डांगी गाईंच्या संवर्धनासाठी राज्यभर चळवळ उभारणार

डांगी गाईंच्या संवर्धनासाठी राज्यभर चळवळ उभारणार
डांगी गाईंच्या संवर्धनासाठी राज्यभर चळवळ उभारणार

नाशिक : महाराष्ट्रातील दूधउत्पादनासाठी गुजरातमधील गीर गाईचा वापर वाढत आहे. यामुळे महाराष्ट्रातील डांगी गायींकडे दुर्लक्ष होत आहे. डांगी गाईंची संख्या कमी होऊ नये, यासाठी राज्यातील तीनशे गाईंचे शास्त्रोक्त पद्धतीने संगोपन करण्याबरोबरच डांगी गाईंच्या संवर्धनासाठी राज्यभरात चळवळ उभारली जाईल, असा निर्धार सह्याद्री डांगी गो संवर्धन संस्थेतर्फे आयोजित राज्यव्यापी महासंमेलनात करण्यात आला.

या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी पशुसंवर्धन सहआयुक्त धनंजय परकाळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय विसावे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे, संभाजी आव्हाड, संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

‘‘राज्यातील डांगी गायींची संख्या वाढविण्यासाठी चळवळ उभी राहावी. यामध्ये शेतकरी तसेच दूधउत्पादकांचा लक्षणीय सहभाग असावा’’, असे मत सहआयुक्त परकाळे यांनी व्यक्त केले.

पशुवैद्यांची मदत घेणार संस्थेतर्फे गायींच्या आहार नियोजनासाठी पशू आहारतज्ज्ञ नेमला जाणार आहे. आरोग्याच्या काळजीसाठी पशुवैद्यांची मदत घेण्यात येईल. गायींची माहिती संकलित केली जाईल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com