agriculture news in marathi, State food and agri processing policy declared, Maharashtra | Agrowon

अन्न व कृषीप्रक्रिया उद्योग धोरणाला मंजुरी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

मुंबई : राज्यातील अन्न व कृषीप्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी निश्चित केलेल्या धोरणाला मंगळवारी (ता. २४) राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या धोरणाचा सर्वाधिक फायदा कृषी क्षेत्राला आणि शेतकऱ्यांना होणार आहे. अन्नप्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्याकरिता केंद्र व राज्य शासनाच्या योजना धोरणात समाविष्ट करण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली. 

मुंबई : राज्यातील अन्न व कृषीप्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी निश्चित केलेल्या धोरणाला मंगळवारी (ता. २४) राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या धोरणाचा सर्वाधिक फायदा कृषी क्षेत्राला आणि शेतकऱ्यांना होणार आहे. अन्नप्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्याकरिता केंद्र व राज्य शासनाच्या योजना धोरणात समाविष्ट करण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली. 

अन्न प्रक्रिया उद्योगाला पायाभूत सुविधा आणि चालना देण्यासाठी उद्योग आयुक्तांच्या कार्यालयात संचालक दर्जाचे संचालनालय स्थापन करण्यात येणार असून अन्न प्रक्रिया उद्योगांना केंद्र व राज्य शासनाच्या वेगवेगळ्या अनुदानाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कृषी आयुक्तालयामध्ये अन्न प्रक्रिया संचालनालय स्थापन करण्यात येणार आहे. कृषी प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांची जमीन दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने व्यापारी तत्त्वावर देण्यासाठी कायद्यात बदल करण्याचे धोरणात नमूद करण्यात आले आहे. 

अन्न व कृषी प्रक्रिया उद्योगाला आवश्यक सेवेचा दर्जा देण्यात येणार असून मैत्री पोर्टलच्या माध्यमातून तातडीने परवाने मिळावेत यासाठी कृषी आयुक्तालयात अन्न प्रक्रिया संचालनालय स्थापन करण्यात येणार आहे. सवलतीच्या दरात शीतगृहांना वीज पुरवठा, पाणी परवान्यासाठी सुटसुटीत धोरण आणि कामगार कायद्यातील काही नियमांमध्ये अन्न प्रक्रिया उद्योग प्रकरणांना गुणवत्तेप्रमाणे हंगामी उद्योगाचा दर्जा देणे धोरणाअंतर्गत प्रस्तावित आहे. 

धोरणातील ठळक वैशिष्ट्ये

 • महाराष्ट्र देशातील अन्नप्रक्रियेचे जलद वाढीचे केंद्र 
 • अन्नप्रक्रियेमध्ये गुंतवणूक वाढीसाठी ठोस शाश्वत भूमिका
 • उद्योग गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर नेण्याचा प्रयत्न
 • अविकसित क्षेत्रात गुंतवणूक होण्यासाठी प्रयत्नशील राहाणे
 • शेतमाल मूल्यवर्धन आणि रोजगार संधींची निर्मिती
 • कृषीप्रक्रिया उद्योग क्षेत्राच्या वाढीचा दर प्रतिवर्षे दोनअंकी साध्य करणे
 • कृषी उद्योग क्षेत्राच्या सहभागातून शेतकऱ्यांचे उत्पन्न पाच वर्षांत दुप्पट करणे
 • ५ लाख लोकांसाठी रोजगारनिर्मिती
 • शेतमालाची नासाडी टाळून मूल्यवर्धीत उत्पादन
 • शेतकऱ्यांना वाजवी मूल्य आणि ग्राहकांना स्वस्त व गुणवत्तापूर्ण उत्पादनाची हमी 
 • कुपोषणाच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी अन्नप्रक्रियेतून पौष्टिक समतोल आहार उपलब्ध करून देणे
 • अन्नप्रक्रियेसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापर आणि अन्नपुरवठा साखळी मजबुतीकरण
 • कृषी व अन्नप्रक्रिया उद्योगासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ                     निर्मिती 

धोरण अंमलबजावणीसाठी मंत्री समिती
कृषी व फलोत्पादनमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या अध्यक्षतेखालील अन्न प्रक्रिया धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मंत्री समिती स्थापन करण्यात येणार आहे. यात मंत्री (पणन), मंत्री (उद्योग), मंत्री (पदुम) आणि मंत्री (सहकार), राज्यमंत्री (कृषी), अपर मुख्य सचिव (सहकार), प्रधान सचिव (कृषी), प्रधान सचिव (पणन), प्रधान सचिव (उद्योग), प्रधान सचिव (पदुम) हे समितीमधील इतर सदस्य आहेत; तर सदस्य सचिव कृषी आयुक्त असणार आहेत.

 

इतर अॅग्रो विशेष
सुकाणू समितीच्या कार्यकारिणीची जवळगाव...अंबाजोगाई, जि. बीड : शेतकरी संघटना व सुकाणू...
शेती म्हणजे तोटा हे सूत्र कधी बदलणार? शेती कायम तोट्यात कंटूर मार्करचे संशोधक व शेती...
‘ई-नाम’ची व्याप्ती सर्वांच्या...स्पर्धाक्षम, पारदर्शक व्यवहारातून शेतीमालास अधिक...
कांदा बाजारात दरवाढीचे संकेतनाशिक : राजस्थान व मध्य प्रदेशमध्ये...
उपराष्ट्रपती आज बारामतीतबारामती ः उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू शुक्रवारी (...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी बहुस्तरीय...पुणे ः शेती क्षेत्राच्या विकासासाठी सिंचन,...
कापूस बाजारात भारताला संधीन्यूयाॅर्क ः चालू कापूस हंगामात पिकाला फटका...
मॉन्सून सक्रिय होण्यास प्रारंभ पुणे  ः अरबी समुद्र आणि हिंदी महासागर...
थकली नजर अन्‌ पाय...औरंगाबाद : घोषणा झाली, पण काय व्हतंय कुणास ठाऊक,...
हास्य योगाद्वारे सरकारचा निषेधनागपूर : सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा अभिनव...
माळरानावर साकारले फायदेशीर शेतीचे स्वप्नमनात जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल, तर...
जिरायती उटगीत केली फायदेशीर फळबाग...शेतीत एकाचवेळी गुंतवणूक धोक्याची ठरू शकते. दरही...
गोंधळलेला शेतकरी अन् विस्कळित नियोजनशेती क्षेत्रात सर्वाधिक महत्त्व हे नियोजनाला आहे...
निराशेचे ढग होताहेत अधिक गडद७  ते १० जूनपर्यंत सर्वत्र चांगला पाऊस   ...
राज्यात नवीन फळबाग लागवड योजना लागूमुंबई : राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट...
मॉन्सूनचे प्रवाह सुरळीत होऊ लागले...पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली...
‘एसएमएस’ अटीमुळे हजारो शेतकरी...लातूर : शासनाने राज्यातील चार लाखापेक्षा जास्त...
शेतातील जीवसृष्टी सांभाळल्यास मातीतून...नाशिक : शेतीची उत्पादकता घसरल्यामुळे अडचणीत...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी चारसूत्री...नवी दिल्ली ः देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२...
कांदाप्रश्‍नी ‘करेक्शन’ करण्याच्या...नाशिक : लोकसभेच्या आगामी निवडणुकांकडे लक्ष...