agriculture news in marathi, In the state green chilli per quintal 700 to 4000 | Agrowon

राज्‍यात हिरवी मिरची प्रतिक्विंटल ७०० ते ४०००
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल १६०० ते २५०० रुपये

औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल १६०० ते २५०० रुपये
औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २०) हिरव्या मिरचीची १२० क्‍विंटल आवक झाली. या हिरव्या मिरचीला १६०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. औरंगाबाद येथील बाजार समितीमध्ये ३ डिसेंबरला १४३ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला १००० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ५ डिसेंबरला ७५ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचे दर १००० ते १४०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ८ डिसेंबरला २०७ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचे दर ८०० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १० डिसेंबरला हिरव्या मिरचीची आवक १६३ क्‍विंटल तर दर १२०० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १२ डिसेंबरला २३३ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला १००० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १७ डिसेंबरला ९७ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १९ डिसेंबरला ३१९ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला १७०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

परभणीत प्रतिक्विंटल १५०० ते २२०० रुपये
परभणी : येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. २०) हिरव्या मिरचीची ५० क्विंटल आवक होती. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल १५०० ते २२०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. सध्या येथील फळे भाजीपाला मार्केटमध्ये स्थानिक परिसरातून तसेच मध्य प्रदेश, तेलंगणातून हिरव्या मिरचीची आवक होत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी ५० ते ७० क्विंटल आवक होती. त्या वेळी १००० ते २२०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. २०) हिरव्या मिरचीची ५० क्विंटल आवक असताना घाऊक विक्रीचा दर प्रतिक्विंटल १५०० ते २२०० रुपये होता. तर किरकोळ विक्री ३० ते ४० रुपये प्रतिकिलो दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.;

सोलापुरात प्रतिक्विंटल ७०० ते १६०० रुपये
सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात हिरव्या मिरचीची आवक कमी राहिली. पण मागणी असल्याने मिरचीचे दर टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात हिरव्या मिरचीची आवक रोज ३ ते पाच क्विंटलपर्यंत राहिली. मिरचीला प्रतिक्विंटल किमान ७०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि कमाल १६०० रुपये दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही मिरचीची आवक काहीशी वाढली. प्रतिदिन १० ते १५ क्विंटलपर्यंत राहिली. पण दरही टिकूनच होते. प्रतिक्विंटलला किमान ८०० रुपये, सरासरी १२०० रुपये आणि कमाल १६०० रुपये दर राहिला. दोन आठवड्यापूर्वी मिरचीची आवक ७ ते ८ क्विंटल प्रतिदिन होती. तर दर किमान ६०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि कमाल १७०० रुपये असा होता. केवळ आवक आणि मागणीतील तुटीमुळे दर मात्र काहीसे टिकून असल्याचे सांगण्यात आले.

नाशिकला प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये
नाशिक : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. १८) हिरव्या मिरचीची १५६ क्विंटलची आवक झाली. या वेळी मिरचीला प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० व सरासरी २५०० रुपये दर मिळाले. डिसेंबर महिन्यात हिरव्या मिरचीच्या आवकेची स्थिती सरासरी १५० क्विंटल इतकीच राहिली आहे.  मागील महिन्याच्या तुलनेत डिसेंबरमध्ये आवकेत ५० टक्‍क्‍यांनी घट झाली. या स्थितीत स्थानिक व जिल्ह्याबाहेरील बाजारपेठेतून हिरव्या मिरचीला मागणी राहिली. डिसेंबरअखेरपर्यंत मिरचीची आवक व दर स्थिर राहील, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

जळगावात प्रतिक्विंटल ९०० ते १४०० रुपये
जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीची गुरुवारी (ता. २०) २२ क्विंटल आवक झाली. मिरचीला ९०० ते १४०० व सरासरी १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. आवक जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, पारोळा, नंदुरबार, दोंडाईचा भागातून होत आहे. तिखट मिरचीचा पुरवठा काही अडतदार आंध्र प्रदेशातून करून घेत असून, या मिरचीला कमाल २००० रुपयांपर्यंतचा दर आहे, परंतु पाच ते सहा क्विंटल आवक या तिखट मिरचीची होते. बाजारात मिरचीची आवक टिकून आहे. तरही स्थिर असून, पुढे आवकेत घट होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे.

पुण्यात प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये
पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २०) हिरव्या मिरचीची सुमारे १० टेम्पो आवक झाली होती. आवकेमध्ये प्रामुख्याने आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातील मिरचीचा समावेश आहे. या वेळी दहा किलोला १५० ते २५० रुपयांपर्यंत दर होता. सध्याची आवक आणि दर हे सरासरी असल्याचे बाजार समिती सूत्रांनी सांगितले. पुणे बाजार समितीमध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांमधून प्रामुख्याने हिरव्या मिरचीची आवक होत असते. तर स्थानिक आवकेचे प्रमाण तुलनेने अत्यल्प आहे. स्थानिक आवकेमध्ये दररोज सुमारे २ ते ३ टेम्पोचा समावेश असतो.

सांगलीत प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये
सांगली ः येथील शिवाजी मंडईत गुरुवारी (ता. २०) हिरव्या मिरचीची २०० ते २५० पोत्यांची (एक पोते ३० ते ४० किलोचे) आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोस ३०० ते ४०० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. शिवाजी मंडईत कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांसह सांगली जिल्ह्यातील पलूस, मिरज, वाळवा या भागातून मिरचीची आवक होते, अशी माहिती मिरचीचे व्यापारी समीर बागवान यांनी दिली. बुधवारी (ता. १९) हिरव्या मिरचीची २५० ते ३०० पोत्यांची आवक झाली असून त्यास प्रति दहा किलोस ३०० ते ४०० रुपये असा दर होता. मंगळवारी (ता. १८) हिरव्या मिरचीची ३०० ते ४०० पोत्यांची आवक झाली असून त्यास प्रति दहा किलोस ३५० ते ४०० रुपये असा दर होता. गत सप्ताहापासून मिरचीची आवक आणि दर स्थिर आहेत. पुढील सप्ताहात मिरचीची आवक आणि दर स्थिर राहण्याची शक्‍यता व्यापारीवर्गाने व्यक्त केली आहे.

अकोल्यात प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये
अकोला ः येथील जनता भाजी बाजारात हिरव्या मिरचीच्या दरात सध्या सुधारणा झालेली दिसून येत अाहे. गुरुवारी (ता. २०) हिरवी मिरची १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाली. दिवसाला ५ ते सात टनांची मिरचीची अावक होत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. अकोला बाजारात सध्या स्थानिक भागातील मिरचीची अधिक अावक सुरू अाहे. प्रामुख्याने अकोला, वाशीम जिल्ह्यांतील ही मिरची अाहे. काही दिवसांपूर्वी मिरचीचा दर हा ८०० ते १४०० दरम्यान होता. मात्र, अाता दरांमध्ये थोडीफार सुधारणा होऊन हिरवी मिरची कमीत कमी १५०० व जास्तीत जास्त २००० पर्यंत विक्री झाली. उत्कृष्ट दर्जाची मिरची २२०० रुपये दराने विक्री झाली. गेल्या अाठवडाभरापासून मिरचीचे दर व अावक स्थिर झालेले अाहेत. येत्या काळात दरांची स्थिती कायम राहण्याचा अंदाज व्यापारी सूत्रांनी स्पष्ट केला.

इतर बाजारभाव बातम्या
साताऱ्यात टोमॅटो २५० ते ३५० रुपये प्रति...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोल्यात सोयाबीन प्रतिक्विंटल ३२०० ते...अकोला ः अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत...
संक्रांतीच्या तोंडावर भाजीपाल्याची...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत बटाटा ३०० ते ९०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल २२०० ते...परभणी ः येथील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी...
नारायणगाव उपबाजारात कोंथिबीर, मेथीतून...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार...
परभणी, नांदेड, हिंगोलीत सोयाबीनच्या...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
कळमणा बाजारात तूर प्रतिक्विंटल ४१०० ते...नागपूर ः येथील कळमणा बाजार समितीत बुधवारी (ता. ९...
आले पिकाचे दर स्थिरसातारा   ः गेल्या तीन ते चार...
कोल्हापुरात वांगे दहा किलोस १०० ते ४००...कोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात वांगी...
जळगावात गवार, भेंडी, मिरचीचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
परभणीत वाटाणा प्रतिक्विंटल १२०० ते २०००...परभणी ः येथील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी...
जळगावात भेंडी प्रतिक्विंटल १५०० ते ३०००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कांद्याची आवक कायम, दरांमध्ये चढउतारजळगावात ३५० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलचे दर...
पपई दरांबाबत शेतकऱ्यांची...धुळे ः पपई दरांचा तिढा खानदेशात दिवसागणिक वाढत...
थंडीमुळे अंड्याच्या दरात सुधारणाअमरावती ः थंडीमुळे मागणी वाढल्याने...
साताऱ्यात शेवगा प्रतिदहा किलो ४०० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
औरंगाबादेत द्राक्षे प्रतिक्विंटल २८००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत कोथिंबीर प्रतिक्विंटल १५०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
राज्‍यात हिरवी मिरची प्रतिक्विंटल ७००...औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल १६०० ते २५०० रुपये...