agriculture news in marathi, State-level Agricultural Exhibition at Pandharpur for Ashadhi | Agrowon

आषाढीनिमित्त पंढरपुरात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन
टीम अॅग्रोवन
शनिवार, 30 जून 2018

सोलापूर  : आषाढी यात्रेनिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन येत्या २१ ते २५ जुलैदरम्यान होणार असून, २२ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे, अशी माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली. या वेळी बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे, उपसभापती विवेक कचरे उपस्थित होते.

सोलापूर  : आषाढी यात्रेनिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन येत्या २१ ते २५ जुलैदरम्यान होणार असून, २२ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे, अशी माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली. या वेळी बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे, उपसभापती विवेक कचरे उपस्थित होते.

दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी व शेतकरी पंढरपुरात येतात. त्यांना कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, विविध संशोधित औजारे व मशिनरी यांचे प्रात्यक्षिक पाहता यावे, देशी गायींचे संगोपन, शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळावी, यशस्वी शेतकऱ्यांची यशोगाथा अनुभवता यावी, यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. प्रदर्शनाचे हे तिसरे वर्ष असून, यंदा प्रदर्शनासोबतच देशी गायींचे प्रदर्शनदेखील आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने खिलार, गीर, लाल कंधारी, देवणी, कोकण गिड्डा आदी जातींच्या पशुधनाचा समावेश आहे.

 या प्रदर्शनामध्ये ३०० पेक्षा जास्त स्टॉल्स, प्रात्यक्षिके, पाच एकर क्षेत्रावर सेंद्रिय शेतीमाल महोत्सव, देशी बियाणे प्रदर्शन, महिला बचत गट अशा वेगवेगळ्या दालनांचा समावेश आहे. या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त वारकरी व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन घाडगे यांनी केले आहे.

इतर ताज्या घडामोडी
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...