agriculture news in marathi, state examination council will not conduct agri employee exams | Agrowon

कृषिसेवकांच्या नव्या भरती प्रक्रियेत परीक्षा परिषदेला डच्चू
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

पुणे : राज्यात कृषिसेवकांच्या नव्या भरती प्रक्रियेला अखेर सुरवात झाली असून, वादग्रस्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला भरतीपासून बाजूला ठेवण्यात आले आहे. एक हजार जागांसाठी होत असलेल्या या भरतीसाठी आता महाऑनलाइन प्रणालीतून परीक्षा घेतल्या जात आहेत. 
    दरम्यान, आधीच्या वादग्रस्त भरतीतील पात्रताधारकांना मॅटच्या निर्णयानुसार रुजू करून घेण्यात आले आहे. 

पुणे : राज्यात कृषिसेवकांच्या नव्या भरती प्रक्रियेला अखेर सुरवात झाली असून, वादग्रस्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला भरतीपासून बाजूला ठेवण्यात आले आहे. एक हजार जागांसाठी होत असलेल्या या भरतीसाठी आता महाऑनलाइन प्रणालीतून परीक्षा घेतल्या जात आहेत. 
    दरम्यान, आधीच्या वादग्रस्त भरतीतील पात्रताधारकांना मॅटच्या निर्णयानुसार रुजू करून घेण्यात आले आहे. 

  राज्यात एक वर्षापूर्वी कृषिसेवक पदासाठी ५० हजार मुलांनी परीक्षा दिली होती. ही परीक्षा वादग्रस्त ठरल्याने ७३० उमेदवारांची निवड यादी शासनाने रद्द केली होती. तसेच, ही भरती भारांकन पद्धतीने करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला होता. मात्र, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात मॅटने भारांकन भरतीच्या विरोधात निकाल दिला व आधीची निवड यादी कायम केली होती. 

दुसऱ्या बाजूला कृषिसेवक भरतीमध्ये सोनेरी टोळीने लाखो रुपये उकळल्याचा संशय आहे. या टोळीचे कृषी विभाग आणि परीक्षा परिषदेशी लागेबांधे आहेत. विधिमंडळात कृषिसेवक परीक्षेतील गैरव्यवहाराची लक्तरे निघाल्यानंतर या परीक्षेत गैरप्रकार झाल्याची तक्रार कृषी आयुक्तालयानेच केली आहे. 

आयुक्तालयाचे आस्थापना विभागाचे सहसंचालक सुधीर ननावरे यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या विरोधात लेखी मुद्दे पोलिसांना दिल्यानंतर गुन्हा दाखल होता. मात्र, गुन्ह्याचा तपास संशयास्पदरीत्या रेंगाळला आहे.  

‘‘नव्या भरतीमध्ये आता कृषी खाते सावध झाले असून, वादग्रस्त परीक्षा परिषदेला वगळून ही भरती केली जाणार आहे. त्यासाठी पाच ते १८ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविले जात आहेत. १३ ते १५ मार्च दरम्यान परीक्षा घेतली जाईल. यासाठी राज्य शासनाची महाऑनलाइन प्रणाली वापरली जात आहे. यात गैरव्यवहाराला वाव नाही,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 

आधीच्या भरतीमधील पात्र पात्रताधारकांना रुजू करून घेतले जात आहे. मात्र, मॅटमधील निकालाच्या प्रक्रियेत दिलेल्या अटी तसेच बंडगार्डन पोलिस ठाण्यात भरतीमधील घोटाळ्याबाबत दाखल झालेल्या गुन्ह्यातील निकालाच्या आधीन राहून कृषिसेवकांना नियुक्तीपत्रे देण्यात येत आहेत, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. 

इतर अॅग्रो विशेष
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
सीताफळाच्या योग्य जातींची करा लागवडमहाराष्ट्रात सीताफळाच्या झाडांचे काही नैसर्गिक...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
केसर आंबा पाडाला आलाय...औरंगाबाद : आपली चव, गंध आणि रूपाने ग्राहकांना...
बदल्या समुपदेशनानेच...पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
बारमाही भाजीपाला शेतीला नर्सरी...ब्राह्मणगाव (जि. नाशिक) येथील केवळ वाघ पूर्वी...
सुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्लीअकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची...
भाराभर चिंध्या राज्यात १२७ वा पशुसंवर्धन दिन नुकताच साजरा...
मथुरेचं दूध का नासलं?राज्यात मे महिन्याचे तापमान यंदा नैसर्गिक आणि...
चिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरीआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का? उत्तर...
‘अ’तंत्र निकेतनपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध...