agriculture news in marathi, status of complete farmpond, satara, maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यात ८१० शेततळ्यांची कामे पूर्ण
टीम अॅग्रोवन
सोमवार, 29 जानेवारी 2018
सातारा : शाश्‍वत पाणी उपलब्धतेसाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेस सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातून उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजेच ३२११ अर्ज प्राप्त झाले असून, आतापर्यंत ८१० शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानापोटी तीन कोटी ५६ लाख रुपयांचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 
 
सातारा : शाश्‍वत पाणी उपलब्धतेसाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेस सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातून उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजेच ३२११ अर्ज प्राप्त झाले असून, आतापर्यंत ८१० शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानापोटी तीन कोटी ५६ लाख रुपयांचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 
 
मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी जिल्ह्यात २००० शेततळ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. ही योजना सर्वसमावेशक झाल्याने जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सहभागी होता येऊ लागल्याने टप्प्याटप्प्याने प्रतिसाद वाढला आहे. सध्या उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे ३२११ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये २६८६ अर्ज पात्र तर ४६१ अर्ज अपात्र ठरले असून, ५८ अर्जांच्या छाननीचे काम सुरू आहे. पात्र अर्जापैकी २३०२ अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. १६७३ शेततळ्यांची आखणी करून दिली आहे. सध्या ८५६ शेततळ्यांचे काम सुरू असून, ८१० शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. यापैकी ७८९ शेततळ्यांसाठी तीन कोटी ५६ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. 
 
दुष्काळी माण, खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगाव या दुष्काळी तालुक्‍यात या योजनेला प्रतिसाद चांगला असून पश्‍चिमेकडील कऱ्हाड, वाई, सातारा तालुक्‍यांतूनही प्रतिसाद चांगला वाढला आहे. मात्र महाबळेश्वर, जावळी, पाटण या तालुक्‍यांत कमी प्रतिसाद मिळत आहे.
 
शाश्‍वत पाण्यासाठी ही योजना फायदेशीर असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. आखणी करून दिलेली व प्रत्यक्ष काम सुरू असलेली शेततळ्यांची कामे पूर्ण झाल्यावर जिल्ह्यात या योजनेत सुमारे चार हजार शेततळी पूर्ण होणार आहेत. यामुळे पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.
 
तालुकानिहाय शेततळ्यांची पूर्ण झालेली कामे ः सातारा ५०, कोरेगाव १०९, खटाव ९९, माण १८५, फलटण २०५, वाई ५१, खंडाळा ६८, महाबळेश्वर १, जावळी ३, पाटण ०, कऱ्हाड ३९.

इतर ताज्या घडामोडी
मत्स्यपालनामध्ये योग्य तांत्रिक बदलांची...सध्याच्या मत्स्यपालन पद्धतीमध्ये कोणतेही बदल न...
जळगाव बुरशीयुक्त शेवयांच्या प्रकरणात...जळगाव ः शालेय पोषण आहार वाटपानंतर अंगणवाडीमधील...
सातगाव पठार परिसरात बटाटा लागवडीस सुरवातसातगाव पठार, जि. पुणे : काही गावांमध्ये पावसाने...
सोलापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह...सांगोला/करमाळा : जिल्ह्याच्या काही भागांत...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात...पुणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी...
मातीचा प्रत्येक कण सोन्यासारखा; तो वाया...नाशिक : शेतातील माती म्हणजे कोट्यवधी सूक्ष्म...
नांदेड जिल्ह्यात १ लाख ६५ हेक्टरवर पेरणीनांदेड ः नांदेड जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप...
शेतकऱ्यांना पीककर्ज देणे टाळले तर ठेवी...नगर  ः शेतकऱ्यांना सध्या खरीप हंगामासाठी...
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायमसातारा  ः जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, माण,...
नांदेड जिल्ह्यात फक्त ८.२९ टक्के...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील यंदा खरीप पीककर्ज...
तापीच्या पाण्यास गुजरातचा नकारमुंबई  ः पार-तापी नर्मदा नद्याजोड...
कापूस पीक नियोजनातून हमखास उत्पादन वाढसोनगीर, जि. धुळे ः कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी...
औरंगाबाद जिल्ह्यात अखेर पाऊस बरसलाऔरंगाबाद  : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या...
`दमणगंगा नदीजोड योजनेचे फेरसर्व्हेक्षण...नाशिक : दमणगंगा (एकदरे) नदीजोड योजनेचे...
मराठवाड्यात साडेतीन लाख हेक्‍टरवर पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ३ लाख ६७...
पीककर्जासाठी बँक अधिकाऱ्याने केली...दाताळा, जि. बुलडाणा : पीककर्ज मंजूर करून...
माॅन्सून सक्रिय, सर्वत्र चांगल्या...महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी झालेले असून १००४...
‘एसआरआय’पद्धतीने भात लागवडीचे तंत्रएसआरआय पद्धतीने भात लागवड केल्यामुळे रोपे, माती,...
भूमिगत निचरा प्रणालीद्वारे जमिनींची...पाणी व रासायनिक खते यांच्या अनियंत्रित वापरामुळे...
लागवड सावा पिकाची...जून महिन्यात सावा पिकाची पेरणी करावी. दोन ओळीतील...