agriculture news in marathi, state winter assembly session | Agrowon

परिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची दिलगिरी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप करत विधान परिषदेत सोमवारी (ता.१९) पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले. मात्र, सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.

मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप करत विधान परिषदेत सोमवारी (ता.१९) पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले. मात्र, सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.

गायकवाड यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला गेला नाही, असे सांगत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. सरकारने याबाबत दिलगिरी व्यक्त करून संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करावे, अशी मागणी मुंडे यांनी केली. सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला. देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी शोकप्रस्ताव मांडला. स्व. वाजपेयींनी स्वातंत्र्यसंग्रामात सक्रिय सहभाग घेतला, त्याचप्रमाणे त्यांनी पक्षवाढीसाठी कठोर मेहनत घेतली आणि पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत त्यांनी घेतलेले निर्णय देशाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरले, अशा शब्दांत पाटील यांनी आदरांजली अर्पण केली.

विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते कॉम्रेड माधवराव गायकवाड आणि माजी विधान परिषद सदस्य उमेशा पवार यांनाही चंद्रकांत पाटील यांनी आदरांजली अर्पण केली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही वाजपेयी यांच्या आठवणी जागवत त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्याचप्रमाणे माधवराव गायकवाड आणि उमेशा पवार यांच्या निधनाबद्दल मुंडे यांनी शोकभावना व्यक्त केल्या. महादेव जानकर, भाई गिरकर, जयंत पाटील, अनिल परब, शरद रणपिसे, बाबजानी दुर्राणी, मनीषा कायंदे, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील, वजाहत मिर्झा आणि अरुण अडसद या नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी सभागृहाला करून दिला.

इतर बातम्या
वासंतीकरणाच्या प्रक्रियेतील तापमानाचे...वसंताच्या आगमनामुळे प्रत्येक वनस्पती किंवा...
तेल्हारा, अकोट तालुक्यांत अवकाळी पाऊस;...अकोला : जिल्ह्यात तेल्हारा, अकोट तालुक्यांत...
मराठवाड्यात ‘रेशीम’ला रिक्त पदांचे...औरंगाबाद ः राज्याला रेशीम उद्योगात उदयोन्मुख...
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत जळगाव : मागील दोन-तीन दिवसांपासून खानदेशात ढगाळ,...
खानदेशात पपई लागवडीत होणार निम्म्याने...जळगाव : खानदेशात आगाप पपई लागवडीला सुरवात झाली...
अमरावती जिल्ह्यात सव्वालाख शेतकऱ्यांची...अमरावती : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील दोन...
माथाडी कामगारांच्या आंदोलनामुळे गूळ...कोल्हापूर ः माथाडी कामगारांनी जादा वेळ काम...
चंद्रपूर जिल्ह्यातील ९२ गावांवर...चंद्रपूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी अवघा...
रशियाला द्राक्ष निर्यातीत ‘क्लिअरिंग’चा...नाशिक : भारतीय द्राक्षाचा रशिया मोठा आयातदार आहे...
नाशिक जिल्ह्यातील बंधारे होणार दुरुस्त नाशिक : भविष्यात दुष्काळाची झळ बसू नये,...
जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक...परभणी ः परभणी येथील जायकवाडी पाटबंधारे विभाग...
गटशेतीतून भरघोस उत्पन्न घेणे शक्‍य ः...म्हसवड, जि. सातारा : शेतजमिनीची धूप होऊ न देता...
पुणे जिल्ह्यात ११५ गावे पितात दूषित पाणीपुणे ः जिल्ह्यातील ११५ गावे चक्क दूषित पाणी पित...
सातारा जिल्ह्यात नव्याने १३३ ई-सेवा...सातारा : शासकीय, प्रशासकीय सुविधा गावागावांत...
सोलापूर जिल्ह्यातील पाणी योजनांसाठी दीड...सोलापूर : पाणीटंचाईची वाढती तीव्रता आणि रखडलेल्या...
वादळी पाऊस, गारपिटीचा तडाखापुणे ः अकोला जिल्ह्यातील देवरी (ता. अकोट),...
शेतकरी सन्मान निधी योजनेत नगर...नगर : शेतकऱ्यांना निश्‍चित उत्पन्न मिळवून...
लाल वादळ मुंबईकडे झेपावलेनाशिक : गेल्या वर्षभरापासून आश्‍वासन देऊनही...
शेतकरी प्रतिनिधींची ऊस दर नियंत्रण मंडळ...पुणे: ऊसदर नियंत्रण मंडळाच्या बैठकीत शेतकरी...
शेतीमाल तारण, ई नाम पुरस्कारांचे...पुणे: शेतीमाल तारण आणि आॅनलाइन राष्ट्रीय कृषी...