agriculture news in marathi, In the state the cucumber antique 400 to 2000 rupees | Agrowon

राज्यात काकडी प्रतिक्विंटल ४००ते २००० रुपये
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 एप्रिल 2019

नाशिकला काकडी प्रतिक्विंटल १२५० ते १७५० रुपये

नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवार (ता. १६) रोजी काकडीची आवक ७४ क्विंटल झाली होती. त्यास प्रतिक्विंटल १२५० ते १७५० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १६०० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

नाशिकला काकडी प्रतिक्विंटल १२५० ते १७५० रुपये

नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवार (ता. १६) रोजी काकडीची आवक ७४ क्विंटल झाली होती. त्यास प्रतिक्विंटल १२५० ते १७५० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १६०० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सोमवारी (ता.१५) बाजारात काकडीची आवक ३८० क्विंटल झाली. तिला १७५० ते २५०० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १७५० रूपये राहिला. शुक्रवारी (ता. १३) काकडीची आवक ३६९ क्विंटल झाली. तिला १००० ते २७५० प्रतिक्विंटल दर मिळाला. तसेच सर्वसाधारण दर १८७५ मिळाला.गुरुवारी (ता.११) काकडीची आवक ३४० क्विंटल झाली. तिला ८५० ते २२५० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १५०० राहिले.

बुधवारी (ता.१०) आवक ३५५ क्विंटल झाली, तर ११२५ ते २७५० असा दर मिळाला. काकडीचा सर्वसाधारण दर २००० होता. मागील आठवड्यापासून बाजार समितीत काकडीची आवक चांगली होती. मात्र नेहमीच्या तुलनेत ती कमी झाली अाहे. त्यानुसार दर सर्वसाधारण आहे. बाजारात होत असलेल्या आवकेच्या कमी जास्त प्रमाणामुळे बाजारभावतही चढउतार दिसून आला. मात्र अलीकडे कमी आवकेबरोबर दर कमी झाल्याचे दिसून येते, असे बाजार समितीतील सूत्रांकडून समजले. 

औरंगाबादेत काकडीला ८०० ते १२०० रुपये

औरंगाबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरूवारी (ता. १८) काकडीची ६९ क्‍विंटल आवक झाली. तिला ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. पंधरवड्यापासून काकडीच्या आवक व दरात चढउतार पहायला मिळत आहे. 

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २३ मार्चला काकडीची ३४ क्‍विंटल आवक झाली. तिला १५०० ते २००० रूपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २७ मार्चला ४४ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीचे दर १२०० ते १६०० रूपये प्रतिक्‍विंटल राहिले. ३० मार्चला ६३ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीला १५०० ते २००० रूपये प्रतिक्‍वंटलचा दर मिळाला. आठ एप्रिलला १०० क्‍विंटल आवक झालेल्या काकडीला ५०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ११ एप्रिलला ५८ क्‍विंटल आवक झाली. काकडीचे दर १००० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. 

१३ एप्रीलला ६० क्‍विंटल आवक झालेल्या काकडीला १२०० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सोलापुरात काकडीला १५०० रुपये दर

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात काकडीला मागणी वाढली. पण आवक कमी असूनही मागणी असल्याने दर काहीसे स्थिर राहिले. प्रतिक्विंटलला सर्वाधिक १५०० रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात काकडीची रोज १०० ते १५० क्विंटलपर्यंत आवक राहिली. काकडीला किमान ३०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक १५०० रुपये दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही दरात फारसा चढ-उतार राहिला नाही. आवकही ८० ते १०० क्विंटल प्रतिदिन अशी राहिली. काकडीचा दर प्रतिक्विंटलला किमान ४०० रुपये, सरासरी १२०० रुपये आणि  सर्वाधिक १५०० रुपये मिळाला. त्या आधीही काकडीची आवक १०० क्विंटलच्या पुढे गेली नाही. काकडीला प्रतिक्विंटलला किमान ३०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक १६०० रुपये असा दर मिळाल्याची माहिती मिळाली.

सांगलीत दहा किलोस २०० ते २५० रुपये

सांगली येथील शिवाजी मंडईत काकडीची आवक कमी होत आहे. गुरुवारी (ता. १८) काकडीची ३० ते ३५ बॉक्स (एक बॉक्स २५ किलोचा) आवक झाली. त्यास प्रतिदहा किलोस २०० ते २५० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

शिवाजी मंडईत जिल्ह्यातील वाळवा, आष्टा, तुंग, मिरज, दुधगाव, कवठेपिरान, यासह कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातून काकडीची आवक होते. लग्नसराईमुळे काकडीला मागणी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत काकडीची आवक कमी आहे. बुधवार (ता. १७) काकडीची ३० ते ४० बॉक्सची आवक झाली. त्यास प्रतिदहा किलोस २०० ते २५० रुपये असा दर मिळाला. मंगळवारी (ता. १६) काकडीची २५ ते ३० बॉक्सची आवक झाली होती. तिला प्रतिदहा किलोस २०० ते २३० रुपये असा दर मिळाला. 

गतसप्ताहापेक्षा चालू सप्ताहात काकडीची आवक कमी अाहे. तरीही काकडीचे दर स्थिर आहेत. पुढील सप्ताहात काकडीची आवक आणि दर वाढण्याची शक्यता असल्याची माहिती बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी दिली.

