agriculture news in marathi, State government in hurry to sale TurDal | Agrowon

तूरडाळ विक्रीसाठी सरकारची धावपळ
टीम अॅग्रोवन
शनिवार, 12 मे 2018

मुंबई : गेल्या वर्षी खरेदी केलेली २५ लाख क्विंटल तूर विक्रीसाठी राज्य शासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. तुरीची संपत आलेली शेल्फ लाइफ आणि त्यामुळे होणारा संभाव्य तोटा नजरेसमोर ठेवून सरकारने तुरीची डाळ करून ७५ रुपये या आधीच्या दराऐवजी ५५ रुपये प्रतिकिलो या दरावर सर्व शासकीय आस्थापनांमध्ये वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व अंगणवाड्या, माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत सर्व शाळा, मोठी देवस्थाने, रेशन आणि कारागृहे यांना देण्यात येणार असून, त्याची अंमलबजावणी तातडीने केली जाणार आहे. 

मुंबई : गेल्या वर्षी खरेदी केलेली २५ लाख क्विंटल तूर विक्रीसाठी राज्य शासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. तुरीची संपत आलेली शेल्फ लाइफ आणि त्यामुळे होणारा संभाव्य तोटा नजरेसमोर ठेवून सरकारने तुरीची डाळ करून ७५ रुपये या आधीच्या दराऐवजी ५५ रुपये प्रतिकिलो या दरावर सर्व शासकीय आस्थापनांमध्ये वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व अंगणवाड्या, माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत सर्व शाळा, मोठी देवस्थाने, रेशन आणि कारागृहे यांना देण्यात येणार असून, त्याची अंमलबजावणी तातडीने केली जाणार आहे. 

दै. अॅग्रोवनने तुरीची शेल्फ लाइफ संपत आल्याने राज्याच्या तिजोरीला आठशे ते हजार कोटींचा फटका सहन करावा लागणार असल्याचे वृत्त दिले होते. त्यानंतर जागे झालेल्या शासनाने यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली या प्रश्नाचा आढावा घेऊन जलदगतीने तूर विक्रीचे निर्देश दिले आहेत. 

राज्य सरकारने ७ मे २०१८ पर्यंत राज्यातील ३० लाख ३४८ शेतकऱ्यांकडून २८ लाख ८८ हजार ९१८ क्विंटल तूर खरेदी केली आहे. मागील वर्षातील २५ लाख क्विंटल तूर सरकारी गोदामात पडून आहे. त्यात नव्या तुरीची भर पडल्याने आताच हा साठा सुमारे ५० लाख क्विंटलपुढे गेला आहे. अजूनही कित्येक शेतकऱ्यांकडे यंदाची तूर शिल्लक असून सरकारने तूर खरेदीची तारीख १५ मेपर्यंत वाढविल्याने यात अजून वाढ होईल. आधीच्या साठ्याने गोदामे भरल्याने नव्याने खरेदी केलेल्या तुरीसाठी जागा मिळत नाही.

गेल्या वर्षी आणि यावर्षी खरेदी केलेल्या या तुरीमुळे राज्य सरकारच्या नाकातोंडातून धूर निघायची वेळ आली असून राज्यात गोदामात पडून असलेल्या गेल्या खरिपातील सुमारे पंधराशे कोटी रुपयांच्या या तुरीचे करायचे काय असा प्रश्न सरकारला पडला आहे. विशेषतः या तुरीची शेल्फलाइफ संपत आल्याने कोणत्याही परिस्थितीत ही तूर विक्रीला काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शेजारी तमिळनाडू सरकारनेही तूर खरेदीस नकार दिल्याने आता सरकारने राज्यातीलच सरकारी आस्थापनांसोबत नांदेड, शेगाव, शिर्डी, अक्कलकोट, पंढरपूर येथील मोठ्या देवस्थानांच्या जेवणावळीसाठी तूर खरेदी केली जावी, असे निर्देश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

तसेच राज्यातील अंगणवाड्या आणि शाळांमध्येही तूर दिली जाणार आहे. अंगणवाड्यांमध्ये एकात्मिक बाल विकास विभागाकडून तूर वापरली जाते का याची तपासणी करण्याचे निर्देशही देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदांच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी माध्यान्ह भोजन योजनेसाठी ८० रुपये प्रति किलो दराने तूर खरेदी केली जाते. याआधी पणन विभागाने ७५ रुपये किलो दराने शाळांना तूर देण्यास समर्थता दर्शवली होती. मात्र, कोणत्याही परिस्थितीत तूरडाळीची विक्री होऊन हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी दर कमी करून ५५ रुपये किलो दराने शाळांना दिली जाणार आहे. हाच दर इतर आस्थापनांनाही लागू होणार आहे. त्याबाबतचा निर्णय लवकरच मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत होईल, अशी माहिती पणन विभागातील सूत्रांनी दिली आहे. 

राज्यातील अंगणवाड्यांना दोन महिन्यांसाठीचा तर जिल्हा परिषद शाळांना सहा महिन्यांचा पुरवठा करावा, असेही निर्देश पणन विभागाकडून देण्यात येणार आहेत. राज्याच्या विविध कारागृहांमध्ये १ मार्चपर्यंत २०१८ पर्यंत ३२ हजार ४५१ कैदी होते. या कैद्यांवर सरकार दरवर्षी ८४ कोटी ३७ लाख रुपये खर्च करते. त्यापैकी सुमारे ३७ कोटी रुपये जेवणावर खर्च होतो. त्यामुळे तूर बाजारातून खरेदी करण्याऐवजी सरकारकडून घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. शिधावाटप दुकानावरही तूर उपलब्ध करून देण्यात येत असून ग्रामीण भागातील ग्राहकांचे तूर खाण्याचे प्रमाण लक्षात घेता सुरवातीला ५० टक्के रक्कम घेवून तूर दुकानदारांना देण्यात येणार आहे. काही दिवसांच्या मुदतीनंतर उर्वरित रक्कम घेतली जाणार आहे. 

 १२ लाख क्विंटल डाळ विकली जाण्याचा अंदाज
गेल्या वर्षीच्या शिल्लक २२ लाख क्विंटल तुरीची डाळ बनवल्यास त्यातून १६ ते १७ लाख डाळ बनणार आहे. वरीलप्रमाणे सर्व सरकारी आस्थापनांना तूरडाळ वितरीत केल्यास सुमारे १२ लाख क्विंटल इतकी डाळ विकली जाईल असा अंदाज आहे. ही तूरडाळ विकली गेल्यास सरकारला मोठा दिलासा मिळणार असला तरी या सगळ्यात चांगलाच आर्थिक फटकाही सहन करावा लागणार आहे.

इतर अॅग्रो विशेष
गोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...
पिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...
कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
आयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
ऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...
पडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...
चारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....
मोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...
पॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे   : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...
ढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...
तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...
ब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...