|

एसटी बसमध्ये दुधाला `नो एन्ट्री`
हरी तुगावकर 
रविवार, 3 डिसेंबर 2017

महिन्याला एक ते दहा लिटरसाठी ८० रुपयांचा पास दिला जातो. पण एक डिसेंबरपासून हा पास दिलाच नाही. त्यामुळे दूध नेऊ शकलाे नाही. 
- प्रल्हाद आकनगिरे, दूध उत्पादक शेतकरी, कामखेडा, ता. रेणापूर

लातूर ः राज्यातील दूध उत्पादक शेतकरी दररोज राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये वाहतूक करून शहरी भागात दूध आणून त्याची विक्री करतात. अनेक जणांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा यावर उदरनिर्वाह चालतो. अशा दूध उत्पादकांना एस. के. ट्रान्सलाइन्स प्रा. लि.कडून पासही दिले जात होते. पण या कंपनीने नियमाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे महामंडळाने त्यांच्यावर कारवाई करत दूध व दुग्धजन्य पदार्थांची वाहतूक करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे राज्यातील दूध उत्पादक अडचणीत आले आहेत. महामंडळाच्या भूमिकेकडेच आता त्यांचे लक्ष लागले आहे. 

राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून पार्सल कुरिअरची वाहतूक करण्यासाठी महामंडळाने एस. के. ट्रान्सलाइन्स प्रा. लि. या कंपनीशी करार केला आहे. एक नोव्हेंबर २०११ ते ३१ आक्टोबर २०१८ या कलावधीसाठी अधिकृत परवानाधारक म्हणून महामंडळाने या कंपनीची नियुक्ती केली होती. तसा करारही करण्यात आला होता. 

पण सांगली विभागाने एक अहवाल महामंडळास सादर केला होता. यात जास्तीत जास्त पाचशे किलो पार्सल वाहतुकीची मर्यादा असताना दोन वेळा सहाशे किलो पार्सलची वाहतूक करणे, जास्ती जास्त ५० हजार एवढ्या किमतीच्या मालाची एकावेळी वाहतूक करण्याची मर्यादा असतानाही त्या पेक्षाही जास्त किमतीच्या पार्सलची वाहतूक करणे, डॉकेटमध्ये जाणीवपूर्वक खोट्या नोंदी करून अधिक किमतीच्या मालाची वाहतूक करणे, नाशवंत मालाची वाहतूक करताना सदर मालाच्या बांधणीच्या अानुषंगाने असलेल्या नियमांचे पालन न करणे असे प्रकार दिसून आले आहेत. 

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
काळी आई आणि तिच्या लेकरांवर प्रेम करा४ ऑगस्टच्या ‘अॅग्रोवन’मध्ये तीस वर्षे सतत फ्लॉवर...
युरियाचा वापर हवा नियंत्रितचपंधरा दिवसांच्या उघडिपीनंतर राज्यात पावसाने दमदार...
कृषी आयुक्तांकडून डाळिंबावरील रोगाचा...सांगली ः राज्यातील आंबे बहारातील डाळिंबावर तेलकट...
केरळात पावसाचा जोर कमी; मदतकार्यात वेगतिरुअनंतपुरम/कोची  : दोन दिवसांपासून पावसाचा...
यवतमाळ जिल्ह्यात सोळा कृषी केंद्रांचे...यवतमाळ : कीटकनाशक खरेदी केलेल्या एजन्सीचे डीलरचे...
पिकं हातची गेली, शिवारात फक्त हिरवा पालापावसाचा खंड २२ ते २४ दिवसांचा राहिला. हव्या...
स्वच्छ सर्वेक्षणात सोलापूर देशात दुसरेसोलापूर  : ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८'...
खान्‍देशातील तीन प्रकल्प भरलेजळगाव : मागील आठवड्यात झालेल्या पावसाने खान्‍...
कापसातील कृत्रिम मंदीचा फुगा फुटलाजळगाव ः सरकीच्या वायदे बाजारातील सटोडियांनी...
गडचिरोली, नांदेडमध्ये दमदार पाऊस पुणे : विदर्भातील गडचिरोली, मराठवाड्यातील नांदेड...
‘ग्लायफोसेट’ धोकादायक की सुरक्षित? पुणे: अमेरिकेतील एका न्यायालयाने अलीकडेच दिलेल्या...
अळिंबी उत्पादन, मूल्यवर्धन,...पूर्व विदर्भातील भंडारा जिल्हा भात उत्पादनासाठी...
जिद्द द्राक्षबाग फुलवण्याची नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यातील द्राक्ष उत्पादक...
मराठवाडयात कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भावपरभणी : सलग तीन आठवडे  पावसाचा खंड आणि...
पर्यावरणपूरक अक्षय ऊर्जा फायदेशीर देशात उपलब्ध अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांपैकी...
अस्मानी कहरराज्यात जुलैचा शेवटचा आठवडा ते ऑगस्टचा पहिला...
देशातील ५२ टक्के शेतकरी कुटुंबे...२०१५-१६ या वर्षात देशातील शेतकरी कुटुंबांचे...
नेमका गरजेवेळी युरिया जातो कुठे?जळगाव  ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला...
केरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य तिरुअनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर...
मोसंबीची फळगळ वाढलीऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट...