agriculture news in marathi, State cooperative Union election postponed | Agrowon

राज्य सहकारी संघ पदाधिकारी निवडणूक गोंधळामुळे स्थगित
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 मार्च 2018

पुणे  : महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पदाधिकारी निवडणूक प्रक्रियेदरम्यान एका कार्यकर्त्याने रिव्हॉल्व्हर दाखवल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊन निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली. या संदर्भात बंडगार्डन पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी चारपर्यंत सुरू होती. 

पुणे  : महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पदाधिकारी निवडणूक प्रक्रियेदरम्यान एका कार्यकर्त्याने रिव्हॉल्व्हर दाखवल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊन निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली. या संदर्भात बंडगार्डन पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी चारपर्यंत सुरू होती. 

 महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मानद सचिव आदी पदाधिकारी निवडीसाठी साेमवारी (ता. १९) संचालक मंडळाची सभा बाेलविण्यात आली हाेती. सभेचे कामकाज सुरू हाेऊन प्राेसेडिंगवर सह्या झाल्यानंतर गोंधळ सुरू झाला. या दरम्यान, एका कार्यकर्त्याने रिव्हॉल्व्हर दाखवल्याने गोंधळात भर पडली. यामुळे निवडणूक प्रक्रिया प्रभावित होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्याचे आणि निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात अाल्याचे पत्र जिल्हा उपनिबंधक आणि निवडणूक निर्णय अधिकारी आनंद कटके यांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे पाठवले आहे.

या वेळी बाेलताना विद्या पाटील आणि सुनीता पाटील म्हणाल्या, ‘‘संघाच्या पदाधिकारी निवडीची प्रक्रिया पाेलिस आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत सुरू हाेती. प्राेसेंडिंगवर सह्या झाल्यानंतर आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी कार्यकर्त्यांसह सभागृहात प्रवेश करीत गाेंधळ घालण्यास सुरवात केली. या वेळी टेबल, खुर्च्या आणि मतपेट्यादेखील फेकून देण्यात आल्या. हा प्रकार सरकारपुरस्कृत असून, त्यांच्याकडे एक मत कमी असल्याने त्यांनी ही प्रक्रिया रद्द करण्यासाठी हा प्रकार केला आहे.’’ याबाबत आमदार प्रवीण दरेकर म्हणाले, ‘‘आमच्याकडे १३ संचालक असताना आमचा विजय निश्‍चित हाेता. मात्र विराेधकांनी भाडाेत्री गुंड आणून सभागृहात गाेंधळ घातला. या वेळी माझ्याबराेबर असणाऱ्या मुंबई सहकारी बँकेचे विद्यमान संचालक नितीन बनकर यांना अमोल घुले नावाच्या व्यक्तीने रिव्हॉल्व्हर दाखवत धमकविले, यामुळे सभागृहात गाेंधळ झाला. संबंधित व्यक्तीच्या विराेधात आम्ही बंडगार्डन पाेलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.’’

दरम्यान, कायदा सुवस्थेच्या कारणास्तव सभा तहकूब करण्यात आली आहे. पदाधिकारी निवडीच्या सभेचे सूचनापत्र नव्याने राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या मार्गदर्शनानंतर काढण्यात येईल, असे पत्र निवडणूक निर्णय अधिकारी आनंद कटके यांनी संचालकांना पाठविले आहे.
 

इतर अॅग्रो विशेष
बांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’ण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे...
आधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास संपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग...
'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच...नवी दिल्ली  : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि...
नंदुरबार, धुळ्यात पपई काढणी बंदनंदुरबार  : पपईच्या दरावरून शेतकरी, व्यापारी...
...त्या दिवशी घरातलं कुणी जेवलं नायसुपे, जि. पुणे : एकच बैल होता. चितऱ्या...
किमान तापमानात वाढ होण्याची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जगात...पुणे - द टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर...
पीक फेरपालटीवर भर देत श्रीमंती केळीचे...कलाली (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथील योगेश व मनोज...
बळिराजाच्या हाती पुन्हा ‘लोखंड्या नांगर’गणूर, जि. नाशिक : शेतमालाला मिळणारे कवडीमोल भाव,...
दराच्या प्रतीक्षेतील कांद्याला फुटले...वडेल, जि. नाशिक :  आज ना उद्या दर वाढला, की...
पोटदुखीवर कडू कंद उपयुक्त कडू कंद ही वेलवर्गीय वनस्पती असून...
शिरूर ठरले मुगासाठी हक्काची बाजारपेठपुणे जिल्ह्यात शिरूर बाजार समिती ही मुगासाठी...
तहात अडकले ‘ब्रेक्झिट’युरोपीय महासंघातून बाहेर पडायचे अथवा नाही, या...
साखरेच्या कमी दराची शिक्षा ऊस...ऊस दराच्या बाबतीत कधी नव्हे एवढी आर्थिक कोंडी या...
बायोडायनॅमिक पद्धतीने कमी काळात कंपोस्ट...बायोडायनॅमिक तंत्रज्ञान हे मूलत: भारतीय वेदांवर...
पाने कुरतडणाऱ्या मुंग्यांकडूनही होते...उष्ण कटिबंधीय जंगले हे नायट्रस ऑक्साईड या हरितगृह...
पणन सुधारणेतील दुरुस्तीला शेतकरी...मुंबई ः महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व...
ताराराणी महोत्सवातून घडली उद्यमशीलता,...कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत राज विभागाच्या...
कृषी निविष्ठा अनुदानासाठी ‘ऑनलाइन'ची...पुणे : राज्यात कृषी विभागाच्या योजनांमधील विविध...
'आयमा'ची होतेय मुस्कटदाबी; मोठ्या...पुणे : ट्रॅक्टर, हार्वेस्टर, रोटाव्हेटरसारख्या...