नगर जिल्ह्यात ‘रोहयो’वर बारा हजार मजूर कार्यरत

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

 नगर : जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांवर सध्या बारा हजार मजूर काम करीत आहेत. मजुरांच्या संख्येवरून या वर्षीच्या दुष्काळाची तीव्रता स्पष्ट होते. मात्र, तरीही सद्यःस्थितीचा विचार करता फारसे मजूर नसल्याचे दिसत आहे.

‘रोहयो’अंतर्गत या आठवड्यात ग्रामपंचायतस्तरावर ७८६, यंत्रणेमार्फत ४७५ अशी एकूण एक हजार २६१ कामे सुरू आहेत. ग्रामपंचायतस्तरावरील कामांवर सहा हजार ५३३, तसेच यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या कामांवर पाच हजार ८४९ मजूर कार्यरत आहेत. या वर्षी दुष्काळाची दाहकता पाहता सरकारने मोठ्या प्रमाणात कामे सुरू करून ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. सध्या अकोले तालुक्‍यात ग्रामपंचायतस्तरावर १३७, तर यंत्रणेमार्फत २८ अशी सर्वाधिक १६५ कामे सुरू आहेत. 

पारनेर तालुक्‍यात ग्रामपंचायतस्तरावर ७८ व यंत्रणेमार्फत ५७ अशी १३५ कामे सुरू असली, तरी तेथे सर्वाधिक दोन हजार १२४ मजूर कार्यरत आहेत. अकोल्याखालोखाल शेवगाव तालुक्‍यात ९७ कामे सुरू असून, तेथे एक हजार ५३० मजूर कामावर आहेत. दुसरीकडे रोहयोच्या कामांवर राहुरी तालुक्‍यात सर्वांत कमी मजूर काम करीत आहेत. तेथे ग्रामपंचायत स्तरावर ४०, तर यंत्रणेमार्फत १५ कामे सुरू आहेत. तेथील ५५ कामांवर फक्त २६२ मजूर कार्यरत आहेत. 

साडेबत्तीस हजार कामे शेल्फवर  दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता ग्रामपंचायत स्तरावर २३ हजार ५१४, तसेच यंत्रणेमार्फत नऊ हजार १५४ कामे मंजूर करण्यात आली आहेत. या दोन्ही स्तरांवर विक्रमी ३२ हजार ६६८ कामे शेल्फवर असून, पाऊस लांबल्यास व मागणी वाढल्यास ही कामे तत्काळ सुरू करण्यात येणार आहेत.     

जिल्ह्यातील रोहयो कामांची स्थिती
तालुका कामे  मजूर 
अकोले  १६५  ६४१
जामखेड  ७५ ८३० 
कर्जत   ७१ १२७४
कोपरगाव ८३ ३९३
नगर ७७  ११४० 
नेवासे ४४  ३२२
पारनेर   १३५ २१२४
पाथर्डी  ८४ ६८७
राहाता  १०६ ४४२
राहुरी ५५ २६२ 
शेवगाव  ९७  १५३० 
संगमनेर  ७३ १३३४ 
शेवगाव ९७  १५३० 
श्रीगोंदे १४४   १०९७
श्रीरामपूर    ५२  ३०६ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com