कोणीही उठून ऊसदर ठरवायला हा काय मटक्याचा अड्डा नव्हे

सदाभाऊ खोत
सदाभाऊ खोत

कोल्हापूर : ‘कोणीही उठून ऊसदर ठरवायला हा काय मटक्याचा अड्डा नव्हे’, असे धक्कादायक वक्तव्य एकेकाळी याप्रश्‍नी आंदोलन करणारे आणि विद्यमान राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. सदाभाऊंना मंत्रिपद मिळाल्यानंतर अशी उपरती झाल्याची टीकाही होत आहे.  मुख्याध्यापक संघाचे अधिवेशन गुरुवारी (ता. २६) येथे झाले. या प्रसंगी राज्यमंत्री खोत यांनी असे विधान करून खळबळ उडून दिली. दोनच दिवसांनंतर स्वाभिमानीची ऊस दर परिषद जयसिंगपूर येथे होत आहे. या पार्श्वभूमीवर श्री. खोत यांनी ही टीका केल्याने ऊसदराचे राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. ‘‘कोणीही उठून ऊसदर ठरवायला हा काय मटक्याचा अड्डा नव्हे. कृषिमूल्य आयोग जो ठरवेल तोच दर अंतिम राहील,’’ असे प्रतिपादन राज्यमंत्री खोत यांनी येथे केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com