सरकार दूध धोरणाची आखणी करत आहे : दुग्धविकासमंत्री जानकर

सरकार दूध धोरणाची आखणी करत आहे :  दुग्धविकासमंत्री जानकर
सरकार दूध धोरणाची आखणी करत आहे : दुग्धविकासमंत्री जानकर

पुणे : शेतकऱ्यांना द्यावयाच्या दरासाठी सरकार दूध धाेरणाची आखणी करत आहे. दुधाचे दर काेसळल्यानंतर दरामधील तफावत देण्यासाठी ‘मिल्क फंडा’ची उभारणी करण्यात येईल, अशी माहिती पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी शुक्रवारी (ता. १८) पत्रकार परिषदेमध्ये दिली.  मंत्री जानकर म्हणाले, ‘‘आंतरराष्ट्रीय पातळीवर साखर आणि दुधाच्या अतिरिक्त उत्पादनामुळे दर काेसळल्याने साखर आणि दुधाचा प्रश्‍न जागतिक झाला आहे. दुधाचे दर आंतराष्ट्रीय पातळीवर ३६ टक्क्यांनी, तर देशांतर्गत पातळीवर ४६ टक्क्यांनी घसरले आहेत. यावर मात करण्यासाठीच जास्तीत जास्त दुधावर प्रक्रिया हाेऊन पावडर उत्पादित व्हावी, यासाठी भुकटीला अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलाआहे.’’  मंत्री जानकर म्हणाले, ‘‘दूध दरप्रश्‍नी मी सातत्याने शेतकरी आणि सुकाणू समितीशी संवाद साधत आहे. माझ्या मंत्रालयाची दारे शेतकऱ्यांसाठी सदैव उघडी असून, शेतकऱ्यांनी आंदाेलन न करता चर्चेसाठी यावे. सकारात्मक चर्चेतून नक्की मार्ग निघेल. दुधाला चांगले दर देण्यासाठी सरकार नेहेमीच प्रयत्नशील आहे. दुधाच्या उत्पादनात निम्म्यापेक्षा अधिक व्यवसाय संघटित नसल्यामुळे अनुदान देण्याबाबत अडचणी येत आहेत. सहकारी आणि खासगी दूध संघाकडील आकडेवारीनुसार १ काेटी २५ लाख लिटरचे दरराेज संकलन हाेत आहे. राज्याचे सरासरी संकलन १०५ लाख लिटर एवढे अाहे. मात्र सध्या उन्हाळा असूनही १२५ ते १३० लाख लिटरपर्यंत संकलन होत आहे.’’ ‘‘दूध पावडर अनुदानात गैरव्यवहार हाेऊ नये म्हणनू मार्चपर्यंतच्या स्टॉकची माहिती संकलित केली आहे. यानंतर उत्पादित हाेणाऱ्या पावडरसाठी अनुदान देण्यात येणार आहे. जे संघ दूध २७ रुपये दर देणार नाही त्या संघाना दुध पावडरचे अनुदान दिले जाणार नाही,’’ असेही जानकर यांनी स्पष्ट केले.   दरम्यान २० मे राेजी १२७ व्या पशुसंवर्धन दिनानिमित्त पशुपालक मेळावा राज्यस्तरीय आभासी प्रशिक्षण आणि तांत्रिक कार्यशाळेचे आयाेजन करण्यात आल्याचे मंत्री जानकर यांनी सांगितले. या मेळाव्यात पशुपालक, पशुसंवर्धन अधिकारी यांचा गाैरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन अन्न व आैषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता हाेणार आहे. पत्रकार परिषदेला पशुसंवर्धन आयुक्त किरण कुरंदकर आणि पशुसंवर्धन आयुक्त कांतिलाल उमाप उपस्थित हाेते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com