तेलबिया महामंडळाची जमीन विक्रीला
मारुती कंदले
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

पणन विभागाकडून या जमिनीची बाजारभावाने किती किंमत होईल याचा अंदाज घेण्यात आला आहे. यात सर्वाधिक १६१ कोटी रुपयांची बोली लावणाऱ्यास ही जमीन विक्री करण्याचे विचाराधीन आहे.

मुंबई : बंद पडलेल्या महाराष्ट्र राज्य तेलबिया व्यापार आणि उद्योग महामंडळाची अमरावती येथील जमीन राज्य सरकारने विक्रीला काढली आहे. २३ एकर क्षेत्रफळ असलेल्या या मोक्याच्या जमिनीसाठी सर्वाधिक १६१ कोटी रुपयांची बोली लागली आहे. पणन राज्यमंत्र्यांकडून याविषयी हिरवा कंदील आला की या जमीन विक्रीचा मार्ग मोकळा होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

राज्य सरकारने तेलबिया व्यापार आणि उद्योग महामंडळ १९९९ मध्येच बंद केले आहे. मात्र, कामकाज बंद झाले असले तरी महामंडळाच्या जमिनीच्या देखभालीवर वर्षाकाठी लाखो रुपयांचा खर्च राज्य सरकारला करावा लागत आहे. महामंडळाची अमरावतीमध्ये मोक्याच्या ठिकाणी २३ एकर जमीन आहे.

हा बिनकामाचा खर्च वाचवण्यासोबतच याठिकाणी अतिक्रमण झाल्यास नसती डोकेदुखी टाळण्याच्या हेतूने महामंडळाची ही जमीन विक्रीला काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वित्त विभागानेसुद्धा या विक्रीला परवानगी दिली आहे. पणन खात्याच्या अखत्यारीत महामंडळ येते. त्यानुसार, पणन खात्याने जमीन विक्रीचा प्रस्ताव तयार करून खरेदीदारांकडून टेंडर मागवले होते.

पणन विभागाकडून या जमिनीची बाजारभावाने किती किंमत होईल याचा अंदाज घेण्यात आला आहे. यात सर्वाधिक १६१ कोटी रुपयांची बोली लावणाऱ्यास ही जमीन विक्री करण्याचे विचाराधीन आहे. पणन खात्याने त्यासाठी राज्याच्या वित्त विभागाची परवानगी घेतली आहे. त्यानंतर पुढील मंजुरीसाठी हा प्रस्ताव पणन खात्याचे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. गेली तीन आठवडे ही फाईल राज्यमंत्री खोत यांच्याकडे निर्णयासाठी प्रलंबित आहे.

 

इतर अॅग्रो विशेष
यशवंत सिन्हा आता शेतीसाठी आवाज उठविणारअकोला : अाज देशातील सर्व शेतकऱ्यांना समस्यांपासून...
विदर्भ, खानदेशच्या उत्तर भागांतून...पुणे : गेल्या महिन्यात सुरू झालेल्या परतीच्या...
उस लागवड तंत्रज्ञानआजची सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता पाहता ऊस...
कीटकनाशक विषबाधेचा अहवाल देणे बंधनकारकपुणे : शेतीसाठी कुठेही कीटकनाशकांची हाताळणी अथवा...
मसाला उद्याेगातून भारतीताईंनी साधला ’...काळा मसाल्यासोबत शेंगा, कारळा, जवस चटण्यांचे...
गोसंवर्धन, प्रशिक्षण हेच 'गोकुलम...नांदुरा बुद्रुक (जि. अमरावती) येथील गोकुलम...
ज्वारी चारा पीक लगवड तंत्रज्ञान ज्वारी हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पीक आहे....
यवतमाळ जिल्ह्यात शेतमजुरांची होणार...मुंबई : कीटकनाशकांच्या विषबाधेमुळे अनेकांचा...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे ः काेकण, गाेवा, मध्य महाराष्‍ट्र व...
आधुनिक बैलगाडीमुळे होईल बैलांवरील ताण...उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील संशोधक डॉ. जयदीप...
कडधान्यांच्या अायातीत वाढ !मुंबई ः कडधान्यांच्या अायातीवर केंद्र सरकारने...
बहाद्दर शेतकऱ्यांचा होणार गौरव पुणे - प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश...
खतांवरील अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक... नवी दिल्ली ः खतांवरील अनुदान लाभार्थी...
मंगळवारपर्यंत पावसाची शक्‍यता, त्यानंतर...सर्व हवामान स्थिती पाहता ता. १४ ऑक्‍टोबर रोजी...
फवारणीसाठी चार हजार गावांमध्ये संरक्षण...नगर : यवतमाळ जिल्ह्यात विषबाधेमुळे झालेल्या...
पावसाळी परिस्थितीत द्राक्ष बागेचे...सध्या काही ठिकाणी द्राक्ष बागेत आगाप छाटणी झालेली...
चवळी, मारवेल, स्टायलाे चारा लागवड...चवळी :  चवळी हे द्विदल वर्गातील...
मूग, उडीद खरेदी केंद्र उद्घाटनाच्या...अकोला : शासन अादेशानुसार नोंदणी केलेल्या...
कृषी सल्ला : पिकांचे नियोजन, कीड व रोग...सद्य परिस्थितीमध्ये पिकांच्या नियोजन व कीड व...
आॅनलाइन नोंदणी अडकली नियमातकोल्हापूर : हमीभाव खरेदी केंद्राबरोबरच अन्य...