agriculture news in Marathi, In the state, the brinjal per quintal 400 to 3000 rupees | Agrowon

राज्यात वांगी प्रतिक्विंटल ४०० ते ३००० रुपये
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

नाशिकला प्रतिक्विंटल १२०० ते ३००० रुपये

नाशिकला प्रतिक्विंटल १२०० ते ३००० रुपये
नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १०) वांग्याची आवक १५५ क्विंटल झाली होती. त्यास प्रतिक्विंटल १२०० ते ३००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २२०० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. मंगळवारी (ता. ९) वांग्याची आवक १२६ क्विंटल झाली. तिला १७०० ते ३५०० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २३५० रुपये होता. सोमवारी (दि. ८) वांग्याची आवक १६६ क्विंटल झाली. तिला १५०० ते ३००० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २२५० मिळाला. शुक्रवारी (ता. ५) वांग्याची आवक २९१ क्विंटल झाली. तिला ७०० ते २००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १५५० होते. गुरुवारी (ता. ४) वांग्याची आवक २८४ क्विंटल झाली. तिला १५०० ते ४००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३३५० होते. मागील आठवड्यापासून बाजार समितीत वांग्याची आवक चांगली होती. गेल्या तीन दिवसांत आवक मंदावली असून त्यानुसार सर्वसाधारण आहे. बाजारात होत असलेल्या आवकेच्या कमी जास्त प्रमाणामुळे बाजारभावतही चढ उतार दिसून आली आहे.

सोलापुरात प्रतिक्विंटलला ४०० ते २१०० रुपये 
सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांग्याची आवक कमी राहिली. पण, वांग्याला चांगला उठाव राहिला. वांग्याला प्रतिक्विंटलला किमान ४०० रुपये, सरासरी १२०० रुपये आणि सर्वाधिक २१०० रुपये असा दर राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांग्याची आवक रोज २० ते ५० क्विंटलपर्यंत आवक राहिली. वांग्याची आवक स्थानिक भागातूनच राहिली. सध्या पाणीटंचाईने आवक कमीच आहे. शिवाय त्यात अनेकवेळा सातत्यही राहिलेले नाही. या आधीच्या सप्ताहातही आवक जेमतेम २० ते ३० क्विंटलपर्यंत राहिली. वांग्याला प्रतिक्विंटलला किमान ३५० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २४०० रुपये असा दर राहिला. मार्चच्या शेवटच्या आठवड्यातही वांग्याला प्रतिक्विंटलला किमान ४५० रुपये, सरासरी १३०० रुपये आणि सर्वाधिक २२०० रुपये असा दर मिळाला. किरकोळ १०० ते २०० रुपयांचा चढ-उतार वगळता वांग्याचे दर काहीसे स्थिर राहिले.

जळगावात प्रतिक्विंटल ७५० ते १३५० रुपये 
जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लहान काटेरी वांग्यांची आवक स्थिर असून, मागील सात-आठ दिवस प्रतिदिन नऊ क्विंटल आवक झाली. गुरुवारी (ता. ११) वांग्यांना प्रतिक्विंटल ७५० ते १३५० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. हिरव्या, काटेरी वांग्यांना अधिकचा उठाव आहे. आवक जामनेर, पाचोरा, एरंडोल, जळगाव भागांतून होत आहे. सध्या लग्नसराई व इतर कार्यक्रमांनिमित्त बाजारातून मोठे ग्राहक थेट खरेदी करून घेत आहेत. यामुळे उठाव आहे. काळ्या, काटेरी वांग्यांची आवक कमी आहे. त्यांना मागणीदेखील कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गुलटेकडीत प्रतिक्विंटल ६०० ते १५०० रुपये दर
पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध प्रकारच्या वांग्याची सुमारे १० टेम्पो आवक झाली होती. या वेळी दहा किलोला ६० ते १५० रुपये दर होता. सध्या वांग्याची आवक जास्त असून, मागणी नसल्याने दर कमी असल्याचे ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी सांगितले. तर सध्या सुट्यांचा हंगाम असून, शहरातील खानावळी काही प्रमाणात बंद झाल्याने त्यांच्याकडून देखील मागणी कमी झाल्याचा परिणाम मागणीवर झाला आहे. असेही भुजबळ यांनी नमूद केले.

