agriculture news in marathi, State plans for Artificial Rain in drought proven area | Agrowon

राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरू
मारुती कंदले
गुरुवार, 23 मे 2019

मुंबई : राज्यातील यंदाच्या भीषण दुष्काळाची पार्श्वभूमी आणि आगामी हंगामातही दुष्काळी विदर्भ, मराठवाड्यात अपुरा पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त होत असल्याने फडणवीस सरकार दुष्काळी पट्ट्यात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या विचारात आहे. राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाने तसा प्रस्ताव तयार करून तो वित्त विभागाच्या मान्यतेसाठी पाठवला आहे.

मुंबई : राज्यातील यंदाच्या भीषण दुष्काळाची पार्श्वभूमी आणि आगामी हंगामातही दुष्काळी विदर्भ, मराठवाड्यात अपुरा पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त होत असल्याने फडणवीस सरकार दुष्काळी पट्ट्यात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या विचारात आहे. राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाने तसा प्रस्ताव तयार करून तो वित्त विभागाच्या मान्यतेसाठी पाठवला आहे.

गेल्या वर्षी राज्यात पावसाचा मोठा खंड पडला. त्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबरपासूनच राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढू लागली. चालू वर्षी राज्यात १९७२ पेक्षाही मोठी दुष्काळी स्थिती असल्याचे चित्र आहे. पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा याची मोठी  टंचाई आहे. शेती विशेषतः दुष्काळी भागात फळबागांच्या क्षेत्राचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यातच याही वर्षी राज्यातील दुष्काळी विदर्भ, मराठवाड्यात प्रतिकूल पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला.

लोकसभा निवडणुकीपाठोपाठ राज्यात लगेचच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. येत्या हंगामातही दुष्काळी स्थिती कायम राहिली तर अजूनच शेतकरी आणि नागरिकांच्या तीव्र असंतोषाला सामोरे जावे लागेल, अशी शक्यता आहे. याचे पडसाद आगामी निवडणुकीतही उमटू शकतात. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने कृत्रिम पावसाच्या प्रयोगांची तयारी सुरू केली आहे. 

राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाने कृत्रिम पावसाचे प्रयोग सुरू करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करून तो पुढील मान्यतेसाठी वित्त विभागाला सादर केला आहे. वित्त विभागाचा हिरवा कंदील मिळताच हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी ठेवला जाईल, असे मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी स्पष्ट केले. त्यानंतर टेंडर प्रक्रिया करून कंपनीची नियुक्ती केली जाईल. 

कृत्रिम पावसाच्या प्रयोगांसाठी सुमारे तीस कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राज्यातील पावसाचा अंदाज येताच राज्य शासनाकडून कृत्रिम पाऊस पाडण्याचे निश्चित केले जाईल. त्यासाठीचे केंद्र कुठे असेल हे ठरवले जाईल. साधारण जुलै, ऑगस्टमध्ये राज्यातील दुष्काळी भागात कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयत्न केले जातील.
राज्यात २००३ साली पहिल्यांदा कृत्रिम पावसाचे प्रयोग राबवण्यात आला होता. तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या पुढाकाराने कृत्रिम पावसाचा निर्णय घेण्यात आला होता. २००३ साली राज्यात झालेल्या प्रयोगाच्या वेळी ‘पायपर शाइन’ या विमानातून ढगांमध्ये पावसाची बिजे फवारण्यात आली होती. त्यानंतर २०१५ मध्येही राज्यात कृत्रिम पावसाचे प्रयोग झाले आहेत.

प्रयोगांमध्ये सातत्य हवे, तरच अपेक्षित लाभ
राज्यात कमी पाऊस पडणाऱ्या तालुक्यांची संख्या मोठी आहे. जवळजवळ एक-तृतीयांश भागावर बहुतांश वर्षी अपुराच पाऊस असतो. त्यामुळे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी दुष्काळाची वाट पाहणे योग्य नाही. चीनमध्ये चांगला पाऊस पडत असतानासुद्धा हे प्रयोग हाती घेतले जातात. या प्रयोगांमध्ये सातत्य लागते. आपल्याकडे मात्र दुष्काळ पडल्यावर जाग येते आणि बरा पाऊस झाला की प्रयोग थांबतात, मग त्याचा लाभ कसा होणार असा सवाल या क्षेत्रातील जाणकार करीत आहेत.  

इतर अॅग्रो विशेष
मॉन्सून एक्सप्रेस कोकणात दाखल;...पुणे : अरबी समुद्रात आलेल्या वायू चक्रीवादळामुळे...
नवसंकल्पना ठीक; पण... राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे राज्यात ‘...
उत्पन्न दुपटीसाठी आत्ताही अपुरे उपाय दर्जेदार बियाणांची उपलब्धता  शेतकऱ्यांना...
सौर कृषिपंप योजनेतील लाभार्थी हिस्सा...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत...
कृषी विभागात बदल्यांची धूमपुणे  : राज्यात ऐन खरिपाच्या नियोजनात कृषी...
मका लागवड तंत्रज्ञानपेरणी     खरीप हंगाम ः १५...
पावसाचा प्रत्येक थेंब जिरवा ः...पुणे  ः पावसाच्या पाण्याचे विविध प्रयोगांनी...
मॉन्सून आज कोकणात?पुणे  : अरबी समुद्रात आलेल्या ‘वायू’...
ग्रामविकासाचा आदर्श झालेले वडगाव पांडे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या...
राज्यात डाळिंबाचा मृग बहर अडचणीतसांगली ः राज्यात डाळिंबाचे क्षेत्र एक लाख ३० हजार...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : मॉन्सूनच्या आगमनास पोषक स्थिती...
सिंधुदुर्ग जिल्हयात मुसळधार पाऊस (video...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात बुधवारी (ता....
मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रणमहाराष्ट्रात फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा...
राज्य अर्थसंकल्प : सर्वसमावेशक ‘निवडणूक...मुंबई : राज्यात मोसमी पाऊस लांबला असला तरी आगामी...
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची...शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य...
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजपुणे   : राज्यातील मॉन्सूनचे आगमन...
जुनीच वाट की नवी दिशाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ...
कोरड्या महाराष्ट्रावर घोषणांचा पाऊसराज्यात सत्तेत आल्यानंतर शेतीतील गुंतवणूक वाढविली...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
बोंडअळी निर्मूलन प्रकल्पात आठ राज्यांचा...नागपूर : देशात सर्वात आधी गुजरात त्यानंतर...