agriculture news in marathi, state provieds 25 lakh rupees subsidy to Cow shelter programe | Agrowon

गाेवंश सेवा केंद्रांना प्रत्येकी २५ लाख अनुदानास मंजुरी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 2 एप्रिल 2018

पुणे : गाेवंश हत्याबंदीनंतर भाकड गाेवंश संगाेपनासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या ‘गाेवर्धन गाेवंश सेवा केंद्रांना द्यावयाच्या अनुदानातील २५ लाखांचे अनुदान देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

पुणे : गाेवंश हत्याबंदीनंतर भाकड गाेवंश संगाेपनासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या ‘गाेवर्धन गाेवंश सेवा केंद्रांना द्यावयाच्या अनुदानातील २५ लाखांचे अनुदान देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

मुंबई आणि उपनगर हे दाेन जिल्हे वगळता २१ जिल्ह्यांमध्ये स्वयंसेवी संस्थांद्वारे स्थापन करण्यात आलेल्या प्रत्येक केंद्रांना चार टप्प्यात प्रत्येकी १ काेटी रुपयाचे अनुदान देण्यात येणार आहे. त्यामधील पहिला टप्पा शासनाने संबंधित संस्थांना वितरित केला आहे. या याेजने अंगर्तत दुग्धाेत्पादनास, शेतीकामास, पशू पैदाशीस आणि आेझी काम करण्यास उपयुक्त नसलेल्या गाय, वळू, बैल या गाेवंशाचा सांभाळ गाेवंश सेवा केंद्राद्वारे करण्यात येत आहे.

पात्र संस्थांची निवड पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीद्वारे करण्यात आली आहे. देशी गाेवंशाच्या संवर्धन आणि जनुकीय सुधारणांसाठी कृत्रीम रेतन करून घ्यावे, यानंतर पैदास झालेली दर्जेदार गाेवंश शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध करावा, तर पशुधनामधील आंतरपैदाशीतून निर्माण झालेल्या वळूंची खच्चीकरण करण्यात यावे आदी सूचना शासनाने संस्थांना केल्या आहेत.

अनुदानास पात्र जिल्हानिहा संस्था  

 1. गाेरक्षण संस्था, यवतमाळ 
 2.  श्री गाेपाळकृष्ण संस्था, जळगाव.
 3.  भारतीय उत्कर्ष मंडळ, नागपूर.  
 4.  श्रीकृष्ण गाेरक्षण संस्था, गाेंदिया.  
 5.  गाेकुलम गाेरक्षण संस्था, अमरावती. 
 6.  दिलीपबाबा गाेरक्षण संस्था, वाशीम 
 7.  गाे विज्ञान अनुसंधान संस्था, जळगाव 
 8.  श्री सिद्धगिरी मठ, काेल्हापूर 
 9.  श्री संत संकेश्‍वर जैन युवा मंडळ, साेलापूर 
 10.  श्री संत ज्ञानेश्‍वर माउली, रत्नागिरी 
 11.  श्रीकृष्ण गाेशाळा ट्रस्ट, रायगड 
 12.  विश्‍वात्मक जंगली महाराज आश्रम, ठाणे 
 13.  संत जनाबाई महिला मंडळ, पाथर्डी, नगर 
 14.  ब्रह्मचारी साेमेश्‍वर चैतन्य संस्था, नाशिक 
 15.  नवकार शाळा पाजरपाेळ, धळे 
 16.  पांजरापाेळा गाेशाळा सेवा मंडळ, नंदूरबार 
 17.  गाेरक्षण संस्था, साेमनाथपूर उदगीर, लातूर 
 18.  श्री छत्रपती शिवाजी गाेशाळा, परभणी 
 19.  प्रियदर्शनी मागासवर्गीय विकास महिला मंडळ, भाेकर, नांदेड
 20.  गाेरक्षण आदिवासी सेवाभावी संस्था, सेनगाव, हिंगाेली 
 21.  यशवंत बहुद्देशीय सेवाभावी संस्था, बीड

इतर ताज्या घडामोडी
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...