agriculture news in Marathi, In the state Cucumber per quintal 500 to 1900 rupees | Agrowon

राज्यात काकडी प्रतिक्विंटल ५०० ते १९००  रुपये
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 मे 2019

अकोल्यात प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये

अकोल्यात प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये
अकोला ः येथील जनता भाजी बाजारात काकडीचा दर एक हजार ते १८०० रुपयांपर्यंत आहे. सरासरी दर १५०० पर्यंत मिळत आहे. उन्हाळ्यात काकडीची मागणी वाढलेली असते. मागणीच्या तुलनेत आवक मात्र तितकी नाही. दररोज एक ते दीड टनापर्यंत आवक असल्याचे सांगितले जाते. ही काकडी प्रामुख्याने अकोला, बुलडाणा या भागांतूनच जास्त येत आहे. उन्हाळ्याच्या कालावधीत काकडीची मागणी दरवर्षी वाढते. सध्या या भागात उन्हाचा पारा कडाक्याचा वाढलेला आहे. त्यामुळे काकडीला पसंती मिळत आहेत. दुय्यम दर्जाची काकडी ८०० ते १२०० पर्यंत विकत आहे. तर चांगल्या दर्जाच्या काकडीला १५०० ते १८०० दरम्यान भाव सध्या आहे. किरकोळ बाजारात काकडीची विक्री ३० ते ४० रुपये प्रतिकिलो दराने केली जात आहे.

औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल १००० ते १५०० रुपये
औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २) काकडीची ६९ क्‍विंटल आवक झाली. या काकडीला १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. औरंगाबाद बाजार समितीमध्ये ११ एप्रिलला ५८ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीला १००० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २० एप्रिलला काकडीची आवक ८२ क्‍विंटल तर दर ६०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २५ एप्रिलला ७२ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीला १००० ते १४०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २९ एप्रिलला काकडीची आवक १५४ क्‍विंटल तर दर ५०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ३० एप्रिलला ४९ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीला १२०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सोलापुरात सर्वाधिक १८०० रुपये
सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात काकडीला उठाव मिळाला. काकडीला प्रतिक्विंटलला किमान ४०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक १८०० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आली. बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात काकडीची आवक रोज २० ते ४० क्विंटलपर्यंत राहिली. काकडीची सर्व आवक स्थानिक भागातूनच झाली. त्या आधीच्या सप्ताहातही काकडीची आवक जेमतेम १० ते २० क्विंटल प्रतिदिन इतकी होती. तर प्रतिक्विंटलचा दर किमान ३०० रुपये, सरासरी १२०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये इतका राहिला. एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात काकडीची आवक एकदमच कमी झाली. ती ८ ते १० क्विंटलपर्यंत राहिली. पण, मागणी असल्याने दरही टिकून राहिले. प्रतिक्विंटलला किमान ४०० रुपये, सरासरी १३०० रुपये आणि सर्वाधिक १८०० रुपये असा दर मिळाला.

नाशिकमध्ये प्रतिक्विंटल ५०० ते १७५० रुपये
नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. ३०) काकडीची आवक ७७४ क्विंटल झाली. त्या काकडीला प्रतिक्विंटल ५०० ते १७५० रुपये दर मिळाला.  सर्वसाधारण दर १४२५ रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.शनिवारी (२७ एप्रिल) काकडीची आवक ७६५ क्विंटल झाली. तिला ५०० ते ११२५ असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ७५० रुपये होता. शुक्रवारी (२६ एप्रिल) काकडीची आवक ४४३ क्विंटल झाली. तिला ८५० ते १७५० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १२२५ मिळाला. गुरुवारी (२५ एप्रिल) काकडीची आवक ४४२ क्विंटल झाली. तिला १००० ते २००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १२२५ होते. बुधवारी (२४ एप्रिल) काकडीची आवक ४२८ क्विंटल झाली. तिला १२५० ते २००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १५०० होते.मंगळवारी (२३ एप्रिल) काकडीची आवक ४१९ क्विंटल झाली. तिला १४२५ ते २२५० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १७२५ होते. मागील आठवड्यापासून बाजार समितीत काकडीची आवक वाढलेली आहे. मात्र, आवक कमी झाल्याने दर कमी झाले आहे. बाजारात होत असलेल्या आवकेच्या कमी-जास्त प्रमाणामुळे बाजारभावातही चढ-उतार दिसून आले. मात्र, अलीकडे जास्त आवकेबरोबर दर कमी झाल्याचे दिसून येते.

