agriculture news in marathi, State transport requirement gets huge response | Agrowon

‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१ हजार
तात्या लांडगे
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व वाहकांच्या आठ हजार २२ जागांची भरती निघाली आहे. त्यासाठी आतापर्यंत ४१ हजार ७१७ उमेदवारांनी अर्ज केले असून त्यामध्ये सोलापूरसह दुष्काळी जिल्ह्यांमधील सर्वाधिक उमेदवार आल्याचे राज्य परिवहन महामंडळाच्या विभागाकडून सांगण्यात आले. जागा भरतीच्या तुलनेत पाचपट अर्ज आल्याने राज्यात बेरोजगारी वाढल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. 

सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व वाहकांच्या आठ हजार २२ जागांची भरती निघाली आहे. त्यासाठी आतापर्यंत ४१ हजार ७१७ उमेदवारांनी अर्ज केले असून त्यामध्ये सोलापूरसह दुष्काळी जिल्ह्यांमधील सर्वाधिक उमेदवार आल्याचे राज्य परिवहन महामंडळाच्या विभागाकडून सांगण्यात आले. जागा भरतीच्या तुलनेत पाचपट अर्ज आल्याने राज्यात बेरोजगारी वाढल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. 

मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र, स्टार्टअप इंडिया च्या माध्यमातून राज्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची घोषणा झाली. परंतु, बॅंकांना ढिगभर कागदपत्रे देऊनही वेळेवर पाहिजे तेवढे कर्ज मिळत नाही. दुसरीकडे सोलापूरसह अन्य दुष्काळी जिल्ह्यांमध्ये नवे उद्योगही पुरेशा प्रमाणात आले नाहीत. मागील काही वर्षांपासून खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांचे प्रमाणही घटल्याचे चित्र आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्य परिवहन विभागाच्या या भरतीसाठी अनुसूचित जमातीच्या ६८५ जागा आणि तीन हजार अर्ज आले आहेत. महिला उमेदवारांनी मात्र या भरतीकडे पाठ फिरविल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे समांतर आरक्षणानुसार त्या जागांवर पुरुष उमेदवारांना संधी मिळणार आहे. रिक्‍तपदांसाठी अर्ज करण्याची मुदत १५ ऐजवी २२ फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली आहे. 

प्रकार जागा  अर्ज
एकूण जागा  ८,०२२ ४१,७१७ 
महिला राखीव २,४०६ ९५३
अनुसूचित जमाती जागा  ६८५ २,९७२

प्रतिक्रिया...
राज्यात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली आहे. मागील नोकरी भरतीवेळी १५ हजार जागांसाठी पाच लाखांपर्यंत अर्ज आले होते. आता आठ हजार जागांसाठी ४० हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. बेरोजगारी वाढल्याने लाखो अर्ज दाखल होतात परंतु, आवश्‍यक तेवढ्याचा जागा भरल्या जातील. 
- दिवाकर रावते, परिवहनमंत्री
 

इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...
शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे...प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९००...नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार...
शिरवळला पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे...सातारा : सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या...
स्वाभिमानीसोबत दिलजमाईसाठी बुलडाण्यात...बुलडाणा ः लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने...
जळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक टिकून;...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...