agriculture news in marathi, State coperative bank cut 180 rupees in Sugar Valuation | Agrowon

राज्य सहकारी बॅंकेकडून साखर मूल्यांकनात १८० रुपयांनी कपात
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

कोल्हापूर : गेल्या दोन महिन्यांत साखरेचे दर खाली आल्याने अखेर राज्य सहकारी बॅंकेने पुन्हा मूल्यांकन कमी केले आहे. बुधवारी (ता.४) सायंकाळी साखर मूल्यांकनात १८० रुपयांची कपात केली आहे. 

कोल्हापूर : गेल्या दोन महिन्यांत साखरेचे दर खाली आल्याने अखेर राज्य सहकारी बॅंकेने पुन्हा मूल्यांकन कमी केले आहे. बुधवारी (ता.४) सायंकाळी साखर मूल्यांकनात १८० रुपयांची कपात केली आहे. 

राज्य बॅंकेचे पूर्वीचे साखर मूल्यांकन प्रतिक्विंटल ३१०० रुपये होते, त्यावर ८५ टक्‍क्‍यांप्रमाणे २६३५ रुपये कारखान्यांना मिळत होते, यातून प्रक्रिया, कर्जाचे हप्ते वजा जाता प्रत्यक्ष ऊस बिलासाठी १९०० रुपयेच मिळत होते. आज या मूल्यांकनात राज्य बॅंकेने १८० रुपयांची कपात करून ते प्रतिक्विंटल २९२० पर्यंत कमी केले, त्यामुळे आता कारखान्यांना मूल्यांकनाच्या ८५ टक्के म्हणजे २४८२ रुपये एवढीच उचल मिळेल, त्यातून प्रक्रिया व कर्जाचे हप्ते वजा जाता प्रत्यक्ष उसाला पैसे देता येणार नाहीत, अशी स्थिती बनल्याचे सूत्रांनी सांगितले. 

केंद्राने कारखान्यानुसार निर्यात करण्याचा कोटा जाहीर केला आहे. यामुळे ही साखर निर्यात करतानाच क्विंटलमागे ७०० रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे. यातच राज्य बॅंकेने उचलीत कपात केल्याने आता कारखानदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. हंगाम संपल्यानंतर काहीसा निवांतपणा अनुभवणाऱ्या कारखानदारांना राज्य बॅंकेने दणका दिला आहे. यामुळे ज्या कारखान्यांनी अद्याप पहिला हप्ताही ऊस उत्पादकांना दिला नाही, तो हप्ता देण्यास आणखी उशीर होऊ शकतो. 

ज्या कारखान्यांनी जाहीर ३००० रुपयांपैकी २५०० रुपयेच अदा केले आहेत, त्या कारखान्यांची उत्पादकांना देय असणारी ५०० रुपयांची शिल्लक रक्कम तातडीने मिळणेसुद्धा धूसर झाल्याने आता या निर्णयामुळे ऊस उत्पादकच भरडला जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

इतर अॅग्रो विशेष
बा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे!‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली,  पूर...
विना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...
महाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा  ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...
दुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...
ओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...
सोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...
राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....
कापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...
चारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...
दुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...
प्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...
दूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...
पीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...
पाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...
अन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...
साखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई  ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....
राज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...
मराठा आरक्षणासाठी आता लढा नाही, जल्लोष...नगर : मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून...