agriculture news in marathi, state co_operative bank | Agrowon

राज्य बॅंकेकडून साखर तारण कर्जाचा दुरावा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 जून 2018

कोल्हापूर : राज्य बँकेने मालतरण कर्जासाठी आवश्‍यक असणारा दुरावा हा १५ टक्क्यांवरून १० टक्के आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे साखर कारखान्यांना साखर मालतारणापोटी २९०० रुपये इतक्‍या दरावर १० टक्के दराने २६१० रुपये इतकी रक्कम कर्जापोटी जमा होईल, अशी माहिती राज्य बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली राज्य बॅंकेने मूल्यांकनात नुकतीच प्रति क्विंटल २०० रुपयांनी वाढ केली आहे. यामुळे २७०० रुपयांवरून मूल्यांकन २९०० रुपये इतके झाले आहे. 

कोल्हापूर : राज्य बँकेने मालतरण कर्जासाठी आवश्‍यक असणारा दुरावा हा १५ टक्क्यांवरून १० टक्के आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे साखर कारखान्यांना साखर मालतारणापोटी २९०० रुपये इतक्‍या दरावर १० टक्के दराने २६१० रुपये इतकी रक्कम कर्जापोटी जमा होईल, अशी माहिती राज्य बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली राज्य बॅंकेने मूल्यांकनात नुकतीच प्रति क्विंटल २०० रुपयांनी वाढ केली आहे. यामुळे २७०० रुपयांवरून मूल्यांकन २९०० रुपये इतके झाले आहे. 

साखर उद्योगाला सावरण्यासाठी राज्य बॅंकेनेही पावले आश्‍वासक पावले उचलली आहेत. यामुळे येणारा कारखान्यांचा हंगाम नक्कीच समाधानकारक जाईल असा आशावाद त्यांनी वयक्त केला. २६१० रुपयांतून कारखान्यांना येणे कर्जापोटी ५०० रुपये अधिक प्रक्रिया कर्जापोटी २५० अशी ७५० रुपये वजावट करून १८६० रुपये कारखान्यांना उपलब्ध होईल. यापुढे जाऊन बॅंकेने आणखीन एक चांगला निर्णय घेतला आहे. साखर मालतारण कर्जापोटी राखून ठेवलेल्या १० टक्के दुराव्याची रक्कम संबंधित कारखान्यांना हवी असल्यास त्यांनी त्या पोटी कारखान्याची किंवा कारखान्याच्या संचालकांची अतिरिक्त मालमत्ता राज्य बॅंकेच्या तारणात दिल्यास त्यांना साखर मालतारणापोटी शंभर टक्के देण्याचाही निर्णय घेतला आहे. राज्य बॅंकेने साखर दर वाढताच तातडीने मूल्यांकन वाढविले. याचा फायदा पुढील गळितास होणार आहे. पुढील हंगामासाठी पूर्वहंगामी कर्ज देणे राज्य बॅंकेस शक्‍य होणार असल्याने कारखाने वेळेत सुरू होऊन पुढचा गळीत हंगाम सुरळीत राहू शकेल, असे श्री. अनास्कर यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...