agriculture news in marathi, In the state, Lemon per quintal 800 to 6000 rupees | Agrowon

राज्यात लिंबू प्रतिक्विंटल ८०० ते ६००० रुपये
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 मे 2019

जळगावात २४०० ते ४००० रुपये 

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ९) लिंबांची पाच क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल २४०० ते ४००० रुपयांपर्यंत मिळाले. दर मागील दोन महिन्यांपासून टिकून आहेत. कमाल दर मागील महिन्यात ४५०० रुपयांपर्यंत पोचले होते. आवक स्थिर असून ती पाचोरा, एरंडोल, जळगाव भागातून होत आहे. किरकोळ बाजारातील दर ६० रुपये प्रतिकिलोपर्यंत आहेत. आवक पुढेही स्थिर राहील, असा अंदाज बाजार समितीच्या सूत्रांनी व्यक्त केला. 

अमरावतीत ६० रुपये किलो

जळगावात २४०० ते ४००० रुपये 

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ९) लिंबांची पाच क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल २४०० ते ४००० रुपयांपर्यंत मिळाले. दर मागील दोन महिन्यांपासून टिकून आहेत. कमाल दर मागील महिन्यात ४५०० रुपयांपर्यंत पोचले होते. आवक स्थिर असून ती पाचोरा, एरंडोल, जळगाव भागातून होत आहे. किरकोळ बाजारातील दर ६० रुपये प्रतिकिलोपर्यंत आहेत. आवक पुढेही स्थिर राहील, असा अंदाज बाजार समितीच्या सूत्रांनी व्यक्त केला. 

अमरावतीत ६० रुपये किलो

आवक कमी असल्यामुळे सुधारणा झालेल्या लिंबूच्या दरात काहीशी घसरण नोंदविण्यात आली. हंगामाच्या सुरवातीला हे दर ७० ते ९० रुपये दरम्यान होते, अशी माहिती स्थानिक व्यापारी सूत्रांनी दिली. 

अमरावती बाजारात सद्यःस्थितीत लिंबूची ३०० पोत्यांची आवक आहे. उन्हाळ्यात मागणी वाढते. परिणामी, दरात सुधारणा होऊन त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. सुरवातीला तोडा कमी असल्याने बाजारात कमी लिंबू पोचते. त्यामुळे मार्च महिन्यात लिंबूचे दर ७० ते ९० रुपये किलो दरम्यान होते, अशी माहिती नांदगाव खंडेश्‍वर येथील लिंबू उत्पादक अंकुश झंझाट यांनी दिली. 

सध्या अमरावती बाजारात सरासरी ३०० पोते (१५ किलो क्षमतेचे पोते) लिंबू आवक होत आहे. त्यामुळे आवक वाढीस लागल्याने लिंबूचे दरात घसरण नोंदविण्यात आली. सध्या लिंबूला ५० ते ६० रुपये किलो असा दर मिळत असल्याची माहितीही अंकुश यांनी दिली. 

सोलापुरात सर्वाधिक ८०० रुपये दर

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात लिंबाला चांगली मागणी राहिली. त्यास प्रतिक्विंटलला सर्वाधिक ८०० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीत गतसप्ताहात लिंबाची रोज २० ते ३० क्विंटल आवक राहिली. ही आवक स्थानिक भागातून झाली. बाहेरील आवक खूपच कमी राहिली. पण गेल्या काही दिवसांपासून आवक कमीच होते आहे. या सप्ताहात लिंबूला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी ५०० रुपये आणि सर्वाधिक ८०० रुपये दर मिळाला. 

आधीच्या सप्ताहात हाच दर किमान २५० रुपये, सरासरी ४०० रुपये आणि सर्वाधिक ९०० रुपये राहिला. तर आवक रोज १५ ते २० क्विंटल राहिली. एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्यात आवक वाढली, ती २० ते ४० क्विंटलपर्यंत होती. तर प्रतिक्विंटलला किमान ३०० रुपये, सरासरी ४०० रुपये आणि सर्वाधिक १००० रुपये दर मिळाला. दरातील किरकोळ चढ-उतार वगळता दर स्थिर राहिले.

औरंगाबादेत ३००० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटल

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ९) लिंबूची २० क्‍विंटल आवक झाली. त्यास ३००० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये २५ एप्रिल रोजी लिंबाची १२ क्‍विंटल आवक झाली. त्याचे दर ४५०० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ३० एप्रिल रोजी १५ क्‍विंटल आवक झाली. या लिंबूला ३००० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. लिंबाची २ मे रोजी १७ क्‍विंटल आवक झाली. या लिंबूचा दर ३५०० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ४ मे रोजी १० क्‍विंटल आवक झालेल्या लिंबूचे दर २५०० ते ६५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. 

७ मे ला २२ क्‍विंटल आवक झाली. लिंबूला ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ८ मे ला लिंबूची आवक केवळ ३ क्‍विंटल, तर दर २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

नाशिकात प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ८) रोजी लिंबूची आवक १२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३००० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सोमवार (ता. ६) रोजी लिंबूची आवक २० क्विंटल झाली. त्यास २२०० ते ४४०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ३६०० मिळाला. शनिवारी (ता. ४ ) लिंबूची आवक ८ क्विंटल झाली. त्यास २८०० ते ४५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ४००० होते.

