agriculture news in marathi, state level essay competition on farmers issue, Maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत राज्यस्तरीय निबंध स्पर्धा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

पुणे : भारताला स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षे झाली, तरी भारतातील शेतकरी आजही पारतंत्र्यात आहे. कायद्याच्या विळख्याने त्याला जखडून टाकले आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांवर विचारमंथन होण्यासाठी फोरम ऑफ इंटेलेक्चुअल्स आणि किसान पुत्र आंदोलनाच्या वतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

पुणे : भारताला स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षे झाली, तरी भारतातील शेतकरी आजही पारतंत्र्यात आहे. कायद्याच्या विळख्याने त्याला जखडून टाकले आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांवर विचारमंथन होण्यासाठी फोरम ऑफ इंटेलेक्चुअल्स आणि किसान पुत्र आंदोलनाच्या वतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

राज्यकर्त्यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ घटनेमध्ये वारंवार बदल करत शेतकऱ्यांच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली केली. त्यांना अन्यायाविरुद्ध न्यायालयामध्ये दाद ही मागता येऊ नये, अशी व्यवस्था निर्माण केली. ‘शेतकरी विरोधी कायदे’ हेच शेतकऱ्यांना गुलाम बनवून शोषण करीत आहेत. १९ मार्च १९८६ ला साहेबराव करपे कुटुंबीयांच्या आत्महत्येपासून ते जानेवारी २०१८ मध्ये मंत्रालयात आत्महत्या करणारे धर्मा पाटीलपर्यंत महाराष्ट्रात सुमारे ७२ हजार तर देशात ३ लाखांच्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. शेतकरी आणि स्त्री हे दोघेही निर्मितीचे, सर्जनशीलतेचे प्रतीक सध्या संकटात आहेत. 

नवविचारधारेच्या १६ ते ३५ वयोगटातील युवक व युवतींसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धकांनी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील १५०० शब्दांपर्यंतचे निबंध ३० नोव्हेंबरपर्यंत पाठवायचे आहेत. पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे पाच, तीन, दोन हजार रुपये, तर पाच स्पर्धकांना पाचशे रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिके आणि प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे आयोजक फोरम ऑफ इंटेलेक्चुअल्सचे अध्यक्ष सतीश देशमुख आणि किसान पुत्र आंदोलनाचे प्रवर्तक अमर हबीब यांनी कळविले आहे.
 
स्पर्धकांनी त्यांचे लेख खालील संपर्कावर इमेल, व्हॉट्सअॅप, स्पीड पोस्ट किंवा प्रत्यक्ष हस्ते पाठवावेत.

सतीश देशमुख, बी. ई. (मॅकेनिकल)
deshmukhsk२९@gmail.com
मो. नं ९८८१४९५५१८
जी ६५, आदित्यनगर, गाडीतळ,
हडपसर, पुणे - ४११०२८

निबंधाचे विषय

  • शेतकरीविरोधी कायदे
  • शेतकरी व स्त्री - संकटात
  • शेतकरी आत्महत्यांची कारणे आणि उपाययोजना

इतर अॅग्रो विशेष
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...
वाघाड पाणीवापर संस्थांनी शेतीतून उभारले...नाशिक जिल्ह्यात वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर...
कम पानी, मोअर पानी देणारे डाॅ. वने...नगर जिल्ह्यातील मानोरी येथील कृषिभूषण डॉ....
आसूद : पाणी वितरणाचे अनोखे मॉडेलरत्नागिरी जिल्ह्यात दापोली-हर्णे रस्त्यावर दोन...
विकासाची गंगा आली रे अंगणी...खानदेशात जळगाव, जामनेर व भुसावळ या तालुक्‍यांच्या...
मराठवाड्यात सिंचनातले सर्वोच्च...परभणी जिल्ह्यात वरपूड येथील चंद्रकांत अंबादासराव...
होय, कमी पाण्यात विक्रमी ऊस !सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी येथील प्रयोगशील ऊस...
राज्यात नीचांकी हरभरा खरेदीमुंबई : राज्यातील हरभरा उत्पादक...
सीमेवरील तणावाचा केळी निर्यातीला फटकारावेर, जि. जळगाव : जम्मू-काश्मीर नियंत्रण रेषेजवळ...
ॲग्रोवनच्या ‘मराठवाड्यातलं इस्त्राईल :...जालना : कष्ट उपसणारी पहिली पिढी, पीक बदलातून...