agriculture news in marathi, In the state, lady finger 700 to 3500 rupees | Agrowon

राज्यात भेंडी प्रतिक्विंटल ७०० ते ३५०० रुपये
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

परभणीत प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये

परभणीत प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये

परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. २५) भेंडीची १० क्विंटल आवक होती. भेंडीला प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. येथील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये स्थानिक परिसर तसेच पूर्णा तालुक्यातून भेंडीची आवक होत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी ७ ते १५ क्विंटल भेंडीची आवक झाली. त्या वेळी प्रतिक्विंटल सरासरी १२०० ते ३००० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. २५) भेंडीची १० क्विंटल आवक झाली होती. घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये होते. तर किरकोळ विक्री प्रतिकिलो ४० ते ६० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

जळगावात १५०० ते २००० रुपये
जळगाव ः येथील बाजार समितीत मागील २० ते २५ दिवसांपासून भेंडीची आवक रोडावली आहे. शेतकऱ्यांना बऱ्यापैकी दर मिळत असून, गुरुवारी (ता. २५) १५०० ते २००० रुपये आणि सरासरी १८०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. १४ क्विंटल आवक झाली. भेंडीची आवक एरंडोल, धरणगाव, पाचोरा व जामनेर भागातून होते. धरणगाव व एरंडोलमधून भेंडीची पाठवणूक मुंबई, ठाणे, कल्याण व पुणे भागात होत आहे. यामुळे या भागातून बाजार समितीत फारशी भेंडी येत नाही. पाचोरा भागातील भेंडीचा हंगाम जवळपास आटोपला आहे. धरणगावात भेंडी उपलब्ध आहे.
मागील महिनाभरात भेंडीला किमान १००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे. दर टिकून असून, पुढे दर आणखी वाढतील, असे संकेत मिळत आहेत.

अकोल्यात प्रतिक्विंटल ७०० ते १५०० रुपये
अकोला ः येथील जनता भाजी बाजारात सध्या भेंडीला कमीत कमी ७०० ते जास्तीत जास्त १५०० रुपयांपर्यंत क्विंटलला दर मिळत अाहे. गेल्या काही कालावधीपासून अावक स्थिर झालेली अाहे. भेंडीला सरासरी ७०० ते १५०० दरम्यान भाव मिळत आहे. दररोज एक टनापेक्षा अधिक प्रमाणात भेंडीची विविध ठिकाणांवरून अावक होत अाहे. पितृक्षात भेंडीचा दर चांगला होता. सध्या त्यात थोडी घसरण झाली. दुय्यम दर्जाची भेंडी  ५०० ते ८०० दरम्यान अाणि चांगल्या भेंडीला १२०० ते १५०० दरम्यान भाव मिळाला. किरकोळ बाजारात भेंडी ३० ते ४० रुपये किलोने विक्रेते विकत अाहेत. सध्या अावक स्थिरावलेली असून पुढील काळात अावक वाढल्यास दरांमध्ये उतार येऊ शकतो, अशी शक्यता व्यापारी सूत्रांकडून व्यक्त करण्यात अाली.

कोल्हापुरात प्रतिक्विंटल ५०० ते ३००० रुपये
कोल्हापूर : येथील बाजार समितीत भेंडीची दररोज दोनशे ते तीनशे करंड्या आवक झाली. भेंडीस दहा किलोस ५० ते ३०० रुपये दर होता. गेल्या पंधरवड्यापासून भेंडीचे दर स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. बाजार समितीत स्थानिक गावाबरोबरच बेळगाव भागातून ही भेंडीची आवक होते. सध्या कडक ऊन व ढगाळ हवामान यामुळे भेंडीचे व्यवस्थापन करणे कठीण होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. बाजार समितीत भेंडीची आवक
काहीशी वाढल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.

