agriculture news in Marathi, state level big solar project in Lasalgaon, Maharashtra | Agrowon

राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प लासलगाव येथे कार्यान्वित
टीम अॅग्रोवन
रविवार, 19 मे 2019

नाशिक: कृषिपंपांना दिवसा वीज मिळावी, या शेतकऱ्यांच्या बहुप्रतीक्षित मागणीची पूर्तता करण्यासाठी सरकार आणि महावितरणकडून विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. त्यातील ''मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी'' या योजनेअंतर्गत स्वमालकीच्या जागेवरील महावितरणचा राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे नुकताच कार्यान्वित करण्यात आला. जिल्ह्यात सध्या ३ प्रकल्पांमधून ३ मेगावाॅटपेक्षा अधिकची सौरऊर्जा निर्माण होत आहे. 

नाशिक: कृषिपंपांना दिवसा वीज मिळावी, या शेतकऱ्यांच्या बहुप्रतीक्षित मागणीची पूर्तता करण्यासाठी सरकार आणि महावितरणकडून विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. त्यातील ''मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी'' या योजनेअंतर्गत स्वमालकीच्या जागेवरील महावितरणचा राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे नुकताच कार्यान्वित करण्यात आला. जिल्ह्यात सध्या ३ प्रकल्पांमधून ३ मेगावाॅटपेक्षा अधिकची सौरऊर्जा निर्माण होत आहे. 

मुख्य अभियंता श्री. ब्रिजपालसिंह जनवीर, अधीक्षक अभियंता श्री. प्रवीण दरोली यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकल्प नुकताच कार्यान्वित करण्यात आला. या वेळी कार्यकारी अभियंता श्री. मधुसूदन वाढे, श्री. सुरेश सवाईराम, श्री. मनीष ठाकरे, श्री. अनिल थोरात, उपकार्यकारी अभियंता श्री. प्रवीण सोनवणे यांच्यासह अभियंते व कर्मचारी उपस्थित होते. 

दिवसा वीज उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची अनेक दिवसांपासूनची मागणी; तसेच कृषीक्षेत्राला माफक दरात व आवश्यकतेनुसार वीजपुरवठा करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना हाती घेतली. महानिर्मिती व महाऊर्जा यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक व खासगी सहकार्यातून या योजनेतील प्रकल्प कृषीपंप वापर अधिक असलेल्या ठिकाणी उभे राहत आहेत. लासलगाव उपकेंद्र परिसरात जवळपास २० हजार चौरस मीटर जागेवर उभारण्यात आलेला १.३ मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प महावितरणच्या स्वमालकीच्या जागेतील राज्यातील मोठा प्रकल्प आहे. 

यापूर्वी वावी येथे ०.७३ मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प सप्टेंबर-२०१८ मध्ये कार्यान्वित झाला आहे, तर वणी येथील ०.९९ क्षमतेचा प्रकल्प मे-२०१९ च्या पहिल्या आठवड्यात सुरू झाला. याशिवाय गिरणारे उपकेंद्र परिसरात ०.७९ मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच वीजनिर्मिती अपेक्षित आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर विभागात आश्वी खुर्द येथील ०.८८ व कोळपेवाडी येथील ०.६७ मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पांचे कामही अंतिम टप्प्यात आहे. हे प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर नाशिक परिमंडळात महावितरणच्या जागेतील प्रकल्पातून ५.३६ मेगावा ट सौरऊर्जा वापरात येईल. प्रकल्प परिसरात कृषिपंपांचा भार १५.६५ च्या दरम्यान आहे. 
 

इतर अॅग्रो विशेष
मॉन्सून एक्सप्रेस कोकणात दाखल;...पुणे : अरबी समुद्रात आलेल्या वायू चक्रीवादळामुळे...
नवसंकल्पना ठीक; पण... राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे राज्यात ‘...
उत्पन्न दुपटीसाठी आत्ताही अपुरे उपाय दर्जेदार बियाणांची उपलब्धता  शेतकऱ्यांना...
सौर कृषिपंप योजनेतील लाभार्थी हिस्सा...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत...
कृषी विभागात बदल्यांची धूमपुणे  : राज्यात ऐन खरिपाच्या नियोजनात कृषी...
मका लागवड तंत्रज्ञानपेरणी     खरीप हंगाम ः १५...
पावसाचा प्रत्येक थेंब जिरवा ः...पुणे  ः पावसाच्या पाण्याचे विविध प्रयोगांनी...
मॉन्सून आज कोकणात?पुणे  : अरबी समुद्रात आलेल्या ‘वायू’...
ग्रामविकासाचा आदर्श झालेले वडगाव पांडे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या...
राज्यात डाळिंबाचा मृग बहर अडचणीतसांगली ः राज्यात डाळिंबाचे क्षेत्र एक लाख ३० हजार...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : मॉन्सूनच्या आगमनास पोषक स्थिती...
सिंधुदुर्ग जिल्हयात मुसळधार पाऊस (video...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात बुधवारी (ता....
मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रणमहाराष्ट्रात फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा...
राज्य अर्थसंकल्प : सर्वसमावेशक ‘निवडणूक...मुंबई : राज्यात मोसमी पाऊस लांबला असला तरी आगामी...
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची...शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य...
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजपुणे   : राज्यातील मॉन्सूनचे आगमन...
जुनीच वाट की नवी दिशाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ...
कोरड्या महाराष्ट्रावर घोषणांचा पाऊसराज्यात सत्तेत आल्यानंतर शेतीतील गुंतवणूक वाढविली...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
बोंडअळी निर्मूलन प्रकल्पात आठ राज्यांचा...नागपूर : देशात सर्वात आधी गुजरात त्यानंतर...