सून एक्सप्रेसची गती मंदावली;...पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (...
कृषी विभागाच्या बदल्या यंदाही...पुणे : कृषी विभागातील बदल्यांचा घोडेबाजार...
एकनाथ डवलेंकडे कृषी सचिवपदाचा पूर्णवेळ...मुंबई : मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले...
परभणी : दुष्काळाच्या फेऱ्यात फळबागा...परभणी ः जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढल्यामुळे...
पूरक धोरणानेच वाढेल निर्यातकें द्रातील मोदी सरकारच्या सुरवातीच्या काळात...
निवडणूक आयोगाला घरचा आहेर! सतरावी लोकसभा निवडण्यासाठीची मतदान प्रक्रिया कालच...
विरोधी पक्षनेता आज ठरणार; पृथ्वीराज...नागपूर ः राधाकृष्ण विखे पाटील यांच्या...
कृषी निविष्ठांमध्ये हवी मधमाशीपुणे : पीक उत्पादनात अत्यंत मोठा हातभार असलेल्या...
विषबाधा नियंत्रणाची जबाबदारी आता...यवतमाळ : जिल्ह्यात फवारणीदरम्यान झालेल्या विषबाधा...
उन्हाचा चटका अन् उकाड्यातही वाढपुणे : विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरीसह मध्य...