कोल्हापुरात प्रतिक्विंटल ५०० ते १९०० रुपये
कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत काकडीस दहा किलोस ५० ते १९० रुपये दर मिळत आहे. काकडीची दररोज २०० ते ३०० करंड्या आवक होत आहे. कोल्हापूर शहर परिसरातील गावातून काकडीची आवक वाढत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. गेल्या पंधरा दिवसांपासून काकडीची आवक वाढल्याचे व्यापारी प्रतिनिधींनी सांगितले. बाजार समिती बरोबर शहरातील इतर भाजी मंडईत ही काकडी येत आहे. उन्हाळ्यामुळे काकडीच्या मागणीत वाढ होत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. ढगाळ हवामानामुळे काकडीचे व्यस्थापन करणे अडचणीचे होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

गुलटेकडीत प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये
पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २) काकडीची सुमारे १० टेम्पो आवक झाली होती. या वेळी दहा किलोला ६० ते १०० रुपये दर होता. उन्हाळ्यातील सरासरीपेक्षा आवक दुप्पट असल्याचे ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी सांगितले. दुष्काळी परिस्थिततही संरक्षित आणि उपलब्ध पाण्यावर काकडीचे ठिबक आणि मल्चिंग पेपरच्या वापरातून उत्पादन घेत असल्याने उत्पादन चांगले असल्याचेही भुजबळ यांनी नमूद केले.

परभणीत प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये
परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे- भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. २) काकडीची ४० क्विंटल आवक होती. काकडीला प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. सध्या भाजीपाला मार्केटमध्ये स्थानिक परिसरातील दस्तापूर, सिंगणापूर, बोरवंड, जिंतूर तालुक्यांतील कोक या ठिकाणाहून काकडीची आवक होत आहे. गत महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी काकडीची ३५ ते ५० क्विंटल आवक होती. त्या वेळी सरासरी प्रतिक्विंटल ४०० ते १५०० रुपये दर मिळाले.  गुरुवारी (ता. २) काकडीची ४० क्विंटल आवक झाली असताना घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये होते. तर किरकोळ विक्री १५ ते २० रुपये प्रतिकिलो दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

नगरमध्ये प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये
नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत काकडीला प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळत आहे. दर दिवसाला येथे ५० ते ११० क्विंटलपर्यंत आवक होत आहे. मंगळवारी (ता. ३०) २९ क्विंटलची आवक झाली होती. नगर बाजार समितीत मागणीनुसार सातत्याने काकडीचा दर बदलत आहे. उन्हाळ्यामुळे काकडीला मागणीही चांगली आहे. २२ एप्रिल रोजी ६० क्विंटलची आवक होऊन ५०० ते १५०० रुपये व सरासरी १००० रुपये दर मिळाला. १७ एप्रिल रोजी ७७ क्विंटलची आवक होऊन ४०० ते ८०० व सरासरी ६०० रुपये दर मिळाला. १० एप्रिल रोजी ८६ क्विंटलची आवक होऊन ४०० ते १००० व सरासरी ७०० रुपयांचा दर मिळाला. ३ एप्रिल रोजी ६२ क्विंटलची आवक होऊन ५०० ते १६०० व सरासरी १०५० रुपये दर मिळाला. गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत आवकेत घट झाली आहे.

जळगावात प्रतिक्विंटल ७०० ते १५०० रुपये
जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २) काकडीची सहा क्विंटल आवक झाली. दर ७०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल, असा मिळाला. आवक कमी होत असून, दरात किंचित सुधारणा झाली. देशी किंवा गावरान, लांब हिरव्या काकडीचे दर प्रतिक्विंटल २००० रुपयांपर्यंत आहेत. आवक जामनेर, पाचोरा, यावल, जळगाव भागांतून होत आहे. आखूड, गडद हिरव्या काकडीचे दर १००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळाल्याचे सांगण्यात आले. 

इतर बाजारभाव बातम्या
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये टरबूज प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिकमध्ये टरबुजाची आवक ९६० क्विंटल झाली...
पुण्यात कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरचीचे दर...पुणे  : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत कोबीला प्रतिक्विंटल १२०० ते २०००...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात वांगी प्रतिक्विंटल ५०० ते ३०००...साताऱ्यात १५०० ते २००० रुपये सातारा येथील...
जळगावात आले प्रतिक्विंटल ३००० ते ७०००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक : नाशिकमध्ये ढोबळी मिरचीची आवक १६३...
सोलापुरात कांदा दरात किंचित सुधारणासोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे बाजार समितीत श्रावण घेवडा,...पुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
राजस्थान, मध्य प्रदेशातून गव्हाच्या...जळगाव : बाजार समितीमधील किरकोळ व घाऊक विक्रेते,...
परभणीत काकडीला प्रतिक्विंटल ७०० ते १५००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात लिंबू प्रतिक्विंटल ८०० ते ६०००...जळगावात २४०० ते ४००० रुपये  जळगाव : कृषी...
कोल्हापुरात टोमॅटोला प्रति दहा किलोस ५०...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
सोलापुरात मेथी, शेपूला उठाव, दरात...सोलापूर  : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात केळीच्या दरात ६० रुपयांनी...जळगाव  ः खानदेशात केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मानवत बाजार समितीत उद्यापासून हळद खरेदीमानवत, जि. परभणी ः मानवत येथील कृषी उत्पन्न बाजार...
अक्षय तृतीयेनिमित्त आंब्याला मागणीपुणे ः मंगळवारी (ता. ७) साजऱ्या होणाऱ्या अक्षय...
औरंगाबादेत आंबा ४ हजार ते १० हजार रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत शेवग्याला प्रतिक्विंटल १५०० ते...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...