शुक्रवारी (ता. ३) लिंबूची आवक १५ क्विंटल झाली. तिला ३००० ते ४६०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ४३०० होते. 
गुरूवारी (ता. २) लिंबूची आवक १० क्विंटल झाली. तिला ३००० ते ४८०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ४२०० होते. मागील आठवड्यापासून बाजार समितीत लिंबूच्या अवकेत चढ उतार सुरू आहे. बाजारात होत असलेल्या आवकेच्या कमी जास्त प्रमाणामुळे बाजारभावतही चढ उतार दिसून आली.

सांगलीत प्रतिशेकडा ३०० ते ४०० रूपये

शिवाजी मंडईत लिंबाची आवक कमी अधिक प्रमाणात झाली. गुरुवारी (ता. ९) लिंबाची ९० ते १०० पोती (एक पोते ५० किलोचे) आवक झाली. त्यास प्रतिशेकडा ३०० ते ४०० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सुत्रांनी दिली.

शिवाजी मंडईत विजापूर, कर्नाटक, बार्शी, कुर्डुवाडी या भागातून आवक होते. मंडईत एक दिवसाआड लिंबाची आवक होते. मंगळवारी (ता. ७) लिंबाची १०० ते १२० पोत्यांची आवक झाली असून त्यास प्रति शेकड्यास ३५० ते ४५० रुपये असा दर होता. सोमवारी (ता. ६) लिंबाची १०० ते १२० पोत्यांची आवक झाली असून त्यास प्रति शेकड्यास ३५० ते ४५० रुपये असा दर होता.

शनिवारी (ता. ६) लिंबाची १०० ते १२० पोत्यांची आवक झाली. त्यास प्रति शेकड्यास ३५० ते ४५० रुपये असा दर होता. 
शुक्रवारी (ता. ३) लिंबाची ९० ते १०० पोती (एक पोते ५० किलोचे) आवक झाली. त्यास प्रति शेकडा ३०० ते ४०० रुपये असा दर मिळाला. गत सप्ताहापेक्षा या आठवड्यात लिंबूची आवक कमी झाली. त्यास प्रति शेकड्यास २० ते ३० रुपयांनी दर वाढले आहेत. लिंबूची आवक अशीच राहिली, तर दरात वाढ होण्याची शक्यता व्यापारी वर्गाने वर्तविली.

परभणीत ३५०० ते ६००० रुपये

पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. ९) लिंबाची १५ क्विंटल आवक झाली. लिंबाला प्रतिक्विंटल ३५०० ते ६००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

सध्या येथील बाजारात सेलू, परभणी तालुक्यातून लिंबाची आवक होत आहे. गत महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी १२ ते २० क्विंटल आवक होती. त्या वेळी प्रतिक्विंटल सरासरी ३००० ते ६५०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. ९) लिंबाची १५ क्विंटल आवक झाली. त्या वेळी त्याच्या घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल ३५०० ते ६००० रुपये होते. किरकोळ विक्री प्रतिकिलो ७० ते ८० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

कोल्हापुरात क्विंटलला २००० ते ३००० रूपये

येथील बाजार समितीत लिंबूची दररोज दीडशे ते दोनशे पोती आवक होत आहे. लिंबूस क्विंटलला २००० ते ३००० रुपये इतका दर मिळत आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर लिंबूच्या आवकेत वाढ होत असल्याची माहिती फळविभागाच्या सूत्रांनी दिली.

बाजार समितीत बेळगाव व परिसरातून लिंबूची आवक होते. सध्या लग्नसराई व उन्हाळा वाढत असल्याने लिंबूची मागणी वाढत आहे. गेल्या चार दिवसात लिंबूची आवक दहा ते १५ टक्यांनी वाढली आहे, अशी माहिती येथील बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
 

इतर बाजारभाव बातम्या
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये टरबूज प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिकमध्ये टरबुजाची आवक ९६० क्विंटल झाली...
पुण्यात कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरचीचे दर...पुणे  : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत कोबीला प्रतिक्विंटल १२०० ते २०००...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात वांगी प्रतिक्विंटल ५०० ते ३०००...साताऱ्यात १५०० ते २००० रुपये सातारा येथील...
जळगावात आले प्रतिक्विंटल ३००० ते ७०००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक : नाशिकमध्ये ढोबळी मिरचीची आवक १६३...
सोलापुरात कांदा दरात किंचित सुधारणासोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे बाजार समितीत श्रावण घेवडा,...पुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
राजस्थान, मध्य प्रदेशातून गव्हाच्या...जळगाव : बाजार समितीमधील किरकोळ व घाऊक विक्रेते,...
परभणीत काकडीला प्रतिक्विंटल ७०० ते १५००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात लिंबू प्रतिक्विंटल ८०० ते ६०००...जळगावात २४०० ते ४००० रुपये  जळगाव : कृषी...
कोल्हापुरात टोमॅटोला प्रति दहा किलोस ५०...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
सोलापुरात मेथी, शेपूला उठाव, दरात...सोलापूर  : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात केळीच्या दरात ६० रुपयांनी...जळगाव  ः खानदेशात केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मानवत बाजार समितीत उद्यापासून हळद खरेदीमानवत, जि. परभणी ः मानवत येथील कृषी उत्पन्न बाजार...
अक्षय तृतीयेनिमित्त आंब्याला मागणीपुणे ः मंगळवारी (ता. ७) साजऱ्या होणाऱ्या अक्षय...
औरंगाबादेत आंबा ४ हजार ते १० हजार रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत शेवग्याला प्रतिक्विंटल १५०० ते...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...