परभणीत प्रतिक्विंटल ५०० ते १२०० रुपये
परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. ११) वांग्याची ८० क्विंटल आवक होती. वांग्याला प्रतिक्विंटल ५०० ते १२०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.सध्या येथील मार्केटमध्ये स्थानिक परिसरातील सिंगणापूर, पोखर्णी, बोरवंड, आर्वी, कोक आदी गावांतून वांग्याची आवक होत आहे. गत महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी वांग्याची ४० ते ८० क्विंटल आवक झाली. त्यावेळी सरासरी प्रतिक्विंटल ५०० ते २००० रुपये दर मिळाले.   गुरुवारी (ता. ११) वांग्याची ८० क्विंटल आवक झाली असताना घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल ५०० ते १२०० रुपये होते. तर किरकोळ विक्री प्रतिकिलो २० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

सांगलीत प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये
सांगली ः येथील शिवाजी मंडईत गतसप्ताहापेक्षा चालू सप्ताहात वांग्याच्या आवकेत वाढ झाली आहे. गुरुवारी (ता. ११) वांग्याची ९० ते १०० क्रेट (एक क्रेट २० किलोचे) आवक झाली असून त्यास प्रतिदहा किलोस १०० ते १५० रुपये असा दर होता. शिवाजी मंडईत आष्टा, दुधगाव, कवठेपिरान, तुंग, कर्नाळ, मिरज, पलूस, वाळवा, यासह कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातून वांग्याची मोठ्या प्रमाणात आवक होते. बुधवारी (ता. १०) वांग्याची १०० ते १२० क्रेट वांग्याची आवक झाली होती. वांग्यास प्रतिदहा किलोस १०० ते १५० रुपये असा दर मिळाला. मंगळवारी (ता. ९) वांग्याची १२० ते १५० क्रेट आवक झाली असून त्यास प्रतिदहा किलोस ८० ते १२० रुपये असा दर होता. सोमवारी (ता. ८) वांग्याची ९० ते १२० क्रेट आवक झाली होती. वांग्यास प्रतिदहा किलोस १०० ते १५० रुपये असा दर होता.  सध्या वांग्याची आवक वाढली असल्याने दर कमी झाले आहेत, अशी माहिती व्यापाऱ्यांनी सांगितले. पुढील सप्ताहात वांग्याची आवक आणि दर स्थिर राहतील, असा अंदाज व्यापारी वर्गाने वर्तविला आहे.

अकोल्यात प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये 
अकोला ः लग्नसराईचा काळ सुरू झालेला असल्याने येथील अकोला जनता बाजारात वांग्यांना चांगली मागणी होत आहे. वांगे सध्या प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये क्विंटल दराने विकत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांकडून देण्यात आली. येथील जनता भाजी बाजारात या सप्ताहात वांग्यांची आवक रोज दोन टनांपेक्षा अधिक होत आहे. तर दर प्रतिक्विंटल किमान १००० ते १८०० दरम्यान मिळत होता. सरासरी १५०० रुपयांचा दर आहे. या आधीच्या सप्ताहात अशाच प्रकारचे दर मिळत होते. आवक कमी वाढल्यास दरांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. पुढील आठवड्यापासून लग्नसराई आणखी वाढत असल्याने मागणीत सुधारणा होईल. सध्या किरकोळ विक्री प्रतिकिलो ३० ते ४० रुपये दराने केली जात आहे.

औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल १२०० ते १५०० रुपये 
औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत पंधरवड्यात वांग्याची आवक व दरात चढ-उतार राहिला. गुरुवारी (ता. ११) वांग्यांची ३९ क्‍विंटल आवक झाली. या वांग्यांना प्रतिक्‍विंटलचा १२०० ते १५०० रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. औरंगाबाद बाजार समितीमध्ये २० मार्चला २३ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याचे दर १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २६ मार्चला ५२ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला १००० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३० मार्चला वांग्याची आवक २३ क्‍विंटल तर दर १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ८ एप्रिलला ४८ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला ६०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ९ एप्रिलला वांग्याची आवक २७ क्‍विंटल तर दर ९०० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १० एप्रिलला २८ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

नगरमध्ये प्रतिक्‍विंटल ५०० ते २५०० रुपये
नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी वांग्याची ७४ क्विंटल आवक झाली. वांग्याला प्रतिक्विंटल ५०० ते अडीच हजार रुपये व सरासरी दीड हजार रुपये दर मिळाला. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या महिनाभरात वांग्याची आवक आणि दर स्थिर आहेत.  नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत ३ एप्रिल रोजी ६३ क्विंटल वांग्याची आवक होऊन ५०० ते अडीच हजार रुपये व सरासरी दीड हजार रुपयांचा दर मिळाला. २८ एप्रिल रोजी ५५ क्विंटलची आवक होऊन ५०० ते अडीच हजार रुपये व सरासरी दीड हजार रुपयांचा दर मिळाला. २१ एप्रिल रोजी ४४ क्विंटलची आवक होऊन ५०० ते ३००० रुपये व सतराशे रुपयांचा सरासरी दर मिळाला. १७ एप्रिल रोजी ६१ क्विंटल आवक होऊन पाचशे ते तीन हजार रुपये व सरासरी सतराशे पन्नास रुपयाचा दर मिळाला. सात एप्रिल रोजी ३६ क्विंटलची आवक होऊन ५०० ते ३००० रुपये व सरासरी १७५० रुपयांचा दर मिळाला. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नगरसह शेजारच्या जिल्ह्यातून वांग्याची आवक होत आहे. वांग्याला मागणी असली, तरी गेल्या महिनाभराच्या तुलनेमध्ये दर स्थिर आहेत, असे बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले.

इतर बाजारभाव बातम्या
नाशिकमध्ये टरबूज प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिकमध्ये टरबुजाची आवक ९६० क्विंटल झाली...
पुण्यात कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरचीचे दर...पुणे  : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत कोबीला प्रतिक्विंटल १२०० ते २०००...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात वांगी प्रतिक्विंटल ५०० ते ३०००...साताऱ्यात १५०० ते २००० रुपये सातारा येथील...
जळगावात आले प्रतिक्विंटल ३००० ते ७०००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक : नाशिकमध्ये ढोबळी मिरचीची आवक १६३...
सोलापुरात कांदा दरात किंचित सुधारणासोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे बाजार समितीत श्रावण घेवडा,...पुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
राजस्थान, मध्य प्रदेशातून गव्हाच्या...जळगाव : बाजार समितीमधील किरकोळ व घाऊक विक्रेते,...
परभणीत काकडीला प्रतिक्विंटल ७०० ते १५००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात लिंबू प्रतिक्विंटल ८०० ते ६०००...जळगावात २४०० ते ४००० रुपये  जळगाव : कृषी...
कोल्हापुरात टोमॅटोला प्रति दहा किलोस ५०...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
सोलापुरात मेथी, शेपूला उठाव, दरात...सोलापूर  : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात केळीच्या दरात ६० रुपयांनी...जळगाव  ः खानदेशात केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मानवत बाजार समितीत उद्यापासून हळद खरेदीमानवत, जि. परभणी ः मानवत येथील कृषी उत्पन्न बाजार...
अक्षय तृतीयेनिमित्त आंब्याला मागणीपुणे ः मंगळवारी (ता. ७) साजऱ्या होणाऱ्या अक्षय...
औरंगाबादेत आंबा ४ हजार ते १० हजार रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत शेवग्याला प्रतिक्विंटल १५०० ते...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात काकडी प्रतिक्विंटल ५०० ते १९००...अकोल्यात प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये अकोला ः...