agriculture news in marathi, State faces premonsoon rainfall | Agrowon

राज्यात पूर्वमोसमीचा दणका सुरूच
टीम अॅग्रोवन
सोमवार, 4 जून 2018

पुणे : राज्यात पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावत दणका दिला आहे. मध्य महाराष्ट्रात वळीव पावसाचा जोर अधिक होता. धुळे जिल्ह्यातील नागाव येथे अतिवृष्टी झाली तेथे १०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. तर कोल्हापुरातील अाजरा तालुक्याच्या चव्हाणवाडीत जोरदार पावसाने शेत बांध वाहून गेले. बुलडाणा जिल्‍ह्यातील बीबी, मांडवा येथे शनिवारी दुपारी वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसाने आठवडे बाजारात नुकसान झाले. तर वाशीम जिल्ह्यात बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आलेले हजारो क्विंटल सोयाबीन पाण्यात गेले.

पुणे : राज्यात पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावत दणका दिला आहे. मध्य महाराष्ट्रात वळीव पावसाचा जोर अधिक होता. धुळे जिल्ह्यातील नागाव येथे अतिवृष्टी झाली तेथे १०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. तर कोल्हापुरातील अाजरा तालुक्याच्या चव्हाणवाडीत जोरदार पावसाने शेत बांध वाहून गेले. बुलडाणा जिल्‍ह्यातील बीबी, मांडवा येथे शनिवारी दुपारी वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसाने आठवडे बाजारात नुकसान झाले. तर वाशीम जिल्ह्यात बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आलेले हजारो क्विंटल सोयाबीन पाण्यात गेले.

पूर्वमोसमी पावसाने शनिवारी मध्य महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या अनेक भागांमध्ये वळवाच्या पावसाने दणका दिला. कृषी विभागाकडे झालेल्या नोंदीनुसार नाशिकच्या डांगसौदणे ३१ मिलिमीटर, इगतपुरी ५८, दिघवड ३०, धुळ्यातील नागाव येथे १०५, सोनगीर ३१, मुकटी ३०, साक्री ४६, थळनेर ६८, चिमठाणा ४१, जळगावमधील अंमळनेर ३०, अमलगाव ४६, हताळे ३७, पाचोरा ३१, नगरमधील चास ३०, वझझिरे ३३, पुणे जिल्ह्यातील अांबवडे ३९, तळेगाव ३९, कुंभारवळण ४४, साताऱ्यातील हेळवाक ५९, पसरणी ३२, महाबळेश्‍वर ८९, कोल्हापुरातील राशिवडे ३०, गगनबावडा येथे ५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 
 
कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. ठाणे जिल्ह्यातील किन्हवली येथे ४०, अंबरनाथ ५१, बदलापूर ८५, रायगड जिल्ह्यातील तळोजा येथे ४५, करंजवाडी ४१, कोंडवी ८३, वाकण ५९ मिलिमीटर पाऊस पडला. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांतही वळीव पावसाच्या सरी पडल्या. औरंगाबादमधील वरुडकाझी येथे ३७, वाळूज ३१, डोणगाव ३९ मिलिमीटर, तर विदर्भातील वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यांत काही ठिकाणी पाऊस झाला. वाशीममधील मंगरूळपीर येथे ४९ मिलिमीटर, यवतमाळ जिल्ह्यातील लोही ४७, मोझर ४४ मिलिमीटर पाऊस झाल्याची माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली. 

गुरुवारी कोकणात मुसळधारेचा इशारा
अरबी समुद्रावरून होणारा बाष्प पुरवठा, पूर्व विदर्भावर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती यामुळे राज्यात वादळी वाऱ्यांसह पूर्वमोसमी पाऊस पडत आहे. सोमवारपासून (ता. ४) कोकणात, मंगळवारपासून मराठवाड्यात, तर बुधवारपासून मध्य महाराष्ट्रात पाऊस वाढणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. गुरुवारपर्यंत (ता. ७) राज्यात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता असून, गुरुवारी कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

 

इतर अॅग्रो विशेष
उगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेतीह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे...
...तरच वाढेल डाळिंब निर्यातफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची...
बुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादनबुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक...
भारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...
राज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...
धार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...
चारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...
देशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी रंगणार...पुणे : देशी बियाण्यांचे संवर्धन आणि प्रसारासाठी...
खरेदी न झालेल्या हरभरा, तुरीसाठी...सोलापूर : हमीभाव योजनेतून शेतकऱ्यांनी हरभरा व तूर...
दुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...
‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...
परभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...
सीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...
ब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...
गोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...
शेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...
राज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...
संत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...
फॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...
चिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...