agriculture news in marathi, State in election mood | Agrowon

राज्यात निवडणुकांचा माहोल; २४ जिल्ह्यांत आचारसंहिता लागू
सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 15 मे 2018

मुंबई : विविध ठिकाणच्या पोटनिवडणुकीसह विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या जागांसाठी निवडणुका होत असल्याने राज्यात निवडणुकीचा माहोल तयार झाला आहे. यामुळे 24 जिल्ह्यांत आचारसंहिता लागू झाल्याने सरकारच्या वतीने कोणत्याही घोषणा केल्या जात नसल्याची माहिती निवडणूक आयोगातून देण्यात आली.

मुंबई : विविध ठिकाणच्या पोटनिवडणुकीसह विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या जागांसाठी निवडणुका होत असल्याने राज्यात निवडणुकीचा माहोल तयार झाला आहे. यामुळे 24 जिल्ह्यांत आचारसंहिता लागू झाल्याने सरकारच्या वतीने कोणत्याही घोषणा केल्या जात नसल्याची माहिती निवडणूक आयोगातून देण्यात आली.

राज्यातील दोन लोकसभा, तर एका विधानसभा मतदारसंघात 28 मे 2018 रोजी पोटनिवडणूक होत आहे. विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील चार मतदारसंघांसाठी येत्या 8 जून रोजी मतदान होत आहे. तसेच, विधान परिषदेवरच निवडून द्यावयाच्या सहा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी येत्या 21 रोजी मतदान होत आहे. यामुळे राज्यात तब्बल 24 जिल्ह्यांत आचारसंहिता लागू झाली असल्याने संपूर्ण राज्यात निवडणुकांचा माहोल तयार झाला आहे. कडेगाव-पलूस विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेस वगळता अन्य उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे मानण्यात येते. मात्र, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार पोटनिवडणुकांचा निकाल घोषित होईपर्यंत सांगली जिल्ह्यातील आचारसंहिता सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.

येथे होणार निवडणुका...
ः- पालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा आणि पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक
ः- विधान परिषदेत निवडून द्यायाच्या जागा - नाशिक शिक्षक, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर मतदारसंघ; रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, परभणी-हिंगोली, अमरावती आणि उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ

या जिल्ह्यांत आचारसंहिता लागू
नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, परभणी, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद आणि सांगली. 

इतर ताज्या घडामोडी
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
पुणे विभागात ७३,७४० हजार हेक्टरवर...पुणे   ः  गेल्या साडेतीन महिन्यांत...
मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार...औरंगाबाद  : मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी...
पावसाअभावी वऱ्हाडात सोयाबीनचे उत्पादन...अकोला   ः या हंगामात वऱ्हाडात सर्वाधिक लागवड...
पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा...उरुळी कांचन, जि. पुणे : संपूर्ण राज्यात चिंतेचा...
मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची...नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी...
लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकरकोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८...
डी.आर. कुलकर्णी यांचे निधनपुणे : 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीतील मुख्य उपसंपादक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन...भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 68 वा वाढदिवस...
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मराठवाड्यात...लातूर : गेली सलग अठरा दिवस देशात पेट्रोल आणि...
नाशिकला स्वाईन फ्ल्यूचा कहर, 24...नाशिक : नाशिक शहर आणि जिल्ह्यात स्वाईन फ्ल्युने...
आज मराठवाडा मुक्तीदिन ! संग्रामाला झाली...15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला...
पेट्रोल दराची शंभरीकडे वाटचाल मुंबई : महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या...
वऱ्हाडात पिकांना वाढती उष्णता सोसवेनाअकोला  ः गेल्या अाठ दिवसांपासून कमाल...
शेतीमाल प्रक्रियेला चालना देण्यासाठी...भेंडा, जि. नगर  : बीव्हीजी ग्रुपने स्वच्छता...
साताऱ्यात ११७७ शेततळ्यांची कामे पूर्णसातारा  ः मागेल त्याला शेततळे योजनेतून...
इंधन दरवाढ शेतकऱ्यांच्या मुळावरऔरंगाबाद : इंधन दरवाढीचा थेट आघात आता शेतीवरही...
शेतमाल वाहतुकीच्या दरात वाढजळगाव : इंधनाचे दर दिवसागणिक वाढत आहेत. डिझेलचे...