agriculture news in marathi, State Transport employee to be new uniform from tomorrow | Agrowon

एसटी कर्मचारी उद्यापासून नवीन गणवेशात
सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

मुंबई : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या गणवेशात एकसंधता दिसून यावी, या उद्देशाने महामंडळाकडून त्यांना नवीन तयार गणवेश दिला जाणार आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला वर्षातून दोन तयार गणवेश देण्यात येणार आहेत. शनिवारी (ता. 6) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई सेंट्रल येथील महामंडळाच्या मुख्यालयात गणवेश वितरणाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. त्या दिवशी महामंडळाच्या राज्यातील 31 विभागीय कार्यालयांत कर्मचाऱ्यांना नवीन गणवेश देण्यात येतील. त्या वेळी महामंडळाच्या विविध नावीन्यपूर्ण योजनांचे सादरीकरणही होईल. 

मुंबई : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या गणवेशात एकसंधता दिसून यावी, या उद्देशाने महामंडळाकडून त्यांना नवीन तयार गणवेश दिला जाणार आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला वर्षातून दोन तयार गणवेश देण्यात येणार आहेत. शनिवारी (ता. 6) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई सेंट्रल येथील महामंडळाच्या मुख्यालयात गणवेश वितरणाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. त्या दिवशी महामंडळाच्या राज्यातील 31 विभागीय कार्यालयांत कर्मचाऱ्यांना नवीन गणवेश देण्यात येतील. त्या वेळी महामंडळाच्या विविध नावीन्यपूर्ण योजनांचे सादरीकरणही होईल. 

एसटी महामंडळात विविध 16 संवर्गांत सुमारे एक लाख कर्मचारी काम करतात. त्यांना दर वर्षी गणवेशासाठी महामंडळाकडून कापड दिले जाते; मात्र ते पसंत न पडल्याने अनेक कर्मचारी आपल्या सोईने गणवेशाचे कापड खरेदी करून स्वतः गणवेश शिवून घेत. यामुळे सर्व कर्मचारी एका रांगेत उभे राहिल्यास नेमका गणवेशाचा खाकी रंग कोणता, हा प्रश्‍न पडत असे. एकाच पदावर काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांच्या गणवेशामध्ये रंगापासून शिलाईपर्यंत वैविध्यता दिसून येई. यातून गणवेशाची एकसंधता निघून जाई. या पार्श्‍वभूमीवर परिवहन मंत्री तसेच तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सर्व कर्मचाऱ्यांना तयार गणवेश देण्याची संकल्पना मांडली. 

केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या राष्ट्रीय फॅशन टेक्‍नॉलॉजी या संस्थेने एसटी कर्मचाऱ्यांच्या नवीन गणवेशाचे डिझाईन तयार केले आहे. या संस्थेने राज्यभरातील महामंडळाच्या कर्मचाऱ्यांशी प्रातिनिधिक स्वरूपात संवाद साधला होता. त्यांचे कामाचे स्वरूप, त्यांच्या गरजा, स्थानिक हवामान यांचा विचार करून नवीन गणवेशाचे प्रारूप तयार केले. या प्रारूपाचे सादरीकरण सर्व कामगार व कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींपुढे करण्यात आले. त्यावर सूचना मागवत आवश्‍यक बदल करण्यात आल्यानंतर हे डिझाईन तयार करण्यात आले. 

एसटीच्या सेवेचा कायापालट होणार! 
नवीन वर्ष हे एसटी महामंडळाच्या परिवर्तनाचे वर्ष असेल. या वर्षात कार्यान्वित होणाऱ्या विविध प्रवासी व कर्मचारीभिमुख योजनांमुळे महामंडळाचा व प्रवासी सेवेचा कायापालट झालेला दिसेल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी केले.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...
हिंगोली, नांदेड, परभणीत आॅनलाइन नोंदणीत...परभणी   ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
वारणा नदीवरील बंधारा दुरुस्तीमुळे...कोल्हापूर  : वारणा नदीवरील विविध बंधाऱ्यांची...
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...