जळगावात ५०० ते १५०० रुपये दर

जळगाव  कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. १८) काकडीची आठ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ५०० ते १५०० रुपये असा दर मिळाला. काकडीची आवक पाचोरा, एरंडोल, जामनेर या भागांतून होत आहे. दर स्थिर असून, महिनाभरात किमान दर ५०० रुपयांखाली गेलेले नाहीत. लांब, गावरान काकडीला २००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळत आहेत, अशी माहिती मिळाली. 

नगर येथे ४०० ते २००० रुपये 

 नगर कृषी उत्पन्न  बाजार समितीत गुरुवारी (ता. १८) काकडीला साडेचारशे ते दोन हजार रुपये व सरासरी बाराशे पन्नास रुपयाचा प्रतिक्विंटल दर मिळाला. बाजार समितीमध्ये गेल्या महिनाभरापासून काकडीची आवक कमी जास्त होत आहे.

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत नगरसह शेजारच्या जिल्ह्यातून काकडीची आवक होत असते. गुरुवारी बाजार समितीमध्ये ९० क्विंटल आवक होऊन ४५० रुपये ते २००० व सरासरी बाराशे रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. ११ एप्रिल रोजी ७४ क्विंटलची आवक होऊन ५०० ते २००० व सरासरी बाराशे पन्नास रुपयांचा दर मिळाला. चार एप्रिल रोजी ७४ क्विंटलची आवक होऊन ४०० ते २००० व सरासरी ११५० रुपयांचा दर मिळाला. 

२८ एप्रिल रोजी बाजार समितीत ६७ क्विंटल काकडीची आवक झाली. तिला ५०० ते  सरासरी १३०० रुपयांचा दर मिळाला. २१ एप्रिल रोजी ७२ क्विंटलची आवक होऊन ४०० ते २ हजार रुपये व सरासरी १२०० रुपयांचा दर मिळाला. बाजार समितीत काकडीची आवक होत आहे. तिला मागणी चांगली असल्याने दरातही चढ-उतार होत आहे.

पुण्यात प्रतिदहा किलोस ६० ते १५० रुपये

 गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.१८) काकडीची सुमारे ५ ते ६ टेम्पो आवक झाली. यावेळी दहा किलो काकडीला ६० ते १५० रुपये एवढा दर असल्याची माहिती मिळाली.

सध्या सुट्ट्यांचा कालवधी असल्याने विविध महाविद्यालांसह शहरातील खानावळी बंद असल्याने काकडीची मागणी तुलनेने मंदावली आहे. उन्हाळ्यामुळे देखील आवक कमी असल्याने मागणी आणि पुरवठा संतुलित अाहे. दर स्थिर असल्याचे ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी सांगितले.

कोल्हापुरात दहा किलोस ४० ते २०० रुपयांचा दर

कोल्हापूर येथील बाजार समितीत काकडीस दहा किलोस ४० ते २०० रुपये दर मिळत आहे. उन्हाळ्यामुळे काकडीच्या मागणीत वाढ होत असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

बाजार समितीमध्ये बेळगाव सीमाभागात बरोबरच कोल्हापूरच्या पश्चिमेकडील काही गावातून काकडीची आवक होते. बहुतांशी करून उन्हाळी हंगामात काकडी शहरातील विविध बाजारपेठेत विक्रीसाठी आणली जातात. अनेक ठिकाणी स्वतःच्या शेतातील काकडी विक्रीसाठी आणून किरकोळ प्रमाणात शहरातील विविध ठिकाणी ते विकली जाते. 

उन्हाळा वाढेल तसतशी काकडीची मागणी वाढत आहे. यामुळे काकडीच्या दरात काहीशी वाढ होत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. काकडीची दोनशे ते तीनशे करंडी इतकी आवक बाजार समितीत होत असल्याची माहिती मिळाली.

इतर बाजारभाव बातम्या
पुण्यात कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरचीचे दर...पुणे  : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत कोबीला प्रतिक्विंटल १२०० ते २०००...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात वांगी प्रतिक्विंटल ५०० ते ३०००...साताऱ्यात १५०० ते २००० रुपये सातारा येथील...
जळगावात आले प्रतिक्विंटल ३००० ते ७०००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक : नाशिकमध्ये ढोबळी मिरचीची आवक १६३...
सोलापुरात कांदा दरात किंचित सुधारणासोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे बाजार समितीत श्रावण घेवडा,...पुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
राजस्थान, मध्य प्रदेशातून गव्हाच्या...जळगाव : बाजार समितीमधील किरकोळ व घाऊक विक्रेते,...
परभणीत काकडीला प्रतिक्विंटल ७०० ते १५००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात लिंबू प्रतिक्विंटल ८०० ते ६०००...जळगावात २४०० ते ४००० रुपये  जळगाव : कृषी...
कोल्हापुरात टोमॅटोला प्रति दहा किलोस ५०...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
सोलापुरात मेथी, शेपूला उठाव, दरात...सोलापूर  : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात केळीच्या दरात ६० रुपयांनी...जळगाव  ः खानदेशात केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मानवत बाजार समितीत उद्यापासून हळद खरेदीमानवत, जि. परभणी ः मानवत येथील कृषी उत्पन्न बाजार...
अक्षय तृतीयेनिमित्त आंब्याला मागणीपुणे ः मंगळवारी (ता. ७) साजऱ्या होणाऱ्या अक्षय...
औरंगाबादेत आंबा ४ हजार ते १० हजार रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत शेवग्याला प्रतिक्विंटल १५०० ते...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात काकडी प्रतिक्विंटल ५०० ते १९००...अकोल्यात प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये अकोला ः...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः सोयाबीनचे दर स्थिर असताना काही अंशी...