सांगलीत प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये
सांगली ः येथील शिवाजी मंडईत भेंडीची आवक कमी अधिक होत आहे. गुरुवारी (ता. २५) भेंडीची आवक २० बॉक्‍सची झाली असून त्यास प्रतिदहा किलोस १५० ते २०० रुपये असा दर मिळाला अशी, माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितली. मंडईत सांगली जिल्ह्यातील वाळवा, मिरज, पलूस तालुक्‍यांसह कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर, शिरोळ या भागांतून भेंडीची आवक होते. बुधवारी (ता. २४) भेंडीची आवक २५ बॉक्‍सची आवक झाली असून त्यास प्रतिदहा किलोस १५० ते २०० रुपये असा दर मिळाला. मंगळवारी (ता. २३) भेंडीची आवक २० बॉक्‍सची आवक झाली होती. भेंडीस प्रतिदहा किलोस १५० ते २०० रुपये असा दर मिळाला. गतसप्ताहापासून भेंडीची आवक आणि दर स्थिर असल्याची माहिती व्यापारी वर्गाने दिली.

साताऱ्यात प्रतिक्विंटल १५०० ते ३०००
सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. २५) भेंडीची २० क्विंटल आवक झाली आहे. भेंडीस प्रतिक्विंटलला १५०० ते ३००० असा दर मिळाला आहे. मागील तीन सप्ताहापासून भेंडीचे दर स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. फलटण, खटाव, कोरेगाव, सातारा तालुक्यातून भेंडीची आवक होत आहे. भेंडीची नऊ आॅक्टोबरला चार क्विंटल आवक झाली, भेंडीस क्विंटलला १५०० ते २५०० असा दर मिळाला आहे. २३ आॅक्टोबरला सहा क्विंटल आवक झाली. भेंडीस क्विंटलला १५०० ते २५०० असा दर मिळाला आहे. भेंडीची ३० ते ४० रुपयेप्रमाणे किरकोळ विक्री केली जात आहे.

पुण्यात प्रतिक्विंटल १००० ते ३५०० रुपये
पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २५) भेंडीची सुमारे पाच टेंपाे आवक झाली हाेती. या वेळी दहा किलाेला १०० ते ३५० रुपये दर हाेता. सध्याचे दर हे सरासरीपेक्षा जास्त असल्याचे अडत्यांनी सांगितले. भेंडीची प्रामुख्याने आवक ही पुणे विभागातील विविध जिल्ह्यांमधून हाेत अाहे.

नागपुरात प्रतिक्विंटल १२०० ते १५०० रुपये
नागपूर : स्थानिक बाजार समितीत सुरवातीला १२०० ते १७०० रुपये क्विंटल असलेल्या भेंडीच्या दरात मध्यंतरी तेजी आली होती. २५०० रुपये क्विंटलपर्यंत असलेले दर आता पुन्हा १५०० रुपयांवर आले आहेत. कळमणा बाजार समितीत भेंडीची १७० क्विंटल आवक सरासरी आहे. १२०० ते १६०० रुपये क्विंटलचे दर सुरवातीच्या काळात होते. ६ अॉक्टोबरपासून त्यात तेजी आली. हे दर १८०० ते २२०० रुपयांवर पोचले. ९ अॉक्टोबरला हेच दर २००० ते २५०० रुपये क्विंटल होते. १७ अॉक्टोबरपर्यंत दर तेजीत असताना त्यानंतर पुन्हा दरात घसरण झाली.

इतर अॅग्रो विशेष
‘कृष्णा’ आली दिघंचीच्या अंगणीदिघंची, जि. सांगली ः  अनेक वर्षे दिवास्वप्न...
जनावरांच्या बाजारातील व्यवहार उधारीवरचपरभणी: खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर काहीशी...
सहकार विभाग आयुक्तांविना पोरकापुणे : गेल्या आठ महिन्यांपासून राज्याच्या सहकार...
आत्मा प्रकल्प संचालक चौकशीत दोषीपुणे: कृषी खात्यातील वादग्रस्त अधिकारी बी. एन....
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ‘व्होट शेअर’...पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता...
खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू जळगाव ः खानदेशात मुबलक जलसाठे किंवा कृत्रिम...
कोकण वगळता उष्ण लाटेचा इशारापुणे : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या...
शेतकऱ्यांनो विकते ते पिकवाः डॉ. भालेअकोला ः येत्या हंगामात पीक लागवड करताना...
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...