राज्याचे साखर उत्पादन २७ लाख टनांनी वाढण्याची चिन्हे

राज्याचे साखर उत्पादन २७ लाख टनांनी वाढण्याची चिन्हे
राज्याचे साखर उत्पादन २७ लाख टनांनी वाढण्याची चिन्हे

पुणे : राज्यात भरपूर ऊस उपलब्ध असल्याने सध्या १८४ साखर कारखाने वेगाने गाळप करीत आहेत. काही जिल्ह्यांत यंदा एप्रिलअखेरपर्यंत गाळप सुरू राहणार असून, यामुळे आधीच्या राज्याचे साखर उत्पादन आधीच्या अंदाजापेक्षा २७ लाख टनांनी वाढण्याची शक्यता आहे. उसाचे गाळप आतापर्यंत ६०० लाख टनांच्या पुढे गेले आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत अवघे ३८९ लाख टन होते. तसेच गेल्या हंगामाचे एकूण गाळप ४२० लाख टनांचे होते. 'राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वात प्रथम गाळपाला सुरवात झाली. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच पैठण भागात शरद सहकारी साखर कारखान्याने गाळपाला सुरवात केली आहे. कारखान्यांचा गाळप संपण्याऐवजी काही कारखाने नव्या दमाने गाळपाला उतरले आहेत. त्यामुळे मार्चअखेर बहुतेक साखर कारखान्यांचे गाळप सुरू राहील. त्यातही काही कारखाने एप्रिलअखेरपर्यंत बॉयलर पेटता ठेवतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. शेतकऱ्यांकडून यंदा एकूण ९०० लाख टन ऊस पिकवला जाण्याचा अंदाज आहे. त्यातील ८० हजार टन ऊस चारा रसवंतीसाठी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान ८०० लाख टनांच्या पुढे ऊस गाळपाला उपलब्ध राहण्याची शक्यता वाटते. विशेष म्हणजे उसाची उत्पादकता देखील शासनाने प्रतिहेक्टर ८० टन गृहीत धरलेली असताना प्रत्यक्षात आता उत्पादकता ९३ ते १०० टनांपर्यंत मिळते आहे. त्यामुळे साखर उत्पादनात भरीव वाढ होणार आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. गाळपासाठी विविध जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत १८४ कारखाने उतरले आहेत. त्यात ८७ सहकारी आणि ६२ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. राज्यात आतापर्यंत ६२० लाख टन गाळप करून ६६.८९ लाख टन साखर तयार केली आहे. राज्याचा साखर उतारा सध्या सरासरी १०.०४ टक्के मिळतो आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत १४९ कारखान्यांनी अवघा ३३९ लाख टन ऊस गाळून ३७.५० लाख टन साखर तयार केली होती. उसाची भरपूर उपलब्धता हे राज्यातील साखर कारखान्यांसाठी आनंदाची बाब असली तरी घसरलेल्या साखर दरामुळे कारखान्यांची चिंता वाढली आहे. ३५ रुपये किलोने तयार होणारी साखर सध्या २८ ते २९ रुपये प्रतिकिलोने विकण्याची वेळ आल्यामुळे कारखान्यांचा तोटा वाढणार आहे. - श्रीराम शेटे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ राज्यातील उसाची विभागनिहाय गाळप स्थिती

विभाग कारखाने गाळलेला ऊस साखर उत्पादन उतारा
कोल्हापूर ३७ १४८.७३ १७८.८८ १२.०३
पुणे ६१ २४३.७८ २६१.८० १०.७४
नगर २६ ८७.२२ ८९.६६ १०.२८
औरंगाबाद २२ ५४.८० ५०.९८ ९.३०
नांदेड ३२ ७७.३३ ७९.०४ १०.२२
अमरावती ४.४५ ४.६७ १०.५२
नागपूर ४.०७ ३.९१ ९.६०
उतारा टक्क्यांमध्ये आहे
ऊस गाळपाचा आकडा लाख टनात असून, साखर उत्पादनाचा आकडा लाख क्विंटलमध्ये आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com