एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला

राज्य परिवहन मंडळ बस
राज्य परिवहन मंडळ बस

मुंबई : सातव्या वेतन आयोग लागू करण्यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत पुकारलेला संप अखेर शुक्रवारी (ता.२०) मध्यरात्रीनंतर मिटला. उच्च न्यायालयाने संप बेकायदेशीर असल्याचे आणि राज्य सरकारला एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात समित्या नेमण्याचे आदेश दिल्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय संघटनांनी घेतला. 

 मुंबई उच्च न्यायालयाने संप बेकायदेशीर ठरवून संप मागे घेण्याचे दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर रात्री झालेल्या कामगार संघटनेच्या कोअर कमिटीच्या बैठकीत संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे चार दिवसांच्या खंडानंतर राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बस आज (ता.२१) सकाळपासून रस्त्यावर धावू लागतील. 

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मिटल्याचे कामगार संघटनांनी कळविले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आला आहे. मध्यरात्री झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर संप मागे घेण्याचा निर्णय झाल्याचे म्हटले आहे. 

उच्च न्यायालयाच्या आदेशनुसार वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यसरकार दोन दिवसात उच्च स्तरीय समिती गठीत करील. यामध्ये परिवहन विभागाच्या सचिव, एसटी चे व्यवस्थापकीय संचालक आणि अन्य अधिकाऱ्यांचा समावेश असेल. ही समिती कामगार संघटनांशी तातडीने चर्चा करून 15 नोव्हेंबर पर्यंत अंतरिम वेतनवाढीचा निर्णय घेईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com